जशी रंग बोटांवर ठेवून... - १
3
विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.
ऐन दिवाळीतले दिवस ..सगळीकडे फटाकड्यानचा आवाज. नुस्त वातावरण एकदम तजेलदार . दारादारात रांगोळ्यांचे सडे ..आकश्कन्दिलान्चा हलकासा प्रकाश . सगळ उजळून निघाल होत .वहिनीही नुकतीच रांगोळी काढून घरात आली होती .स्वयंपाक घरात ..काहीतरी चालू होत तीच आणि आईच .दिवाळीची बहुतेक दुसरी संध्याकाळ असावी .आईने दारात खिडक्यांवर ..देवघरात ..अगदी सगळीकडे पणत्या लावल्या होत्या . बाबा नेहेमीप्रमाणे पेपर वाचण्यात मग्न .
आमची प्रेरणा: https://www.misalpav.com/node/20789
आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी त्याने अवकाळी पावसासारखे पिंग केल्याचे आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही.
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.
समुद्राची गाज ऐकणे हा तुझा आवडीचा छंदच होता म्हणा ना. आपण कॉलेजचे तास बंक करून समुद्रकिनार्यावर गाज ऐकत तासनतास घालवले आहेत. तुला समुद्र आणि आकाशाच्या शांत नीळाईची ओढ असायची. समुद्राचा धीरगंभीर आणि मर्यादाशील स्वभाव तुला आकर्षित करायचे.
याउलट समुद्रपक्षांची झेप, नारळीची झाडे, भणाणणारा खारा वारा हे माझे वीक पॉईंट्स असत. मला आकर्षक वाटणारी अजून एक गोष्ट जी केवळ माझ्या हट्टाखातर तू करत असे ती म्हणजे - चपला हातात धरून, मऊ मखमली रेतीतून चालणे.
आमची प्रेरणा- https://www.misalpav.com/node/20732
आपल्या अंतरजालीयं अंतरमनात अनेक आय.डी. भेटतात.असेच आमच्या एका अंतर जालीय ताय.डी ने आंम्हाला काही जुने आय.डी/डु.आय.डी सांगितले होते...
ओळखा बरे...
१)डु-मॅन डू-मॅनी...नक्की खर्या,किती जणी..?
२)इवलासा धागा त्याला प्रतिक्रीया अपार
३)वरुन पाहिलं तर नुसताच शिमगा,खालुन पाहिलं तर नाडिचा लेंगा,या बोअरिंगचे नाव काय सांगा..?
तुमच्या अंतरमनातले आय.डी.पण सांगा...पण थांबा...हे वरचे खरे का..? ;-)
आपल्या रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात. असेच माझ्या एका मैत्रिणीची आईने आम्हाला काही जुनी ग्रामीण कोडी सांगितली होती. सोडवा बरे.....
१.) हुमान हुमनी नाकात चिमणी.
२.) इवलेसे झाड त्याला घुंगरांचा भार.
३.) वरुन चालतो तांगडतिंगा, खालून चालतो धांगडधिंगा, मधल्या नारीचे नाव काय सांगा?
तुमच्याकडे असलेली कोडी पण सांगा बरे का.