Skip to main content

विरंगुळा

सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

लेखक गणपा यांनी बुधवार, 11/07/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली. लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. "टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.

विश्वास

लेखक मराठे यांनी बुधवार, 11/07/2012 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
सुमेधा रंगपटात आली तरी प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. आज तिच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोगही हाऊसफुल होता. "एक्सिलंट ! माइंड ब्लोइंग परफॉर्मंस !!' टाळ्या वाजवतच रमेश आत आला. थकल्या चेहर्‍यावरचा मेकप पुसता पुसता आरशातूनच तिनं रमेशकडे पाहिलं. रमेशचा फ्रेश हसरा चेहरा पाहून तिचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे. रमेशचा स्वभावही असाच होता. त्याच्या सहवासात आल्यावर क्षणभरातच तो कोणालाही आपलंस करून घेत असे. रमेश म्हणजे सुमेधाचा जुना मित्र. अगदी कॉलेजमधे असल्यापासून. कॉलेजमेधे त्यांचा मोठा ग्रूप होता. रमेश त्या ग्रूपचा प्राण.

"अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी"

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 07/07/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बर्‍याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्‍याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं.. मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात.... आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)...

जाहिरातींची विनोदी "वाट"!! (पूर्ण संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 07/07/2012 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती .... माझ्या ("व्यंगचित्रकाराच्या") मिस्कील तिरकस नजरेतून... वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही.... अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग.... मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा! जागोजागी हिन्ट दिल्या आहेतच. (१) 'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो : "काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?" ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ.

गँग्ज ऑफ वासेपुर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 04/07/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.

काया ही पंढरी, आत्मा हा विट्ठल..

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 30/06/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली. पालखीला वेळेत पोहोचलोच नसतो जर किश्या ने मदत केली नसती तर. त्याचे खास आभार. आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी ऑफिसमधून संध्याकाळी ६.०० ला निघालो तेव्हा मनातली धाकधूक वाढली होती. कारण घर गाठून मग पुणं गाठायचं होतं. घरी पोहोचेस्तोवर १०.०० झाले होते. तसंच थोडं जेवण पोटात ढकलून, वंदनाहून ११.३० ची एस्.टी (स्वारगेट) पकडली.

नाचण

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शुक्रवार, 29/06/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
या पक्षाला बर्‍याच दिवसांपासून कॅमेर्‍यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले. नावः नाचण. स्थळः वसंत विहार.

कॅकटसव्ररचे चांदणे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 29/06/2012 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.