Skip to main content

विरंगुळा

<फालतू धागे आणि विडंबने>

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 16/02/2010 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात? तो - नाही ती - अरसिक कुठचा! तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;) ती - चूप्प . एकदम चूप्प!! तो - तुला कुठे विडंबने आवडतात? ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं? तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं ती - तुझी विडंबने लई खवट आहेत. तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत? तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :) ती - अजून काही?

मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती!

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 16/02/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेपी यांची 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा' ही लेखमाला वाचल्यावर सतत क्रिकेटवर काहीतरी लिहीण्याची खुमखुमी होत होती. आणि त्यात काल वीरू व सचिननं तर आज लक्ष्मण व धोनीनं शतकं झळकावून आयताच विषय पुढ्यात ठेवला! क्रिकेटवरचं लिखाण म्हणजे साहेबांचा उल्लेख हा आलाच! आमच्यासाठी ईशस्तवनच ते! साहेबांवर कितीही लिहीलं तरीही कमीच.. "निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू॥ अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥" हे शब्द आपल्या साहेबांच्या बाबतीतही लागू पडतात. गेली अडीच वर्षं तो उत्तम क्रिकेट खेळतोय आणि टीकाकारांना त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर आहे हे! एकामागून एक धावांचे आणि शतकांचे मैलाचे दगड ओलांडत चाललाय..

(ती अन तो )

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 16/02/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ दुवा ३ ती - इ..इ....नको ना. तो - नको काय नको ती - धसमुसळा कुठचा! तो - मी धसमुसळा तर तू कोण? ती - तिकडे शिरला बघ!! तो - आता काय करू? ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की. तो - तेच तर करतोय. ती - हो पण तुला तेच जमत नाही. तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू. ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का?

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....(आमचे मॅनेजमेंट गुरू)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 15/02/2010 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ आय टी मध्ये आल्यापासून खूप "जार्गन" ऐकायची सवय झालीये बघा. एकतर आपण स्वस्तात कामं करून देणारे नव्या जमान्याचे "बाबू" आहोत हे मान्य नसणारी (अथवा मान्य करायची इच्छा नसणारी) लोकं रात्रंदिवस शब्दकोष घेऊन आपल्या फुटकळ आत्मसन्मानाला गोंजारण्यासाठी असे जड-जड शब्द शोधून काढतात. प्रोजेक्टवर राबणारा इसम "रिसोर्स" असतो....

हिमेजी

लेखक नंदू यांनी रविवार, 14/02/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त जपानला (ओसाका) जाण्याचा योग आला. ओसाका विमानतळावरून काकोगावा शहरात पोहोचून हॉटेल मध्ये चेक-इन करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. हाच एक अर्धा दिवस साईट-सीइंगला मिळणार होता त्यामुळे वेळ न दवडता सरळ हिमेजीकडे प्रस्थान ठेवले. हिमेजी स्टेशन ओसाका पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि तिथून कासल चालत केवळ 20 मिनिटं. सुदैवाने आम्ही ज्यादिवशी तिथे गेलो तो दिवस जपानचा राष्ट्रीय खेळ दिवस (ऑक्टोबरचा दुसरा सोमवार) असूनही कासल पब्लिक व्हुइन्गसाठी ओपन होता. सोळाव्या शतकात शोगुन हिदेयोशीने बांधलेली ही इमारत आज वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केली आहे.

(नो एक्स्पेक्टेशन्स)

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 12/02/2010 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
ते - मी हाकलून देइपर्यंत काल गेला नाहीस? तो - तसं काही नाही. ते - तसच तस्सच. तो - तुला अता भ्रमच पोसायचा असेल तर .... ते - अ‍ॅ हॅ रे भ्रम! मग मी "चालते व्हा" ची खरड पाठवल्या पाठवल्या कसा गमन झालास? तो - योगायोग : ) ते - व्वा आम्ही मारे भ्रमात होतो आम्च्या खरडीचा एवढी वट आहे. तो - आपल्या भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल क्षमस्व. : P ते - ज्जा ... आता परत करणरच नाही खरड. तो - बघ आपलं काय ठरलं होत - नो एक्स्पेक्टेशन्स. तुम्ही डेव्हिएट होताय. ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. ;) ) तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) ....