Skip to main content

!!......" चिवड्यात लाडू "........!!

!!......" चिवड्यात लाडू "........!!

Published on शनीवार, 25/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
ऐन दिवाळीतले दिवस ..सगळीकडे फटाकड्यानचा आवाज. नुस्त वातावरण एकदम तजेलदार . दारादारात रांगोळ्यांचे सडे ..आकश्कन्दिलान्चा हलकासा प्रकाश . सगळ उजळून निघाल होत .वहिनीही नुकतीच रांगोळी काढून घरात आली होती .स्वयंपाक घरात ..काहीतरी चालू होत तीच आणि आईच .दिवाळीची बहुतेक दुसरी संध्याकाळ असावी .आईने दारात खिडक्यांवर ..देवघरात ..अगदी सगळीकडे पणत्या लावल्या होत्या . बाबा नेहेमीप्रमाणे पेपर वाचण्यात मग्न . इतक्यात तन्तन करतच दादा घरात घुसला .लाल बुंद डोळे ..तसा दादा चीड्काच ..पण असा अवतार फार फार चिडल्यावर व्हायचा .बाबांनी चष्म्यातून हळूच नजर वर डोकावून आणि पेपर दोन बोट दुमडून दाद्याकडे बघितल . आणि "काहीच झाल नाही ...हे तर रोजचच " म्हणून पुन्हा पेपरात डोक खुपसल .वाहिनी दाद्याची आदळा आपट ऐकून धावतच बाहेर आली , तेही ...." आज पण भाजी खारट झाली बहुतेक " अस मनातल्या मनात बडबडतच . दादाचा चेहेरा बघून ..तिला सॉलिड टेन्शन आल. म्हणाली " अहो थोडसच घातल होत ..पण चमचा बदललाय ना ..म्हणून मग ..नाही म्हटल तरी जास्तच पडतंय " ...चेहेर्यावर जग बुडी झाल्यासारखं टेन्शन होत वाहिनीच्या . दादू काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . लालबुंद झालेला दाद्या मग भडाभडा बोलू लागला ... " स्वतःला समजते काय ..मला ?मला चिवड्यात लाडू म्हणते ?.......अरे नसत एखाद्याच नशीब भरगच्च केसांच ..मग काय त्याला अस हिणवायचं ? हे हे लोक स्वताहाला समजतात काय .. ..पण ”चिवड्यात लाडू” ?...श्या ......" आई बाबा वाहिनी मोठ्ठा आ वासून पाहू लागले .हसावं कि चिडाव ..काही एक समजत नव्हत .पण वाहिनीला आवरलच नाही ... साडीच्या पदराने तोंड झाकून घेवून तिने खुदू खुदू करायला सुरुवात केली . पाठोपाठ आई आणि बाबा . दादा टकामका सगळ्यांच्या तोंडाकडे पहात राहिला .फारच नर्वस झाला . मग मात्र आईच मन पाझरल ..थोड हसू थाबवून म्हणाली " हे सगळ त्या शकूच कारस्थान असणार ..कार्टी का छळ्तेय माझ्या पोराला काही कळत नाही ..थांब जातेच तिच्याकडे ." आईच्या एव्ढू श्या वाक्याने दादाला मात्र धीर आला . मग सगळ वातावरण निवळल . शकू अशीच होती .खालच्या माळ्यावर रहायची . तिचा दादावर डोळा होता .पण दादाने तिला माशीसारख झटकून वाहिनीशी लग्न केल .तेव्हापासून ती अशीच त्याला टोमणे मारायची ..जिथे दिसेल तिथे शकू दादाला छेडायची .दादा तिच्याशी लग्न करणार नाही हे माहित असतानाही शकू त्याला मुद्दाम त्रास द्यायची .. छेड काढण्यात शकू मुलानाही मागे टाकायची . दादा मस्त ह्यांडसम ..गोरा उंच ..धारधार नाक पण केसांच्या बाबतीत तुरळक तुरळक नावाची पावूल वाट चालत होता .आणि एक दिवस हि पावूलवाट ..अर्ध्या टक्कल नावाच्या ठिकाणी येवून थांबली होती ... ऐन पस्तिशीत दाद्याच्या डोक्यावर झालर तयार झाली होती .दादाने कधी एवढ लक्षच दिल नाही ..त्याच्याकडे सगळ्या बाजू प्लस मध्ये होत्या .लग्नासाठी लागणार महत्वाच अस बरच डेटा मटेरीअल त्याच्याकडे होत ..