Skip to main content

विरंगुळा

नास्तिक!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 13/07/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच सांगतो की मी एक नास्तिक माणूस आहे. "प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादयासागरा...." माझा मुलगा गजाननाच्या तसबिरीपुढे हात जोडून उभा असतो... मी ही त्याच्या मागे उभा रहातो. माझं मन आक्रंदून उठतं, " अरे तुझा विश्वास नाही या सगळ्यावर, सर्व थोतांड आहे ते!!" मनाला न जुमानता नकळत डोळे मिटतात, मस्तक लवतं..... काय जादू आहे ही? पुन्हा सांगतो की मी पूर्ण नास्तिक आहे.... एका ब्राम्हणाच्या घरांत जन्माला आल्यामुळे सर्व ब्राम्हणी संस्कार झाले. पण माझा त्याला काहीच इलाज नव्हता.

नटवर (लोकल गोष्टी-१)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 12/07/2008 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
नटवर . लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्‍याच जणांना परिचित असेल. सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्‍हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, :D या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!. ट्रेन मध्ये शिरल्यावर एक दोन मिनटांतच माझी भूमिका सुरू होते.

बंड्याचा शि. सा.न.वि.वि.

लेखक कियोस्का यांनी शनिवार, 12/07/2008 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
बंड्या enjoy friends, ती. बाबा आणि सौ . आईस, बंड्याचा शि. सा.न.वि.वि. मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो. तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्‍लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते. पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत, तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्‍कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे .
Taxonomy upgrade extras

किस बाबा किस!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 11/07/2008 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
---------- बोंबला! :S साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

दृष्टिक्षेप

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 11/07/2008 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
'अंजली'ला लावलेली टेप आहे गॅसवर सध्या जुना 'निर्लेप' आहे रोज कविता चोरल्या काही नव्या मी पायरट मी खास - जॉनी डेप आहे१ बाटल्या उघडून बसलो सर्व तरिही "ग्लास सुकले", त्यांस हा आक्षेप आहे! ना करीना, मल्लिका, प्रीती, बिपाशा 'ऍश' आणिक 'कॅश' - दृष्टिक्षेप आहे? पाडताना काव्य मी थांबू कशाला? दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे =================================================== १.

चौकट

लेखक मिसळपाव यांनी शुक्रवार, 11/07/2008 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारी मी स्टेशनकडे झपाझप चाललो होतो. ऊन तर होतंच पण त्याहीपेक्षा कधी एकदा कॉलेज पहातो याची ऊत्सुकता जास्त होती. तब्बल पंधरा वर्षानी मी परत 'कॉलेज्ला चाल्लो' होतो! ऐन उमेदिची पाच वर्षे मी तेथे काढली. मग पुढच्या शिक्षणासाठी पाच सहा वर्षे मुंबईबाहेर गुरफटला गेलो आणि लगेचच अमेरीकेला आलो. एव्हढ्या वर्षात जमलेल्या एकुलत्या एका भारतभेटीत फिरणार तरी कीती? मी भराभर पावलं उचलंत होतो. एव्हढ्या सगळ्या काळात अर्थातच सगळीकडेच कमी-जास्त बदल झाले होते. कॉलेजचा रस्तासुध्दा त्याला अपवाद नव्हता. पुर्वी या नाक्यावर पिंपळाचं भलं थोरलं झाड होतं.

अजुन एक..मासॉपें चित्र

लेखक स्वप्निल.. यांनी गुरुवार, 10/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
हे अजुन एक मासॉपें चित्र..१५ मिनिटांत काढलेय..पहिल्या चित्राएवढे चांगले नाही..पन वेगळा प्रयत्न आहे.. सांगा कसे वाटते ते.. स्वप्निल..

फुलपाखरे छायाचित्रे

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 09/07/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखारांची चित्रे!
दोन्ही चित्रे कॅनन कॅमेरा टॅमरॉन टेलेफोटो लेन्स. ऍपर्चर ५.६ शटर : १/१२००