मात्र रात्रीची गोष्ट भाग २
लेखनप्रकार
मागील भाग - १
स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.
(पहिला पेग होवुन गेला आहे, वैचारीक चर्चा सुरू आहे अशी जागृत अवस्था अशातच पेग २ आगमन)
मी - घे ! फिश फ्राय चांगलं आहे... सध्या पिंडाचं गोळं खावुन खावुन वैतागला असशील..
तो- हं... काय करणार परंपरा असतात, त्या पाळाव्या लागतात... नाही पाळल्या तर बाप्पा ढुंगणावर टिमकी वाजवेल ना! बर ते जावु दे, ती हल्ली लिहित नाही...
मी - नाही लिहित... टिंगल होते म्हणे
तो - हं.. पुरषोत्तममधे गाजणारे नंतर समाजापुढे यायला घाबरतात हेच खरे
मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? तो बघ कसे वैचारीक लिहतो हल्ली..
तो - वैचारीक ? दे सोडुन, फार्मुला लेखन आहे ते
मी - फारमुल्ला ? तो कसा आहे
तो - फार जुना फार्मुला आहे.. मागल्या शतकात एका मोठ्या इतिहाससंशोधकाने वापरला होता, तसेच एका महान लेखिकेने वापरला होता.
मी - अरे पण आहे काय हा फारमुल्ला?
तो - सांगतो की ... समज अ, ब, क, ड या चार संख्या आहेत. अ हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध करायचेच असे आधीच ठरवायचे..
मी - हं.. बर..
तो- विविध संदर्भ वगैरे शोधुन, इकडुन तिकडुन पुरावे मिळवुन अ हा ब पेक्षा आणि क हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध करायचे.. शब्दांचे फुलोरे मांडुन, सजवुन लेख तयार करायचा आणि सगळ्यात शेवटी लिहायचे यावरुन सिद्ध होते अ हा ड पेक्षा लहान आहे... आहे काय आणि नाही काय ?
मी - अरे पण... ब हा क पेक्षा लहान आहे हे कोण सिद्ध करणार ? ते नको का करायला ?
तो- वेडाच आहेस. असे करायला लागल्यावर अ हा ड पेक्षा नेहमीच लहान आहे हे सिद्ध होत नाही ना ... कधी कधी अ हा ड पेक्षा मोठा असतो
मी - मग काय अर्थ ह्याला...
तो - तीच तर गंमत असते. ब हा क पेक्षा लहान आहे की नाही हे सिद्ध करायचेच नाही. त्याची अनेक कारणे असतात..
मी - काय काय ?
तो - एक तर काही वेळा ब हा क पेक्षा मोठा असतो त्यामुळे तसे मान्य केले तर अ हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध होत नाही, आणि करायचेच झाले तर खुप अभ्यास करावा लागतो, जो शक्य नसतो..
मी - हं.. अजुन..
तो - किंवा ब हा क पेक्षा लहान असला तरी क हा ड पेक्षा लहान आहे हे किंवा अ हा ब पेक्षा लहान आहे हे सिद्ध केलेले चुकीचे असते..
मी - हं..
तो - किंवा अ हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो.. कारण दिलेला संख्या क्रम गुणवत्तेच्या उतरत्या मुल्याने असतो...
मी - हं..
तो - किंवा अ, ब, क, ड ही तुलना करण्यायोग्यच नसतात, पण ओढुन ताणुन अ ची मानहानी करण्यासाठी केलेला हा उपद्व्याप असतो
मी - अच्छा असा सोपा फारमुल्ला असेल तर मी ही दोन चार वैचारीक लेखन पाडतो की..
तो - कशाला? थोडी फार इज्जत शिल्लक आहे तुझी ती का घालवतोस..
मी - मग काय करु ?
(पेग २ समाप्त)
तो - वैचारिक लेखन सोडुन बाकी काहीही कर .. हे तर चालुच रहाणार.. तोवर आपलं जहाल आणि मादक चालु ठेवु...खास परदेशी माल आहे
मी - मग काय...करा रिपीट..
तो - करा करा. सहज सहज होत असेल तर करा रिपीट...
मी - येस्स रिपीट... पण... सहजच परवानगी असेल तरच कारण दुस-या पेगानंतर जे जे बोलु ते रिपोर्ट हायकमांडला जातात ...
(भाग २ समाप्त)
वाचन
5342
प्रतिक्रिया
14