त्यामुळे त्याला कधी जाणवलच नाही कि केस विरळ होत चाललेत आणि त्यावर उपचार करावा म्हणून . लग्नात बर्यापाकी केस होते .पण लग्नानंतर दोन ते तीन वर्षातच दादा जरीच्या किनारीसारखी झालर घेवून चकचकीत चांद दाखवू लागला होता . बास शकूला एवढ कारण पुरेस होत .हीच शकू वाहिनीची चांगली मैत्रीण होती .दोघींचं बरच हितगुज चालायचं .वाहिनीला माहित होत कि शकू दादाला छेडत असते ..पण दादा तिला अजिबात भाव देत नाही ...वाहिनीला ह्याच गोष्टींची मजा वाटायची . रात्री दादा बराचवेळ आरश्यासमोर उभ राहून स्वतःला न्याहाळत होता . मुंडी खाली घालून चोरट्या नजरेने डोक्याच्या शेवटच्या भागापर्यंत नजरमारायचं काम चालू होत . इकडून तिकडून सगळीकडन डोक्याची पहाणी चालू होती ..शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टर जस स्ट्रेचर वरच्या पेशंटची पहाणी करतो ना .काहीशी ह्याच प्रकारात मोडणारी पहाणी . वाहिनीला सारखे सारखे ते शब्द आठवत होते ....पण हसल तर दाद्याला वाईट वाटेल . म्हणून मग तोंड दाबून ..चोरून चोरून हसत होती .पण हसत होतीच . दुसर्या दिवशी सकाळी दादा ऑफिसला निघाला .नेहेमीसारखच सगळ निवांत निवांत होत . " डब्याला काय दिलंयस ग " आईला विचारताच ती पटकन म्हणाली "आज पडवळी ची सुकी भाजी आहे" ... त्यावर " तुला माहितीय ना मला आवडत नाही ती .. श्या ..आठवड्यातून दोन ते तीन वेळा ती पडवळ ...... दिवाळीच्या दिवसात तरी बदला रे हे सगळ ".पुन्हा वैतागला ..तसही त्याच वैतागन काही नवीन नव्हत . ... सवय झाली होती त्यालाही आणि घरातल्यानाही .इतक्यात हळूच आतून आवाज आला .. " मग चिवडा आणि लाडू नेताय का डब्यात ". ;) ह्या वाक्यावरून घरात सगळ्यांनीच एकमेकांना दात दाखवले ..आणि दादा पुन्हा चिडून ऑफिसला पळाला . दुपारी आई शकुच्या घरी गेली .शकू जाम चाप्टर . आईलां बघताच लक्षात आल तिच्या .सगळी उत्तर तयार ठेवली होती .शकुच्या घरच्यांचे आणि आमचे तसे खेळीमेळी संबंध होते .त्यामुळे ह्या गोष्टीचा दादा एवढा इशू कुणीही करणार नव्हत .तरीही आईने तिला हटकल .. " काय ग ..उगाच का मधूला त्रास देतेस .....का त्याला काल चिवड्यात लाडू म्हणालीस?". तरबेज शकुने सेकंदाचीही वाट न बघता लगेच तोंड उघडल " ये ल्ले काकू ... मध्या नाकासमोरून चालतो पण कान मात्र सगळीकडे . आणि ते चिवड्यात लाडूच म्हणत असशील ना तर ..मी बाजूच्या बेंद्रे मामिना सांगत होती कि ..आज आईने चिवडा केला अन चिवड्यात लाडू हि उरकून घेतले ....त्याचा आणि मध्याच्या लाडूचा काहीच संबंध नव्हता खर तर ..पण आत्ता मात्र मी लावणार ..बाय द वे .. काकू मध्याचा एवढ्यातच कसा काय ग चांद उगवला ..निदान पंचेचाळीशी पर्यंत तरी केस टिकवून ठेवायचे होते .....बायको लय डोक खाते का ग त्याच ?". शकुने तीन इंचाची बत्तीशी सहा इंचाची करून दाखवली ..भले मोठे सुळे बाहेर काढले .आणि घोगर्या अवजात्ल अक्राळ विक्राळ अस काहीस हसून दाखवल .आईने कपाळा वरच्या आठ्या तशाच प्रश्नार्थक ठेवून शकुच्या कुटुंबियांचा निरोप घेतला . त्याच दिवशी संध्याकाळी ओफ्फिस्वरून येताना दादा काहीतरी खरेदी करून आल्याच जाणवल .कुणालाही काहीही न दाखवता सरळ बेड रूम गाठला .