मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक - भूल भुलैय्या २

तर्कवादी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तिला पटत नव्हतं तरी आमच्या दोघांच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी मला तिथे जायचं होतं. अवघड प्रवासानंतर मी तिथे पोहोचलो. ती गाणं ऐकत होती "कसे सांगू " ? ती धावत मला बिलगली. "आता पुन्हा जायचं नाहीस." क्षणार्धात तिनं माझ्या हातातलं मशीन बाल्कनीतून भिरकावून दिलं "मूर्ख झालीस का ?" तिच्यासोबत मला आता रहायचं नव्हतं. " इतकी वर्षे मी तुझीच वाट पाहिली , तुझ्यावरच प्रेम केलं. आता वयस्कर झालेली मी तुला नकोय ?" तिच्या डोळ्यात पाणी होतं. " . . . . " " तु गेल्यावर मी एकटीनेच घर चालवलं. तुझी संपत्ती आणि विम्याची रक्कम मला मिळाली; पण सात वर्षानंतर.. तुझ्याकडे आता एकही पैसा नाहीये. त्यामुळे तु तसलं काहीही करु शकणार नाहीस.आता मीच तुझं वर्तमान आहे"

वाचन 2773 प्रतिक्रिया 0