Skip to main content

कॅकटसव्ररचे चांदणे

कॅकटसव्ररचे चांदणे

लेखक जागु
Published on शुक्रवार, 29/06/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते. १) २) ३) ४) ५) ६) ७) ८) ९) १०)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9628
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

हायला तुमचे ब्रंम्हकमळ फुललेसुद्धा , भारियेत फोटो :) मी आमचे ब्रंम्हकमळ फुलन्याची वाट बघत होते इथे फोटु पोस्ट्ववायला ;) कालच कळ्या मोजल्या , ६० आहेत आता उमलण्याची वाट पाहते ,काय भारी द्रुष्य असेल ते देखील :)

मस्त! ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते ना?

In reply to by सुनील

ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते ना?@ सुनील तसे काही नाही ,रात्री केव्हाही फुलते . हा पण सकाळ पर्यंत फुल सुकुन जाते .खुप नाजुक अन सुंदर,कॉलनीतले सगळे जमा होतात ही शुभ्र नाजुका पाहायला :)

या पुष्पांसाठी याखेरीज दुसऱ्या विशेषणाचा विचार करणे मला शक्य नाही.

जागुताई द ग्रेट! दुसरा आणि सातवा फोटो खूप आवडला.

मस्त आलेत फोटो, मधे महादेवाच्या पिंडीसारखा आकार असतो ना या फुलात? असे आठवते आहे. तो फोटु नीट आला असता तर अजुन मजा आली असती :)

रेवती, गणपा, श्रीरंग, स्मिता, शुची, मराठमोळा, जाई धन्यवाद. सुनिल साधारण ८ वाजल्यापासून फुलायला सुरुवात होते. १० पर्यंत बरेच फुलते. १२ ला पुर्ण उमलते.

मस्त. अशीच लालसर / गुलाबी रंगाचीसुद्धा फुलं असतात. पण हे कॅकटस नाही तर सक्युलंट आहे. कोणतीही फांदी तोडुन लावली तरी येते. कॅकटससारखा प्रकार.

खुपच सुंदर!!! आमच्या कडेही बुधवारी रात्री उमलल होत. या फुलाच एक वैशीष्ट म्हणजे ही साधारण अष्टमी किंवा नवमीला उमलतात.

फार सुंदर ग!! आणि कॅक्टसवरचे चांदणे हे नावही फार आवडले.. स्वाती

शिर्षक फार आवडल. जागु फुल फार सुरेख.

आमच्याकडे ही एक दिवस ३५ आणि दुसर्या दिवशी ३० अशी दोन दिवस उमललि होती फुले. या फुलान्चा सुगंध फारच छान असतो. मंत्रमुग्ध करणारा. फुलं बघुन मन अगदी प्रसन्न होउन जातं.

मस्त फोटो आहेत. 'ब्रम्ह' कमळांवरून आठवलं. आमच्या शाळेच्या रस्त्याच्या कडेला काही छान उंच झाडं होती. त्यांना मोठी मोठी फुलं असायची. त्याचं नाव कोणीतरी आम्हाला कृष्ण कमळ असं सांगितलं होतं. कृष्णकमळ म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला पाच मोठ्या पाकळ्या होत्या (पांडव) , आत शंभर-एक पुंकेसर होते (कौरव) आणि मधे आणखी एक पाकळ्यांचा गुच्छ होता (कृष्ण). (त्या जुन्या वाड्याच्या जागी जेव्हा बिल्डिंग बांधली तेव्हा बहुतेक ही सगळी झाडं गेली )