बाप रे बाप..
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!"
विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले.
हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील.
पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.
मिसळपाव