क्विक गन मुरूगन हा एक ईंडियन काऊबॉय असतो ज्याचा जिवनाचा उद्देश हा गाईंना वाचवण्याचा असतो. क्विक गन मुरूगन ची लॉकेट लव्हर ही गेल्या जन्मीची प्रेयसी असते. राईसप्लेट रेड्डी हा गाईंना मारून त्यांना डोशात घालून सगळे व्हेज हॉटेल नॉन व्हेज करण्याचा त्याचा डाव असतो. क्विक गन मुरूगनला राईसप्लेट रेड्डी मारतो. मुरूगन स्वर्गात जातो. चित्रगुप्ताकडे तो गाईंना वाचवण्यासाठी पुन्हा प्रूत्थीवर जाण्यासाठी अॅप्लिकेशन करतो. तो नंतर परत मुबंईला येतो.
राईसप्लेट रेड्डी ईकडे डोसा बनवण्यासाठी मॅक डोसा नावाची कंपनी टाकतो. त्यात डोशाची आर अँन्ड डी स्थापन करून सायंटीस्ट लोकांना नोकरीला ठेवतो. चांगला डोसा बनवण्यासाठी तो मुरूगन च्या वहिनीला पळवतो. त्याची असिस्टंट असणारी मँगो (रंभा) ही सेक्रेटरी क्विक गन मुरूगन ला मदत करते. राईसप्लेट रेड्डी ला राऊडी एम. बी. ए. सामील असतो. क्विक गन मुरूगन शेवटी राईसप्लेट रेड्डी ला मारतो.
एकदम वेगळा अनूभव देणारा चित्रपट.
यात नायक झालेले डॉ. राजेंद्र्कुमारांनी अनेकांची खिल्ली उडवलेली आहे. त्यानी मुद्दाम साउथ सारखे उच्चार केलेले आहेत. चित्रपटात कोकोनट क्लायबींग ईंन्स्टीट्यूट आहे. रजनीकांतसारखे सिगारेट उडवणारे शॉट आहे. सटासट सुटणार्या गोळ्या क्विक गन मुरूगन मारतो. गोळ्या कमरपट्ट्याला लागून कॅरमच्या गोटीसारखी फिरते. त्याच्या घरात त्याचा भाऊ व तो नेमबाजी खेळतो. त्याची वहीनी कौतूकाने ते पाहते. राईसप्लेट रेड्डीची डोशाची लॅब आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर व वोट फॉर राज ठाकरे हे देखील आहे. मुबंईतले डबेवाले आहेत. अमीताभ च्या जास्त जाहीराती मिळवण्याची खिल्ली आहे. द मॅट्रीक्स सारखे गोळ्या सोडण्याचे शॉट आहेत. रंभा उर्वशीचे डान्स क्लासेस आहेत.
चित्रपटात गाणीही धमाल आहेत.
हा लेख म्हणजे माझे चित्रपट परीक्षण होवू शकणार नाही. चित्रपट परीक्षण देण्यासाठी तो चित्रपट कमीतकमी २/३ वेळेस बघावा लागतो. मी तर ज्या ठिकाणी चित्रपट पाहिला तेथे काही काटछाट झालेली होती. थेटरच्या बाजूला तर गणपतीच्या बाजूचे स्पिकर जोरात वाजत होते. असो. नंतर पुन्हा पाहीनच.
डॉ. राजेंद्र्कुमारांनी क्विक गन मुरूगन बनून धमाल केलेली आहे. मँगोवर तात्यांचा जीव जडण्याचा घनदाट संभव आहे. ती दिसतेही फटाका.
ईतर कलाकार ही जीव ओतून काम करतात. एकूणच शशांक घोश चा हा चित्रपट डोक्याला ताप न देता भरपूर मनोरंजन करतो. हा चित्रपट चित्रपटग्रूहातच पहावा. (पायरेटेड पाहू नये. जेणे करून आपण ईंडस्टीला काहीतरी मदत करू.)
मिपाच्या स्वभावासारख्या लोकांना हा चित्रपट आवडेलच व तो त्यांनी जरूर पहावा.
तांत्रीक बाबी : उत्तम
फोटोग्राफी : सफाईदार
म्युझिक : आनंददाई
अॅक्टींग : पेलवणारी
चित्रपट का बघावा: पैसा वसूल. डोक्याला ताप नाही.
चित्रपट का बघू नये : हा प्रश्नच येत नाही. बघावाच.
रेटींग: ***** (५ स्टार)
माईंड ईट.
वाचने
3240
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
दफोराव या
देवाऽऽ
हेच म्हणतो
In reply to देवाऽऽ by धमाल मुलगा
धन्यु!
तरी तेच
In reply to धन्यु! by ऋषिकेश
टोटल करमणुक
माईंड ईट
मुरुगन.