Skip to main content

विरंगुळा

या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 10/06/2012 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील..... ही कल्पना खरोखर फारच छान आहे. खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 08/06/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे.

असाही एक Near Death Experience

लेखक संपत यांनी शुक्रवार, 08/06/2012 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज Near Death Experience वरचा लेख वाचून माझ्या लहानपणी घडलेला एक किस्सा आठवला. माझे मुळ गाव अलिबाग.. कोकण पट्टयात असल्याने भूतखेते भरपूर. पण सर्वाधिक भूतांचा प्रदेश म्हणजे मुरुड जंजिरा. तिथे चिंचेच्या झाडावर एक दगड भिरकावला तर चार चिंचा आणि दहा भुते पडायची.. तिथे माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांकडे घडलेली ही घटना.. तर ह्या शेजाऱ्यांचा बाबू नावाचा मुलगा चित्रपटांचा भारी शौकीन. त्यावेळी रात्री रस्त्यांवर पडदे टाकून चित्रपट दाखवले जात. शौकीन लोक चांगला चित्रपट फुकटात बघायला लांब लांब जायचे. असाच एकदा मे महिन्यात 'कुर्बानी' चित्रपट पाहायला हा बाबू गेला. रात्री यायला उशीर झाला.

रावडी राठोड

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 07/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे.

सोनसळी

लेखक जयवी यांनी गुरुवार, 07/06/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
सोनसळी रंगातली ही आणखी काही डिझाइन्स :) DSC00785-001" alt="" /> DSC00794-002" alt="" />

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

भावमुद्रा

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 04/06/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर कलादालनात बघावं तर कधी कमळं दिसताहेत तर कधी गुलाब, कधी मासे दिसताहेत तर कधी पक्षी, मग या विचार्‍या मर्कटांवरच का अन्याय व्हावा. तर या मर्कटांवरील अन्याय दूर करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही टिपलेल्या काही मर्कटभावमुद्रा येथे डकवत आहोत. १. बघा कसा आपल्याच मस्तीत आहे हा. २. ह्याचा अभिनय तर बघा ३.