Skip to main content

महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान्........रायरेश्वर!!!!!!!!

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 03/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या महाराष्ट्रात ज्याला रायरेश्वर माहिती नाही असा माणूस विरळा. जर कोणी असेल तर तो कमनशिबिच.... मी रायरेश्वरला आजवर दोनदा गेलो. माझ्या सुदैवाने म्हणा किंवा मित्रांच्या दुर्दैवाने, दोन्ही वेळेस एकटाच होतो. या वेळेस मुक्काम करायचा ठरवला. थोडे तहान्-भूक लाडू घेउन आणि नेहमीच सोबत करणारा दोस्त्....माझा Camera. सन्ध्याकाळी ४.३० ला बाईक ने पायथा गाठला आणि माझा फोटोग्राफीक प्रवास सुरू झाला. माझा मीच असल्यामुळे कोणी टोकणारे नव्हते. रमतगमत, नीरव शांतता पीत (क्लिक हा आवाज सोडल्यास) मी निघालो. (शिवाय गडावर महाराज आणि मावळे होतेच :)). रात्री पुजार्‍याकडेच मुक्काम केला. गरमागरम भाकरी आणि झोपायला पलंग १००/- मधे मिळाला. रात्रीची मऊ हवा पीत आणि पिठूर चांदणे बघत शान्त झोप झाली पण थोडीच. सकाळी उजाडायच्या आत जवळ्च्या टेकाडावर Camera मांडून बसलो. तर या फोटोग्राफीक मेडीटेशन मधे जे काही मिळाले ते असे.... गडाची वाट.... शीडी रायरेश्वराचे देऊळ........ रम्य पहाट्........मागे केंजळगड.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5449
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

शेवटून दुसरे छायाचित्र अप्रतिम ! गडावर गाडी कुठवर जाते कळू शकेल काय ? :?

In reply to by स्वतन्त्र

वाईकडून एक गाडीरस्ता आहे तो बर्‍यापैकी वर आणतो. मी कधी गेलो नाही. मी कोर्ले गावातून पायी गेलो. पुणे-भोर आणि भोर-कोर्ले अशी एस्-टी सेवा उपल्बध आहे. स्वतःचे वाहन नेणे उत्तम....

In reply to by किल्लेदार

धन्यवाद ! आभारी आहे ! या पावसाळ्यात जाण्याचा नक्की प्रयत्न करेल !

सुंदर छायाचित्रे! किल्ला पण प्रत्यक्ष बघायला आवडेल. शेवटचे छायाचित्र फोटोशॉप अथवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून येथे दाखवले आहे का कुठल्याही संपादनाविना? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by किल्लेदार

मग तर फारच छान! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मस्त प्रकाशचित्रे!!!

नितांत सुंदर फोटोज! आभाळाचे इतके सुन्दर फोटोज मला पहिल्यांदाच पहायला मिळाले. माहिती सुद्धा चांगली आहे.

अप्रतिम फोटो, खूप आवडले. बर्‍याचदा गेलीय, पण तुमच्याकडचे फोटो फारच उच्च आहेत पुष्करिणी

असा निळा रंग आकाशाचा फोटोत क्वचित पकडता येतो.. मस्त

अप्रतिम रे किल्लेदारा !!! बिपिन कार्यकर्ते

मस्त फोटो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्लास! आळश्यांचा राजा