Skip to main content

विरंगुळा

एट बिलो - एक सुंदर अनुभव

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 12/08/2012 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
गद्यातलं हे माझं पहिलं (आणि आवडलं नाही तर एकमेव ) लिखाण आहे. साधारण वर्षभरापूर्वी नॅशनल वर मदर इंडिया चालू होता. कदाचित १५ ऑगस्ट असावा. बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली... सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो.

चावडीवरच्या गप्पा - असुरक्षित भारत

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 11/08/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट... चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत. “काय म्हणता!

पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे...

लेखक चिम् चिम् मामा यांनी शुक्रवार, 10/08/2012 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे... दोन्ही ठिकाणी तुम्ह्चे सारख्या पद्धतीने स्वागत होते.... How long you are planning to stay in US? What you are gonaa do here? तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते... आज कसे काय येणे केले...? कधी पर्यंत मुक्काम आहे?

थेकडी ते मुन्नार अणाईरंकाळ मार्गे

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 09/08/2012 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
थेकडीच्या परिसरातील मसाल्याच्या बागा - वेलदोड्याची बाग spice garden, Cardamom plantations हमरस्त्यालगतच्या बंगल्याकडे चढत जाणारा हिरवागार रस्ता greeen road, a road o road-side bungalow रस्त्यांना जणु 'एंजल्स ट्रंपेट्सचे भारदस्त कुंपण

नाकतोड्याचे प्रोफाईल.

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 05/08/2012 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक हात गळ्यात असल्याने पावसाळा वाया चाललाय.. अशात काल धो धो पावसात एक नाकतोडा घरात घुसला..

'आम्ही ऑलिम्पिक बघितले' : लंडन २०१२ तिकीट - फ्रॉड (झोल) वेब साईट

लेखक स्वरालि यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन २०१२ ची तिकिटे resale ला ठेवली आहेत असे समजले. दीड वर्षापूर्वी लंडन २०१२ official वेब साईट वर रजिस्टर करूनही (कोणत्याही खेळाचे) तिकीट मिळाले नाही, म्हणून खूप वाईट वाटत होते...आणि रागही येत होता (विशेषतः टीवी वर ऑलिम्पिक खेळ होताना 'रिकाम्या सीट्स' बघून मनात नुसता राग खवळत होता). लंडन मध्ये असूनही एकही ऑलिम्पिक खेळ बघायला न मिळणे म्हणजे काय?

अघळपघळ, इकडचं तिकडचं - १

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 02/08/2012 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाकचे प्रधानमंत्री झरदारींनी आपल्या आदरणीय सरदारजींना, देश के बडे वीरजी - मनमोहन सिंगांना आता पाकिस्तानात यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.. हम्म.. म्हणजे मनमोहनपंतांनी तेथे जाऊन त्यांच्या मस्तपैकी गोष्त-बिर्यानीचा खाना कुबुल केल्यानंतर आणि पाकड्यांशी नव्याने दोस्ताना केल्यानंतर थोड्याच अवधीत पुन्हा भारताने पाक-पुरस्कृत काही अतिरेकी कारवायांना सज्ज राहण्यास हरकत नाही..! --------------------------------------------------------------------------------- याला म्हणतात इमान - याला म्हणतात भक्ती..

गुबगुबीत कुशन, गुलाबी रंग, आरसा..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील एका लोकल गाडीमध्ये काही सुखावणारे बदल केले आहेत. सदर लोकलमधील दुसर्‍या वर्गातही आता कडक लाकडी बाके जाऊन छान छान मऊ मऊ कुशन असलेली बाकडे बसवली आहेत. आर्थिक परिस्थिती नसली तरी दुसर्‍या वर्गातील लोकांनाही पहिल्या वर्गातील लोकांप्रमाणे पार्श्वभाग असतो आणि कुशनवाल्या बाकड्यांमुळे तो सुखावू शकतो, हे रेल्वे व्यवस्थापनाला जाणवले हे फार बरे झाले.. :) त्याचप्रमाणे महिलांच्या डब्यात आता आरसे बसवण्यात आले आहेत.