मात्र रात्रीची गोष्ट ....भाग १
***
स्थळ - नेहमीचेच रात्रीचे ठिकाण.
वेळ - नेहमीची 'बसायची' वेळ.
पात्र - मी आणि नेहमीचा मित्र.
(सुरवात नुकतीच होत असल्याने कोण काय बोलत आहे हे नीट कळत नाही, जसजसा वेळ जातो तसं नीट कळायला लागतं, अशी सुरवातीची उन्मनी अवस्था)
मी - हाटेल चांगल चालायला लागलं रे... सुरवातीला आपण यायचो तर अगदी फुटकळ लोक यायचे
तो- तर आता चांगले चालु आहे. फॅमिली रुम, बार, गार्डन, टेरेस वेगवेगळे भाग आहेत. जो तो आपापल्या चॉईसने जातो
मी - ते बरे आहे नाही तर तुला मला पाहुन सगळे फॅमिलीवाले पळुन गेले असते
तो - तर काय .. एक तर माकडाचे चेहरे आपले.. भाषा खराब
मी - पण आपल्याला तोंडावर बोलतं का कुणी?
तो - सज्जन माणसे आहेत ती .. आपल्यासारखी नालायक थोडीच
मी - तो हल्ली दिसत नाही... गांडुळाचा कारखानदार.. आहे की गचकला ?
तो - असेल ... असेल... धाडकन येईल तर आपल्याला धावावे लागेल सावरकर बनुन...
मी - हा हा पण चांगला आहे माणुस..
तो - माणुस चांगलाच असतो परिस्थिती त्याला वाईट बनवते. आता तो दुसरा आठवतो का तुला..
मी - हो आठवतो की.. चांगला होता... आखातात गेला आणि ... असो. बाकी काय चाललय?
(तेवढ्यात एक जोरदार गलका ऐकु आला. वेटरला हाक मारली)
तो - काय रे? रेड पडली का? लायसन नाहीये.. मागचा दरवाजा उघडतो ना नीट?
वेटर- रेड कुठली ? तो वेडा आला आहे.
मी - कोण? इथे तर सगळेच वेडे आहेत.
वेटर - नाही.. हे येडं वेगळच आहे. कामधंदा करणा-या लहान मुल असणा-या बायांना पकडुन तुम्ही दुध कसे पाजता? डायपर वापरता की दुपटे? असले प्रश्न विचारतो.. आणि भंडावुन सोडतो. नव-यांना सांगतो.. तुमचे आता काही खरे नाही. फार दंगा करतो.
तो - अरे मग हाकलुन द्यायचे ना?
वेटर - कुणाकुणाला हाकलणार? अजुन एक वेडा येईल थोड्या वेळाने. हातात माती घेवुन येतो आणि पटकन कुणाच्याही ताटात माती टाकुन पळुन जातो...
मी - अरे मग, मालक काय गोट्या खेळतोय का? कुठे आहे मालक?
वेटर - तो काय कोप-यात बसला आहे गुणगुणत.. हल्लीच त्यांनी मानवतावादी परिषदेचे सदस्यत्व घेतले आहे. त्यामुळे अशा वेड्यांना संरक्षण आणि बाकीच्यांना फाट्यावर मारणे चालु आहे... ऑर्डर काय आणु ?
तो - अरे हो.. वेड्यांचे चाळे चालुच रहाणार.. जवळ आला तर भादरुन काढु.. तोवर आपले चालु ठेवु
मी - मग काय... मागवा नेहमीचेच..
(पेग १ आगमन)
.
.
.
(पेग १ समाप्त)
तो - रिपीट...
मी - येस्स रिपीट...
(भाग १ समाप्त)
वर्गीकरण
ठीक
किती
राजे
हम्म.
वाचतो आहे
तरुण आहे रात्र अजुनी
लवकर आटपा
वाचेश्...
काय राजे
:)
राजे, एवढा