रात्री मग त्याने आपल बोजक उघडल ... त्यात बरेच हेअर ओईल्स आणि हेअर फॉंल वरची मेडिसिन्स होती .कसलेतरी लेप पण होते रात्री झोपताना तुळतुळीत झालेल्या भागावर लावून झोपायचं आणि मग सकाळी उटून दिलेल्या आयुर्वेदिक औषधी शाम्पूनेच डोक धुवायच ,आणि मग त्यावर तश्याच प्रकारच्या औषधी तेलान हलक्स मालिश करायचं ...हे सगळ त्या लाडूवर बर का .. कारण चिवडा बर्यापैकी हेल्दी होता .:P सगळी औषध नीट ठेवून त्यावरचे इन्स्ट्रकशंस वाचून ..दादा रात्री दोन वाजेपर्यंत गुगलिंग करत होता . बर्याच डॉक्टरांचे पत्ते ....मग काहींचे रीविव्झ ..आणि शेवटी हेअर ट्रान्सप्लांट इथपर्यंत इत्यंभूत माहिती शोधून त्याच्या लिंक सेव करून ठेवल्या . भलतच मनावर घेतल होत त्यान ..दाद्याचे चाळे वाहिनी शांतपणे बघत होती आणि मुद्दाम रोज सकाळी .... चीव्ड्याने भरलेली डीश ..त्याच्या मध्यभागी एक लाडू ठेवून त्याच्यासमोर ठेवत होती . भारी आयडीया होती तिची . अर्थात कोणत्या स्त्रीला भरगच्च केस असणारा नवरा नको असतो?.....नसले तरी निदान आहेत त्यांची तरी काळजी घेवून ते टिक्वावेत एवढ तरी तिला नक्कीच वाटत असत . त्यातल्या त्यात ..एखाद्याच पार सपाट चकटफू झाल असेल तर त्याने निदान उपचारांचे प्रयत्न तरी करावेत . असहि वाटत असेल .बहुदा ..नक्की नाही हा ..पण वाहिनीलाही अस वाटत असावं .....ती बोलत नव्हती ..पण कृती मात्र सॉलिड होती तिची .. शकुच्या ह्या शब्दान दादाच्या डोक्यातला भुंगा मात्र जाम खवळला होता. अगदी बघावं तेव्हा दादा काहीतरी शोधत असल्यासारखा जाणवायचा .घरातल्याना साधं " खोया खोया चांद ..खुला असमान ..." असली साधी गाणी म्हणायला पण बंदी घातली गेली .शकू दिसली कि दादाच्या हलक्या फुलक्या ज्यावर केसांचही जास्त वजन नव्हत ..अश्या मस्तकात्न एक कळ यायची ..जी डायरेक्ट त्याला गुग्ल्वरच घेवून जायची .काही म्हणा नवरा टाळू वरती केस उगवण्यासाठी जी मेहेनत घेत होता त्याला वहिनीची लपून छपून साथ होती . दादाच्या टकलावर लेप लावायचं ..शाम्पू नेवून द्यायचं धुवून झाल्यानंतर.... झालर पुसून झाल्यानंतर ...हलक्स तेल मालिश करायचं ..हि सगळी काम वहिनीआनंदाने करत होती .शेतकरी कसा खतपाणी घातल्यानंतर पावसाची वाट बघतो ...पावूस पडल्यावर ..पिक येण्याची वाट बघतो ..अगदी तसेच दादा वहिनी ओसाड जमिनीवर म्हणजेच तुळतुळीत भागावर हरित क्रांतीची स्वप्न बघत होते ..:P मग अचानक एक दिवस दुपारी एक मोठ्ठा box कुरियरने घरी आला ..त्याच बिल ओनलायीन पेड झालेल .तब्बल सात हजाराच्या पेड बिलाचा भल्ला मोठा कागद हातात धरून बाबांनी तो कपाळाला लावला . आईने आणि वाहिनीने बॉक्स खोलायचा ठरवला ...पण दाद्या किती चीड्कां आहे हे सगळ्यांनाच माहित होत .म्हणून वहिनी म्हणाली " फोन करून विचारुया ..काय ऑर्डर केल होत ते ..आणि म्हणाले फोड तरच फोडू "....सगळ्यांना पटल. पण दादुल्या फोनवरच गरजला ..म्हणाला " मी घरीच येणार आहे ..माझ्या नावान आलाय ना ..मग थांबा जरा ."\( झाल उत्सुकता ताणली सगळ्यांची .दादुल्या खुशीतच घरी आला ..आल्या आल्या ..... " चहा ssssssssssss " करत ओरडणारा दादा ..तडक बॉक्स च्या शोधात . बॉक्स खोलून त्यातले एकेक ऐवज बाहेर निघू लागले . सगळ्यांनी गर्दी केली बघायला . दादा एकेक बाटली बाहेर काढत होता ..