जशी रंग बोटांवर ठेवून... - १
रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते एव्हाना. अश्विन थकून बेडवर आडवा झाला होता. वाढदिवस असल्यामुळे ऑफीसला सुट्टी जरी होती तरी दिवसभर विश करणार्या कॉल्सना उत्तरे देऊन आणि संध्याकाळी ऑफीसमधल्या अगदी जीवाभावाच्या मित्रांसोबत हेवी डीनर केल्यामुळे त्याला एग्झॉस्ट झाल्यासारखे वाटत होते. दिवस संपल्यात जमा होता. आता कुणी कॉल करण्याची किंवा मेसेज करण्याची शक्यता नव्हती. म्हणून शांतपणे डोळे मिटून झोप येण्याची वाट पाहत होता. इतक्यात त्याच्या मोबाईलवर दोन वेळा बीप झालं. कुणाचातरी मेसेज आला होता नाईलाजानेच अश्विन कुशीवर वळला. हात थोडासा लांब करुन त्याने साईड टेबलवरचा मोबाईल उचलून कोणाचा मेसेज आहे हे पाहिलं.
"श्रेया..." एक हलकासा उसासा त्याने सोडला. चेहर्यावर मंद स्मित उमटलं.
"सॉरी, थोडा उशीराच मेसेज करत आहे बर्थडे विश करण्यासाठी. फेसबुकवरील पोस्ट्स पाहून कळलं की तुझा आज बर्थडे आहे. एनीवेज, बीलेटेड हॅप्पी बर्थडे". त्याने रीप्लाय ऑप्शन सिलेक्ट करुन थँक्स म्हणून उत्तर पाठवून दिलं. अन स्वतः मात्र भूतकाळात हरवून गेला.
साधारण सहा सात महिन्यांपूर्वीची गोष्ट. मॅट्रीमोनी पोर्टलवर इकडे तिकडे चाळाचाळ करत असताना श्रेयाचं प्रोफाईल त्याच्या नजरेस पडलं होतं. पुण्याची होती ती. वयानं त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेली. त्याच्यासारखीच संगणक अभियांत्रिकीमधून बी ई झालेली. बी ई नंतर तिने एचआर मधून एमबीए केलं होतं आणि आता पुण्याच्याच एका नामांकित आयटी कंपनीच्या रिक्रुटमेंट डीपार्टमेंटला सिनियर रिक्रूटर म्हणून काम करत होती. दिसायलाही छान होती. त्या मॅट्रीमोनी साईटचा "एक्स्प्रेस इंटरेस्ट" ऑप्शन वापरायला हरकत नव्हती. पण एक प्रश्न त्याच्या मनात असा चमकून गेला की ही आपल्या इंटरेस्टला प्रतिसाद देईल का? म्हणजे त्याच्यात काही कमी होतं अशातला भाग नव्हता. ईंजिनीयरींग नंतर त्याने सी डॅ़क मुंबईच्या जुहू सेंटरमधून अॅडव्हान्स्ड पी जी केलं होतं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आता बँकांच्या एटीम मशीनध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर बनवणार्या एका मल्टीनॅशनलमध्ये प्रोग्रामर अॅनालिस्ट म्हणून काम करत होता. मजबूत पगार होता. नुकतीच स्विफ्ट डीझायर घेतली होती. पासपोर्टवर दोन वेळा ऑस्ट्रेलिया वारी झाल्याचे ठप्पे होते. पण एव्हढं सारं असूनही मुलगी पाहायला सुरुवात करुन आता दोन वर्ष होउनही मनासारखी मुलगी भेटत नव्हती. त्यामुळेच हल्ली हल्ली त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता.
