मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाचण

अमोघ शिंगोर्णीकर · · कलादालन
या पक्षाला बर्‍याच दिवसांपासून कॅमेर्‍यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले. नावः नाचण. स्थळः वसंत विहार. ठाणे =======================================================================-
लेखनविषय:

वाचने 6058 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/06/2012 - 17:39
फोटो मस्तच आहे, पण त्याचे ते दोन दिसतात ते डोळे आहे का, बाहेर आल्यासारखे वाटतात. (बुरख्यातुन पाहतंय असंच वाटतंय) च्यायला, लैच वेगळा पक्षी दिसतो. जरा या पक्षाची जालावर काही माहिती आहे का, फोटोसहित वाचेन म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by अमोघ शिंगोर्णीकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/06/2012 - 17:58
माहितीबद्दल धन्यवाद. पक्षी आवडलाच आणि त्याचा फोटो घेण्यासाठीचे घेतलेले श्रम आणि कसबही. मस्त, लगे रहो. -दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी 29/06/2012 - 19:45
अतिशय सुरेख छायाचित्रण, यासाठी लागणारे कौशल्य व संयम आपल्याकडे ठासून भरलेले दिसते. अजून येऊद्या.

अनिरुद्ध उर्फ अन्या 02/07/2012 - 18:45
हा पक्षी फार मस्त शीळ वाजवतो..