Skip to main content

विरंगुळा

आम्रपाली

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/04/2010 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी! आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका आम्रतरूपाशी ठेवलेली सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली! इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली.

एक फिरकी अशीही!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 06/04/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कोणाची, कधी, कशी फिरकी घेईल ह्याचा नेम नसतो! आमच्या पूर्वीच्या घराच्या मालकीणबाई ह्या एरवी अतिशय चलाख, लबाड म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना कोणी सहसा उल्लू बनवू शकायचे नाही. पण एकदा त्यांच्या मैत्रिणीनेच त्यांची कशी फिरकी घेतली ह्याचा हा एक भारी व विनोदी किस्सा : मालकीणबाईंच्या थोरल्या लेकाचे लग्न झाले. भरपूर स्थळे आधी नाकारून झालेली. मालकीणबाईंना त्यांच्या लेकासाठी सर्वगुणसंपन्न आणि मुख्य म्हणजे श्रीमंताघरची सून हवी होती. मिळाली ती सून थोरा-मोठ्या घरची. तिचं माहेर अतिशय गर्भश्रीमंत, मुंबईच्या उच्चभ्रू वर्गातले. माहेरी खानदानी पण आधुनिक वातावरण.

आणखीन एक इडियट

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 05/04/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आणखीन एक इडियट... माझा जन्म झाल्यानंतर पहिलं मिनिटभर आमच्या पिताश्रींनी कौतुकाने स्वत:च्या काळ्याभोर, गुबगुबीत मिशांवर ताव मारला. त्या मिनिटभरांत माझा चेहेरा न्याहाळण्याऐवजी प्रथम मी मुलगा असल्याचा पुरावा न्याहाळला. खरं तर सोनोग्राफी व गर्भजल चिकित्सेनंतर त्यांनी नर्सला मिठाईच्या पुड्यातून दिलेल्या गांधीजींची चित्रं छापलेल्या कागदांमुळे 'पुढची अपॉईंटमेंट कधी, मंडेला की फ्रायडेला?' या प्रश्नाला खणखणीत, 'नक्की मंडेला या साहेब. मंडेलाच.' असं उत्तर मिळालं होतं. पण आमचे पिताश्री म्हणजे पक्के चार्वाकवादी. त्यात वकील. त्यांना शब्दप्रमाण मान्य नव्हतं.

अशी करावी काटकसर! ;-)

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 05/04/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! :) तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते.

चित्रपट पाहणे: घरी, चित्रपटगृहात आणि आता पुन्हा घरातच

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 05/04/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.

मिटींग - मिटींग

लेखक टारझन यांनी शनिवार, 03/04/2010 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स पिपल्स , डिस्क्लेमर्स : लेखात टेक्निकल बाबींचा उल्लेख असेल त्याचा खुलासा करण्यात येणार नाही. लेख एंजॉय करुन विसरायचा ! कळ्ळं ? आज गुरुवार.. उदया गुड फ्रायडे ची सुट्टी .. मोठ्ठा विकांत .. पुण्याला घरी पळण्याचे वेध प्रत्येक मुंबैत जॉब करणार्‍याला लागलेले असतात. लंच नंतर कसला ही काम करायचा मुड नसतो. आणि एका मिटींगचा कॉल येतो. मी एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करतो जी बँकांसाठी सॉफ्टवेयर सर्व्हिस देते. आणि ऑनसाईट पाठवल्याने मी बँकेच्या आयटी सेंटरात बसतो. मोठ्या सरकारी बँकांत प्रोजेक्ट्स खुप मोठे असतात आणि खुप वेगवेगळे सॉफ्टवेयर व्हेंडर्स , टिम्स आणि डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात.

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

हरवलेले सुख - वाढदिवस

लेखक आनंदयात्री यांनी शुक्रवार, 02/04/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आई माझा वाढदिवस कधी येणार गं ?" "अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की.

मनातला मोगरा

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यातील सायंकाळी शीतल वार्‍याच्या झुळुकेच्या प्रतीक्षेत असावं आणि कोपर्‍यावरून ती हवीहवीशी वाटणारी हाळी यावी.....''मोगरा आला मोगरा , ताजा ताजा मोगरा.....'' नकळत श्वास आता कधीही तो मदमस्त करणारा मनमोहक सुगंध लडिवाळपणे साद घालेल या विचारानेच अलवार होतो ....