Skip to main content

विरंगुळा

शोलेची आग

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्या चित्रपटांविषयी - आवडत्या, नावडत्या, कमी प्रसिध्द, टुकार, भंगार आणि अजून काय काय, बराच काथ्याकूट चालू आहे. त्या चित्रपटांच्या यादीत एक ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस! शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते.

द नवाब ऑफ नजफ़गढ़!

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/04/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्‍या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!" पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्‍यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला.

मला आवडलेले काही (कमी किंवा अ प्रसिद्ध) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 15/04/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

दीन दयालु रामा : येशुदास व गायत्री

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 14/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामाच्या नावासरशी त्याच्याविषयीची अनेक गाणी, अनेक कथा, त्याची अनेक रूपे नजरेसमोर येतात. प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे निमित्त करून अनेक चित्रपटकारांनी आपल्या चित्रपटाच्या कथानकात अप्रत्यक्षपणे रामाचा आदर्श ठेवून, किंवा त्याला पूजनीय मानून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करणारे नायक दाखवले. त्या प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचं, कौटुंबिक सौहार्दाचं, केरळच्या नयनरम्य हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवणारं हे अजून एक गाणं..... येशूदास व गायत्री अशोकन् यांनी गायलेलं....रवींद्रन् यांनी स्वरबध्द केलेलं.... मामुट्टी ह्या समर्थ अभिनेत्यावर चित्रित केलेलं......

बाप आणि मुलगी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 13/04/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहायला मिळालेली एक सुरेख अ‍ॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी! ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!

मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 11/04/2010 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर पार्टी रे पार्टी पाहिल्यावर माझ्या मनात विचार सुरु झाले..... बिच्चारे पार्टीजीव!!! :S आधी पार्टी पार्टी करत ढोस ढोस ढोसतील आणि दुसर्‍या दिवशी डोकं धरून बसतील. मग दुखर्‍या डोक्यानं घरात बायको, पोरं, हापिसात हाताखालचे लोक आणि सहकारी ह्या सर्वांवर चिडचिडाट करतील.... सर्वांचाच दिवस खराब होऊन जाईल!!! : हँगओव्हर हा प्रकार टाळता येऊ शकतो असा सल्ला/ मत अनेक आहारतज्ञ व डॉक्टर्स प्रदर्शित करतात. त्याचे गमक तुम्ही मद्यपानाच्या अगोदर खाणे, मद्यपानादरम्यान पाणी पीत राहणे व मद्यपानानंतर काही ठराविक पथ्ये पाळणे [उदा.

मोनालिसाच्या बहिणी ?????

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 10/04/2010 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे अगदी लहानपणापासून संगीताचे बरे-वाईट संस्कार कळत नकळत घडत जात असले, तरी तसे चित्रकलेच्या बाबतीत मात्र होत नाही...... जगातल्या थोर चित्रकारांनी रंगवलेली काही चित्रे निदान डोळ्यांखालून जावीत, हा या धाग्याचा हेतु..... मोनालिसाच्या या बहिणी.....

मुद्राराक्षसाचे विनोद (संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/04/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत आहे, मी बनवलेल्या आत्तापर्यंयच्या "मुद्राराक्षसाच्या" विनोदांचा संग्रह !! प्रस्तावना: पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा. तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे.

अफलातून जाहिराती

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 08/04/2010 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती .... "व्यंगचित्रकाराच्या" मिस्कील तिरकस नजरेतून... वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही.... अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग.... मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा :-) ------- (1) जांभूळ छाप दंतमंजन - कमनीय शरिरयष्टीचे रहस्य! 'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो : "काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?" ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत.

ऑर्कुटिंग

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 08/04/2010 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे. पण ऑर्कुट आपल्या पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात. १. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २ दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात? २. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं? ३.