Skip to main content

पावलांचे सांगाती

पावलांचे सांगाती

Published on 08/09/2009 - 20:36 प्रकाशित मुखपृष्ठ
नाडीवरील धाग्यांनी अजीर्ण झालेल्यांना हलकासा सुंठवडा पावलांचे सांगाती देह देवाचे मंदीर म्हणायची पद्धत आहे. त्या मंदिराचा भार पावलावर असतो. बालपणात मऊमऊ तळव्यांच्या अनवाणी पावलांनी बागडणारे वाय जरा मोठे झाले की आपले सांगाती शोधायला लागतात. काहींना काटे-सराटे बोचल्याने् तर काहींना चिखल राड्यातून वाट काढायला लागल्याने बोटांच्या बेचक्यात काहीतरी सरकवून द्यावे लागते. आधी गरज नंतर शोभा म्हणून पावलांचे सांगाती जन्मभर जोडीने प्रवासाला बरोबर येतात. खडावा,पादुका, सपाता, वहाणा, जूता, शूज, सॅन्डल नावे बदलत राहतात. रंगरूप जीवनशैली प्रमाणे वरखाली होत जाते. पण संगत सुटत नाही. गडकऱ्यांच्या एकच प्याला नाटकात ते मजेने म्हणाले होते,कि पदवी व पत्नी एकदा चिकटली की जन्मभर चिकटते. सध्याच्याकाळात मात्र पत्नीशी झटपटकाडी मोड घेऊन जन्माची ब्याद मिटवता येते. तर बनावटी पदव्यांची पोल खुलली की पदवी देखील दुरावते. पावलांचा संगसाथ मात्र आजन्म राहतो. चपलांपासून जोडे झिजवायची उमर येईपर्यंत बापाच्या पायाला घट्टे पडतात. तोवर मुलीचे पाय टाचा उंचाऊन, नेलपॉलिश लाऊन रंगीत बनतात. पोषाखाची रंगसंगती साधायला, अनेक जोड घराची शोभा वाढवतात. कोल्हापुरी वहाणांचा बाज निराळा. करकर आवाज करणारी पायताणे घालून मोटार सायकलवर मांड टाकून उसाच्या फडातून वाट काढत, गर्दीच्या रस्त्यावरून जाताना बाचाबाचीत आवाज वाढवायची वेळ आली तर कानाखाली वाजवायला ती केंव्हाही हातात घेता येते. रस्यावरून जाणाऱ्या तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला वठणीवर आणायला उंच टांचांचे सॅन्डल शस्त्र म्हणून वापरायला येते. स्लिपर्स थोरामोठ्यांच्या घरात बाथरूम, बेडरूममधे राज्य चालवतात. गरिबाला ती सर्वत्र साथ देते. चकचकीत शूज मधला बॉस भाव खाऊन जातो. दणकट बुटांचे खाडखाड आवाज करत परेड करत जाणाऱ्या जवानांना पाहून ऊर भरून येतो. शूजशी मवाळ मोज्यांची गट्टी जमते. गमबुटात तेच मोजे पचपच झाले की एकएक पाऊल उचलणे दुरापास्त होते. नुकत्याच पडलेल्या बर्फावरून धिप्पाड स्नोशूजनी करकर करत चालायची मजा औरच. उन्हळ्यात मात्र घामोळलेल्या मोज्यांना काढताना नाक दाबुन घरावे लागत. पावलांचे लालित्य पहायचे तर बर्फावरील स्केटींग करताना सुंदर तरुण जोडीचे. नवख्यांना त्याच चाकांच्या स्केटशी चाळा कधी उताणा पाडेल याचा नेम नाही. आदिमानवापासून पावलांचे सांगाती वेगवेगळ्या रूपाने सजतात. तरूण चिरंजिवांच्या शूजचे हजाराचे आकडे ऐकले की बापाचा जीव थोडाथोडा होतो. काही काळाने त्याची पुढची पिढी त्याला सतावेल तेंव्हा मजा येईल, असे सांगून आई समजूत काढते. तेंव्हा बापालाही आपले तरुणपण आठवते.
लेखनप्रकार

याद्या 3341
प्रतिक्रिया 20

अहो विविध विषयांवरही चांगलं लिहिता येतं की हो तुम्हाला. ;) चांगलं लिहिलंय. मस्त आहे छोटेखानी लेख. असंच लिहित जा (नाडी व्यतिरिक्त). बिपिन कार्यकर्ते

In reply to by धनंजय

असेच म्हणतो. असेच बहारदार लेखन येवु द्या ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by दशानन

असेच म्हणतो स्फूट आवडले ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून ४२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "मेरा जुता है जापानी."

In reply to by ऋषिकेश

हेच म्हणतो.. मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.

तरूण चिरंजिवांच्या शूजचे हजाराचे आकडे ऐकले की बापाचा जीव थोडाथोडा होतो. काही काळाने त्याची पुढची पिढी त्याला सतावेल तेंव्हा मजा येईल, असे सांगून आई समजूत काढते. तेंव्हा बापालाही आपले तरुणपण आठवते.
ही ही .. मजेदार ... :) आता 'बुटाची नाडी' वगैरे सुमार कोट्या होतील असे भाकित करतो. पण बुटाची नाडी येथेच वापरल्याने ही कोटीतरी पुन्हा होणार नाही अशी आशा करतो. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

अहो नाडीवाले ओककाका, सुंदर लेख. ते तेवढे नाड्यांच्या गुंत्यात अडकून पडू नका. असेच ललित लिखाण करत रहा. पु.ले.शु. - चंबा

बिकांशी सहमत. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

एकदम हलकंफुलकं!! हे असंच लिहित चला.... बरं वाचायलाही! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

एकदम हलकंफुलकं!! हे असंच लिहित चला.... बरं वाचायलाही! +१ सुजय

मी तर म्हणतो ... तुम्ही णाडीवरंच लिहा हो काका ! तो तुमचा प्रांत आहे .. बाकी विषयांत तुम्ही हात घातलात तर उगाच उडप्याच्या हातचा वडापाव खाल्ल्यासारखं वाटतंय ! - नखशिकांत घोक

In reply to by टारझन

नाही हो काका ... तुम्ही हलकंफुलकंही चांगलं लिहीता. उगाच नाड्यांच्या गुतड्यात अडकून लेखनप्रतिभा गुंडाळून नका ठेवू! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पावलांच्या सांगात्यांमधून घेतलेला काळाचा वेध खूप आवडला. प्रत्येकालाच स्वत:चा एक आवाज, व्यक्तिमत्त्व असतंच...अगदी पायताणांनासुद्धा हे परत एकदा पटलं :)

ओक साहेब सुंदर स्फुट! आवडले ब्वॉ! जेथे जातो तेथे तु माझा सांगाती|| प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वा.. अनपेक्षित मजा आली... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी