Skip to main content

विरंगुळा

ध्रांगध्रा - २०

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 26/01/2022 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी चुकतंय.इथेच तर होत ते दार..... इथूनच तर महेश खाली गेला. ....... मला त्या बाजूला कुठलंच दार दिसत नाही..... दार जाऊ दे एखादा कोनाडा चौकट असे काहीच दिसत नाही. अरे हे काय झालं? इथली दगडी चौकट कुठे गेली? अर्धवट उजेडात नीट दिसलं नसेल म्हणून मी पुन्हा एकदा नीट पहातो... भिंत हाताने चाचपून बघतो. हाताने थापट्या मारून बघतो. पण तिथे दार चौकट असं काही असल्याची खूणही नाहिय्ये.
मागील दुवा ध्रांगध्रा - १९ http://misalpav.com/node/49827 अखंड दगडी भिंत आहे त्यावर कोरीव काम केलंय. आपण कदाचित चुकीची बाजू बघतोय.

ध्रांगध्रा - १९

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 25/01/2022 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
त्या अष्टकोनी दगडाच्या चकतीला महेश जिवापाड जपतोय. बॅगेत व्यस्थित गुंडाळून ठेवली आहे.तरीही तो ती पुन्हा पुन्हा तपासतो. खंदकात उतरण्यापूर्वी बॅग नीट बंद केली आहे. खंदकात पाणी आमच्या कमरेपर्यंत आलंय. माझा पाय कशात तरी अडकला. खाली पडणार तेवढ्यात महेश मला सावरतो. मी उभा रहातो.पण या गडबडीत महेशच्या खांद्यावरून सॅक निसटते. पाण्यात पडते. कशामुले काय माहीत . सॅक न तरंगता. थेट पाण्यात तळाला जाते.
मागील दुवा ध्रांगध्रा - १८ http://misalpav.com/node/49824 महेश सॅक शोधायला खाली वाकतो. तो पाण्यात आडवा झालाय.त्याच्या पाठोपाठ मी ही.

ध्रांगध्रा - १८

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/01/2022 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
" माझ्यावर विश्वास ठेव" महेश माझ्याकडे पहात बोलतो. " हो खात्री बाळग.... आपण मित्र आहोत. " महेशला खांद्यावर हात ठेवत मी दिलासा देतो. तो काय बोलणार आहे हे मला माहीत नाही. " तुला खोटं वाटेल पण मी खरं सांगतोय. विश्वास ठेव."
आपण आलो त्या दिवसापासून मी झोपू शकलेलो नाही. त्या दिवशी तुला सोडलं आणि घरी गेलो. हातपाय धुवून झोपायला गेलो. थकलो तर होतोच. जरा डोळा लागला असेल माझा. हा मघाशी फोटोत दिसला ना तो स्वप्नात आला. रागारागाने पहात होता. दरडावून काहीतरी बोलत होता. विचारत होता. मला भाषा समजत नव्हती. पण मी खडबडून जागा झालो. खूप घाबरलो होतो. दरदरून घाम फुटला होता अंगाला.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

लेखक मदनबाण यांनी रविवार, 23/01/2022 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते. त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले.

ध्रांगध्रा - १७

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 23/01/2022 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
काय? काय सांगायचंय तुला? आपण त्या ट्रीपवरून आल्यापासून मी झोपू शकलेलो नाही. डोळे मिटले की त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. रात्री सुद्धा मी त्यूबलाईट पूर्ण चालू करून ठेवतो रूम मधे अंधार झाला की त्याचा चेहरा दिसतो" हे सांगताना महेशच्या चेहेर्‍यावरची भिती लपत नाही.
मागील दुवा ध्रांगध्रा - १६ http://misalpav.com/node/49814 " काय म्हणतोस ! कसला चेहेरा?" खरंतर महेशनं हे मला विचारलं असतं तर मी पण हेच सांगितलं असतं.

ध्रांगध्रा - १६

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 22/01/2022 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी तोंड उघडून जोराने " आ....." म्हणतो. अरेच्चा!!!!!!!! आला की माझा आवाज. मला माझंच हसू येतं म्हणजे मी मनातल्या मनात हाका मारतोय तर ! ते कसं ऐकू जाणार. त्या हसण्यानं मला जरा बरं वाटतं.... माणूस कितीही रागात , तणावात असला तरी थोड्याशा हसण्याने किती फरक पडतो नाही!.....
मागील दुवा ध्रांगध्रा - १५ http://misalpav.com/node/49796 माझा आवाज ऐकून आई आत येते. पाठोपाठ बाबाही. "काय रे काय झाले?". आई उशी शेजारच्या नॅपकीनने माझ्या कपाळावरचा घाम टिपते. तरी बरं त्या हसण्यामुळे मी थोडा तरी रिलॅक्स झालो होतो.

New Edge Entrepreneurs !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 21/01/2022 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
New Edge Entrepreneurs ! चार समवयस्क, समविचारी मित्र खूप दिवसांनी भेटले की काही टिपिकल गोष्टी घडतात. मित्र पिणारे किंवा न पिणारे दोन्ही असू शकतात. किंवा त्यातले दोघे पिणारे आणि बाकीचे नुसता चखना संपवणारे पण असू शकतात. सगळे नोकरीवाले असले की नोकरीत दहा-पंधरा वर्षे घासून झालेली असते. EMI आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना नाकी नऊ आलेले असतात.दुनियाभराचे टेक्निकल स्किल्स आणि करियर ऍस्पिरेशन्स बाजूला ठेवून आपण केवळ आणि केवळ सर्व्हायवलसाठी खर्डेघाशी करतोय ह्याची जाणिव सगळयांना झालेली असते. या पार्श्वभूमीवर अधूनमधून मित्रांची भेट ही फार अनिवार्य असते. मित्र भेटतात. शिव्यांची देवाणघेवाण होते.

ध्रांगध्रा - १५

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 20/01/2022 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यात जाळ पेटावा तशी आग आग होतेय. मी डोके उशीवर स्थिर टेकवायचा प्रयत्न करतो. ..... मेरी गो राउंडच्या पळण्यात खाली खाली जाताना जसं वाटते तसं काहीसं खाली खाली जातोय. खाली ..... आणखी खाली...... आणखी खाली. पृथ्वीला तळ नसल्यासारखे वाटतय. खाली...... खाली.... डोळ्यापुढची उजेडाची जाणीव नाहिशी होतेय. डोळ्या समोर अंधार पसरतोय. सुखद गारवा देणारा अंधार.... मागील दुवा ध्रांगध्रा - १४ http://misalpav.com/node/49793 कसलेसे आवाज येतात. कोणीतरी बोलतय. मी हळू हळू डोळे उघडतो. पांढरं स्वच्छ छत.