हो नाही करता करता त्याने मनाचा हिय्या करुन श्रेयाच्या प्रोफाईलवरचं "एक्स्प्रेस इंटरेस्ट" बटन क्लिक केलं. पेड मेंबर असल्यामुळे तिचे कॉन्टॅक्ट डीटेल्स पाहून घेतले. आई बाबांना तिचे कॉन्टॅक्ट डीटेल्स देऊन फोन करायला लावण्यापेक्षा आधी ती आपल्या "इंटरेस्ट"ला प्रतिसाद देते का ते पाहूया असं म्हणून त्याने दोन तीन दिवस थांबायचे ठरवले. रोज संध्याकाळी घरी येऊन फ्रेश होत असे. सीप्झवरुन ठाण्याच्या घोडबंदर रोडला येताना मधला साकीनाका चकाल्याच्या ट्रॅफीक जामच्या दुखःद आठवणी लॅपटॉपच्या बॅकपॅकमध्ये टाकून तो जोमाने मॅट्रीमोनी पोर्टलवर लॉगिन करत असे. श्रेयाने आपला "इंटरेस्ट" ओपन केला का ते पाहत असे. ती ऑनलाईन असूनही किंवा नुकतीच ऑनलाईन येऊन गेलेली असूनही तीने आपला "इंटरेस्ट" ओपन केला नाही हे पाहून तो मनातल्या मनात खट्टू होत असे. असे तीनेक दिवस गेले. चौथ्या दिवशी मात्र तिने त्याचा इंटरेस्ट ओपन केला. पण प्रतिसाद काहीच नाही. आता मात्र अश्विनला धीर निघेना.
शेवटी बाबांना फोन करुन श्रेयाचे डीटेल्स दिले आणि तिच्या घरी कॉल करण्यास सांगितले.
"अरे त्यांनी तुझा इंटरेस्ट वाचला आहे."
"हो. पण उत्तर काहीच दिलं नाही."
"तिच्या आईने फोन उचलला होता. ते तुझी पत्रिका जुळवून पाहणार आहेत."
"अहो बाबा, पण तिच्या प्रोफाईलमध्ये तर तिने हॉरोस्कोप मॅच नॉट रीक्वायर्ड असं लिहिलंय."
"असू दे. आपण दोन दिवस वाट पाहू. नाहीच त्यांनी काँटॅक्ट केला तर आपण फोन करु".
पुन्हा दोन दिवस गेले. मात्र श्रेयाच्या घरुन काहीच उत्तर नाही.
पुन्हा एकदा अश्विन घायकूतीला आला. बाबांना फोन करुन त्याने श्रेयाच्या घरी फोन करण्यास सांगितले.
"अरे पत्रिका जुळतेय म्हणे. तिचे आई बाबा दोघेही शिक्षक आहेत. ते म्हणाले पाहण्याचा कार्यक्रम करण्यास काही हरकत नाही. याशनिवारी त्यांच्या घरी जाण्याबद्दल विचारूया का?"
"या शनिवारी म्हणजे खुपच घाईत होईल बाबा."
"अरे हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा चालू आहे. सात आठ दिवसांनी गणपती येतील. मग पित्रूपक्ष. आता नाही केलं तर पाहण्याचा कार्यक्रम लांबणीवरच पडेल."
"ठीक आहे. इलाज नाही. तुम्ही विचारुन बघा त्यांना या शनिवारी चालेल का म्हणून"
श्रेयाच्या घरच्यांनी शनिवारी पाहण्याचा कार्यक्रम करण्याला होकार दिला. अश्विनला घोडं गंगेच्या काठी गेल्याने हायसे वाटले.
आई बाबा शुक्रवारी संध्याकाळीच बागमांडला - ठाणे गाडीने ठाण्याला आले.
शनिवारी सकाळी लवकरच लवाजमा पुण्याच्या दिशेने निघाला. सकाळी साडे सहा सातची वेळ असूनही कळवा नाक्यापासून जे ट्रॅफिक भेटले ते अगदी ठाणे बेलापूर रोड तुर्भ्याला सायन पनवेल रोडला येऊन मिळेपर्यंत. कळंबोली येईपर्यंत थोडंसं वैतागतच अश्विन गाडी चालवत होता.
