Skip to main content

विरंगुळा

उन्हाळ्याची तयारी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 22/03/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते. म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्‍या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे. कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!

अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 22/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्, किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.

सावध ऐका (मागल्या) हाका!

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

कुंग फु पांडा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 22/03/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो. -- बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी. 'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.

रविवारची करमणूक.

लेखक रामदास यांनी रविवार, 21/03/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
चटपटीत मजेदार भेळ खाताना शेवटच्या घासासाठी खुसखुशीत पुरीचा एखादा तुकडा राखून ठेवावा तसा च एक कागदी संग्रह मी बनवतो आहे . त्यातीलच ही एक चित्र मालीका . निर्मीती काळ अंदाजे १९४९-५०. प्रकाशकीय हक्काचा अंदाज नाही पण प्रशासकीय हक्काचा आहे. संपादकांनी पुरेसा आस्वाद घेतल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही. मिपा सदस्यांना त्यांच्या व्यक्तीरेखेशी साम्य असलेल्या व्यक्ती या धाग्यात दिसल्यास तो केवळ योगायोग नाही. किंबहुना हे साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे असे म्हटल्यास मी अंमळ नाखुशीनंतर सहमती दर्शवीन

अर्ध्या तासाचा फरक

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 20/03/2010 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!

विजापुरचा अजब किस्सा

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 19/03/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे व्यवसायाच्या कामाअंतर्गत तिथल्या एका शेतकर्‍याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू. ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्‍यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली.