मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नीलकांतकी चल पडी! :)

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
अमेरीकेत होणार्‍या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :) राम राम मिपाकरहो, आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता. आमच्या एका हितचिंतकानी त्यांना आमचा नंबर दिला. "तुम्ही तात्या अभ्यंकर का?" "हो..." "तुम्ही मराठी संकेतस्थळ बनवता का? आम्हाला संमेलनाशी निगडीत मराठी संस्थळ बनवायचे आहे!" "नाही, मी नाही बनवत. परंतु माझा नीलकांत नावाचा मित्र आहे, तो बनवतो.." "बरं मग त्यांचा नंबर देता का?" आणि आम्ही त्यांना नीलकांताचा नंबर दिला.. आता काय बाबा, आमचा नीलकांत इंटरनॅशणल झाला! :) बाबारे नीलकांता, अरे मेल्या अमेरीकेतल्या साहित्य संमेलनाची साईट तुला बनवायच्ये हो! ती बनव आणि बक्कळ पैका कमव. नायतरी आपल्याच महाराष्ट्र सरकारचे २५ लाख रुपये त्यांनी घेतलेत. मग महाराष्ट्रातीलच एखाद्या मराठी तरुणाला संमेलनाच्या कामनिमित्त त्यापैकी चार पैशे भेटले तर चांगलंच आहे की! चांगली साईट बनवून दे हो देवकुळेसाहेबांना! हो, पण ते करताना आपल्या गरीबाच्या भारतीय मिपाला नको हो विसरूस! :) तुझा, तात्या.

वाचन 20222 प्रतिक्रिया 0