बरीच प्याक्बंद पाकीट बाहेर काढून झाली ..छोट्या मोठ्या साइझची बरीचशी अवजार काढून झाली .आणि आजूबाजूची गर्दी पांगली .आता दादा एकटाच ...हातपाय धून ..चहा ..त्याबरोबर खान ...गप्पा मारण दाद्या विसरूनच गेला होता . पण वहिनी त्याला डिस्टर्ब करायची नाही .दादा खूप मेहेनत घेत होता .एक ना एक दिवस फळ लागेल आणि तेही तुळतुळीत ..चकचकीत ..झालेल्या भागाला ..ह्या आशेवर दादा होता .पण काही दिवसांनी दादाच्या अश्या वेगवेळ्या औषधांच्या एकत्रित उपचाराचा ..काहीतरी भलताच परिणाम दिसू लागला . त्याला साइड इफेक्ट जाणवू लागले . डोक दुखन ...झोप येन .....अस्वस्थ वाटण..अस बरचस. आणि अजून एक गोष्ट घडली होती .टकल्यावरची तुकतुकीत कातडी साधारण काळी पडली होती ..पण दादाच म्हणन होत की ..हा साधारण फरक आहे ..कदाचित केस येण्याची पहिली पायरी असावी .मग एक दिवस जेवताना बाबांचं अचानक लक्ष गेल, दादाचा लाडू ..बुंदीच्या लाडवा सारखा दाणेदार दिसत होता बारीक बारीक पुरळ ...आणि स्कीन साधारण काळी .. " अरे मधु .. औषध केस उगवायच होत कि पुरळ ?". . "बाबा ..अहो असच होणार ना सुरुवातीला ..बघू एवढे दिवस वाट पाहतोय थोड अजून ....".:( दादाची आशावादी नजर ..बाबांना अंतर्मुख करून गेली ..कारण त्याच्या चंद्रावर कधीच पाणी आणि जीव निर्माण होणार नाही हे बाबांना चांगलच माहित होत . बाबांच्याच कधी झाली नाही ती त्याच्या काय होणार ..बहुतेक हा निष्कर्ष त्या मागे असावा. दादाची आणि बाबांची केश कहानी सारखीच होती .समदुखी म्हणा हव तर . रविवारच्या दुपारी दादा नुकताच त्याच लेप..शाम्पू ..मसाज आटपून सहजच पेपर वाचत बसला होता .अचानक त्याच्या डोक्यावर मध्यभागी जिथे चकोटा होता तिथे खाज होऊ लागली. हे सगळे त्या औषधांचे साईड इफेक्ट्स होते ..पण त्याला पटत नव्हत ...मग वाहिनीन तासभर मेथ्याच्या बिया पाण्यात भिजवून मग त्या काढून त्याच उरलेलं पाणी ..त्यात कापूस भिजवून दादाच्या काळ्या पडलेल्या आणि थोड्या पुरळ वाटणाऱ्या स्किनवर लावला होता . इतक्यात शकूच आगमन झाल . तिची नजर दादाकडे गेली ....आणि जोरात आईला हाक मारून म्हणाली .... " काकू लाडवाला बुरशी लागलीय वाटत तुझ्या ....." बास दादाने अशी खुन्नस दिली .. कि शकू पुढे म्हणाली .." मध्या तुझ्या लाडवाच नाय म्हणतय रे ..काल तुझी बायको घरी फराळ द्यायला आली होती ..त्यातल्या लाडवा बद्दल म्हणतेय ... चिवड्याला बाकी भारीच रंग आलाय तुझ्या ...आय मीन तुमच्या ....तांबूस तांबूस रांगाच केशर पण टाकल होत का त्यात "....आणि पुन्हा तोंडातली अवजार दाखवून दादाकडे बघून हसली ....दादा काही म्हणायच्या आत शकू पसार ..:P ह्या सगळ्या औषधांमुळे दादाच्या झालरीवर तांबूस रंगाचा शिडकावा झाला होता .. दादाला शकूच सगळ बोलन कळल होत ....पण काही सुन्वाय्च्या आत पळून गेली होती ..हेही तितकच सत्य म्हणून दाद्या चिडून गप्प बसला होता .पण हल्ली त्याच हे चिडचिड करण...अस्वस्थ होण ..डोळे दुखन ..डोक दुखन वाढल होत .. ओन्लायीन मागवलेली औषधं त्याला थोडी भारी पडत होती .आत्ता मात्र वाहिनीला काळजी वाटायला लागली .