डाव्या हाताचे मॅकडी झपकन मागे टाकून गाडी सुसाट वेगात एक्स्प्रेसवेवर चढली. अश्विनने आपल्या बाजूची काच खाली केली. गार वार्याचे झोत अंगावर घेत त्याने शीळ घालत अॅक्सलरेटर अजून जोरात दाबायला सुरुवात केली. एव्हाना उजवीकडे दिसणारी फोफावलेल्या पनवेलची घरेही तुरळक होऊ लागली. गाडी एकदम उजवीकडच्या लेनमधून एकशे दहाच्या वेगाने पळू लागली.
__________________________________________________________________________________
तळटीप १ - शिर्षकात १ आकडा असला तरी मायबाप वाचकांना आवडले तरच पुढची पाटी टाकण्यात येईल.
तळटीप २ - हा माझा स्वतःचा अनुभव नाही.
याद्या
9158
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
अवो धनाजीराव,
आम्ही सूज्ञ असल्याने आम्हास
In reply to अवो धनाजीराव, by प्रास
आवडले
+१
In reply to आवडले by Ravindra
क्रमशः
पूर्वी दैनिक सकाळ मध्ये कोणी
धनाजीरावांचे लिखाण दर्जेदारच
भाग चांगला झालाय
पुण्याच्या ऐवजी ठाणे घेतलेत
पुढचा भाग टाका मग डीट्टेलवारी
सुरुवात चांगली जमलिये. पुढे
धन्या, पुढचा भाग आणि मगच खरी
अरे वा, कथेची सुरुवात
छान सुरुवात झाली आहे, येउ
कथा मी पूर्ण करू का? मला
आता ह्यात तुम्ही आणखी काय
In reply to कथा मी पूर्ण करू का? मला by चेतनकुलकर्णी_85
@चेतनकुलकर्णी_85तुमची
In reply to आता ह्यात तुम्ही आणखी काय by धन्या
जाऊ द्या हो नाशिककर.
In reply to @चेतनकुलकर्णी_85तुमची by पाषाणभेद
@ चेतन कुलकर्णी, अवघड आहे
In reply to जाऊ द्या हो नाशिककर. by धन्या
शीघ्रतेचा त्रास
In reply to @ चेतन कुलकर्णी, अवघड आहे by ५० फक्त
(No subject)
In reply to @ चेतन कुलकर्णी, अवघड आहे by ५० फक्त
काय हे पन्नास राव, असे
In reply to @ चेतन कुलकर्णी, अवघड आहे by ५० फक्त
कसंय, कडबा आणि चिवडा यात फरक
In reply to जाऊ द्या हो नाशिककर. by धन्या
ज्याची त्याची आवड, दुसरं काय.
In reply to कसंय, कडबा आणि चिवडा यात फरक by सूड
कथा क्रमशः ठेवल्यामुळे
मस्त
हम्म
बर्यापैकी जमलंय...पुढेही
वाचतोय..
वाचतोय अन तुम्ही लिहीत रहा.
छान आहे
सुरुवात चांगली झाली
धन्या..उत्तम चालू आहे.. चेतन
तसंच करायचं तर कोणत्याही
In reply to धन्या..उत्तम चालू आहे.. चेतन by गवि
हॅहॅ
In reply to तसंच करायचं तर कोणत्याही by विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!! ठीक आहे. एक महिना
In reply to हॅहॅ by गवि
आक्षी हेच मी माझ्या तिन्ही
In reply to हीहीही !!! ठीक आहे. एक महिना by विश्वनाथ मेहेंदळे
अरे लिहुद्यना त्याना
वाचत आहे. पुढील भाग लवकर
धन्या लिहित रहा .. वाचातोय ..
/-/
चान आहे. पण जर कथा पूर्ण नाही
पण जर कथा पूर्ण नाही झाली तर
In reply to चान आहे. पण जर कथा पूर्ण नाही by किचेन