Skip to main content

विरंगुळा

अति सर्वत्र वर्ज्ययेत....

लेखक Pearl यांनी मंगळवार, 04/09/2012 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
( अति सर्वत्र वर्ज्ययेत.... याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.) आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये. अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये. अति चिंता: चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते.

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.

Samsung विरुद्ध Apple

लेखक गुरुनाथ्काळे यांनी बुधवार, 29/08/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो.

'श्वान'दार जिंदगी

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 28/08/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची वेळ! सगळीकडे स्मशान शांतता! नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्ते ओले आहेत. रस्त्यावर लावलेले पिवळे दिवे प्रखर प्रकाशाचा पसारा मांडून बसले आहेत. ओल्या रस्त्यांवर तो प्रकाश सांडून रस्ते पण पिवळे भासतायेत. हवेत गारवा आहे. मोठमोठाल्या इमारती उभ्या उभ्याच डुलक्या घेत आहेत. झाडे निवांत झालेला हा सगळा पसारा बघत उसासे टाकत उभी आहेत. मी हळू-हळू चालत माझ्या इमारतीकडे चालत जातोय. फक्त माझ्या बुटांचा आवाज! इतक्यात समोर काहीतरी शुभ्र पांढरे हलतांना दिसते. माझी पाचावर धारण बसते. वेग कमी होतो. डोळे बारीक करून मी त्या अंधारलेल्या प्रकाशात खोल बघतो.

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

लेखक पैसा यांनी शनिवार, 25/08/2012 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.

मघई

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 19/08/2012 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता.

राष्ट्रपतींचा दयाळूपणा -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/08/2012 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
. नवीन मा. राष्ट्रपती "दयाळू" आहेत की नाहीत, हे मला माहित नाही. जुन्या मा. राष्ट्रपतीनी दयाळूपणा दाखवण्यात "उच्चांक" केला आहे, हे मला विविध माध्यमांद्वारे माहित झाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवावा, हे मला कळत नाही. खालचे न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय- ह्या तिन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी "पूर्ण विचार करूनच" समोरच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली असणार ना ? असे असतांना, केवळ "दयेच्या अधिकारा"खाली मा. राष्ट्रपती सदर शिक्षा रद्द करण्याचा उच्चांक प्रस्थापित करून जातात- हे खरोखरच अनाकलनीय कोडे वाटते ! मा.