दादाच्या डोक्यावरच्या स्कीनला जखम झाल्याच जाणवत होत . डॉक्टरांकडे जायचं सुचवलं तर दादा तयार होईना .तो अजून त्याच समजुतीत होता कि हे केस येण्याची पहिली स्टेज आहे . माणसाच आशावादी असण कधी कधी फार धोक्याच ठरू शकत ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे दादुल्या . वाहिनीला वाटू लागल हे आता अति होऊ लागलय ...लाजेमुळे डॉक्टर चे सल्ले न घेताच औषधं खाण... external medicines वापरण ....कितीतरी धोक्याच आहे .भले नेट वर वाचून ..लोकांची मत वाचून का असेना ..पण सगळ्यांना सूट होतीलच अस नाही ... दादाच्या चिडक्या ,हट्टी स्वभामुळे ..त्याला जबरदस्तीन डॉक्टरकडे नेनही शक्य नव्हत ,त्यामुळे हे सगळ इथेच थांबायला हव . रात्रीच्या शांततेत ....दादा ग्यालरीत शतपावली करत होता ..वाहिनी सार आटोपून तिथे गेली . दादाला थोड रील्याक्स बघून तिला बर वाटल . कट्ट्याला टेकून बोलन छेडाव म्हणून ... " हवेत गारवा आहे नाई आज ...... आज चंद्र अगदी सुंदर दिसतोय ".... त्यावर दादाच्या शतपाव्ल्या झपकन थांबल्या एक नजर वाहिनीकडे मारून म्हणाला " आता तुही अस बोलायला लागलीस?" दादाला हल्ली अजिबात सहन होत नव्हत ..त्याला प्रत्येकाच्या बोलण्यात उपहास जाणवायचा . कुणावरही विश्वास ठेवायचा नाही ....त्याची मनस्थिती खूपच विचित्र झाली होती ..कुणी साध्या गोष्टींच किती मनाला लावून घेत ..हे बोलणार्याला कळत नाही ...पण दादा जितका चिडका होता ..मनान तितकाच हळवा होता .वाहिनीला त्याला ह्याच मनस्थितीतून बाहेर काढायचं होत . " माझ तुमच्यावर प्रेम आहे ..तुमच्या बाह्यरूपापेक्षा ..मी तुमच्या विचारांवर ..तुमच्या वाग्न्याबोल्न्यावर...तुमच्या मनावर जास्त प्रेम करते ..कबूल आहे ..कि क्षणभर मलाही वाटून गेल , उपचारान केस येतील ...मोह नाही आवरता आला ..पण त्यासाठी मी माझ प्रेम अस होरपळ ताना नाही बघू शकत . तुम्ही केले तवढे उपाय पुरेसे आहेत .. पण मला आता त्याची गरज नाही वाटत ..करण हे सगळ होत असताना ..एक गोष्ट कळली कि प्रेमाला बाह्यरूपापेक्षाही अंतर्मनाची साथ जास्त हवी असते ..वरून गोड दिसणार फळ नेहेमीच आतून चांगल असेल अस नाही ..फळाचा आतला गाभा चांगला असावा ..मग ते फळ वरून कस का दिसेना ..ह्या गोष्टीला मी महत्व देते . " एवढच बोलून वाहिनी झोपायला निघून गेली . बराच वेळ दादा ग्यालारीतून मग त्या चंद्राकडे एकटक नजर लावून बसला ....अगदी एकटाच .. कदाचित कधी पहाट होतेय ..अन मी पुन्हा माझ्या जुन्या track वर येतोय ..याची वाट पहात ..!!.. **************************************************************
लेखनप्रकार

याद्या 4944
प्रतिक्रिया 18

मस्त खुसखुशित लेख. विरामचिन्हांचा वापर थोडा कमीच करा पण.

चिवडा आणि लाडू बेस्ट काम्बिनेशन , तिखट आणि गोड ,एकदम फर्मास.

फक्कड. श न्ना नवरें ची आठवण झाली.

In reply to by राजघराणं

चिवडा आणि लाडूची कल्पनाच भन्नाट आहे!

कथा मजेशीर आहे. 'मनुष्याच्या बाह्यरूपावर जाऊ नये' या विषयावर समुपदेशन करण्याचा लेखिकेचा दृष्टीकोन दिसतो. (मागे मिशांवर कथा होती - आता टकलावर.)

आमचा लाडू वाढत चाललाय.

अगदी दिवाळीच्या फराळासारखी खमंग भट्टी जमून आली आहे. - (खुसखुशीत) सोकाजी