Skip to main content

विचार

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ६. बीड ते अंबेजोगाई

लेखक मार्गी यांनी सोमवार, 10/12/2018 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ६. बीड ते अंबेजोगाई १७ नोव्हेंबरची पहाट. इन्फँट इंडिया बाल गृहातून निघालो. निघताना दत्ता बारगजे जी व सर्व मुलांनी मला निरोप दिला. पहाटे लवकर उठून अगदी प्रेमाने माझ्यासाठी जेवण बनवलं! डोंगर उतरताना आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य वाटतोय! कालच्या भेटीच्या आठवणी मनात आहेत. आजही मला तुलनेने अगदी कमी दर्जाचा रस्ता लागणार आहे. आज असा तिसरा दिवस आहे जेव्हा सुरुवातीला तीस- पस्तीस किलोमीटरपर्यंत असा रस्ता असेल व नंतर चांगला रस्ता मिळेल. असा विचार करतोय किंवा अशी आशा करतोय की फक्त पस्तीस किलोमीटरपर्यंतच असा रस्ता असावा.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

लेखक मार्गी यांनी शनिवार, 08/12/2018 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ५. बार्शी ते बीड १६ नोव्हेंबर, आज ह्या प्रवासाचा पाचवा दिवस. कालचा दिवस सायकलिंगच्या दृष्टीने फारच मस्त गेला. आता सायकल चालवणं खूप सोपं झालंय. आता किलोमीटरची अंतरं जाणवतच नाही आहेत. काल चर्चाही छान झाली होती. आज बार्शीवरून बीडजवळच्या पाली इथल्या बाल गृहात जायचं आहे. आजचं अंतर जवळपास ९५ किलोमीटर असेल. रोजच्या प्रमाणेच पहाटे बार्शीतून निघालो. बार्शी‌ बरंच मोठं शहर आहे. कँसर रुग्णालयाच्या पुढे आगळगांवचा रस्ता विचारत निघालो. इथून पुढे थोडं अंतर साधारण दर्जाचा रस्ता आहे. आणि अगदीच आतला असल्यामुळे मध्ये मध्ये तुटलेलाही असणार!

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 29/11/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील.

आकाशातील भुते

लेखक हेमंत ववले यांनी रविवार, 25/11/2018 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
भुत प्रेत ही कल्पना, फक्त भारतातच नव्हे तर अगदी (आपण ज्यांना पुढारलेले म्हणतो अशा) पाश्चात्य देशांमध्ये देखील होती किंबहुना आज देखील आहे. म्हणुनच वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर घोस्ट हंटर्स सारखे रीयॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात आणि करोडोंच्या संख्येने लोक हे कार्यक्रम आवडीने पाहतात देखील. आणि आपल्याकडील काही तथाकथित पुढारलेले लोक अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावावर भारताला आणि भारतातील चालीरीतींना ढिगभर शिव्या शाप देऊन मोकळे होतात. माझ्या लेखांमध्ये मी कधीही अंधश्रध्दांचे समर्थन करीत नाही, करणार देखील नाही.

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

समलिंगी संबंध ..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 10/11/2018 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी मिपा वर आले आहे.. पुन्हा थोडी आता लिहित जाईन म्हणते.. तुमची मदत लागेल.. एक लेख लिहिते आहे.. समलैन्गिकत्व ... लहानपणी म्हणजे साधारण ७वी मध्ये असताना एक मैत्रीण, घरी आलेले वर्तमान पत्र शाळेत घेऊन आली. आल्या आल्या तो पेपर हातात नाचवत म्हणाली.. ए हि बघा बातमी.. एका मुलीनं मुलीशीच लग्न केलं! असं म्हटल्या बरोबर आम्ही सगळ्याजणी त्या पेपर वर तुटून पडलो. नेमकं कसं कसं काय काय घडलं हे वाचायला प्रचंड उत्सुक होतो. बातमी निपाणी गावातली होती. हे असं काही घडणं म्हणजे किती चुकीचं वागतायत अशीच समजूत लोकांची होती, तेव्हाही आणि काही प्रमाणात आत्ताही!

मला भेटलेले रुग्ण - १८

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 06/11/2018 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

मुक्तछंद

लेखक निलेश सकपाळ यांनी रविवार, 04/11/2018 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलेल्या आठवणी वा नकळत निसटून गेल्या क्षणांचा मोह कधी परतून एकांतात एखादा विराग सूर छेडून मनाला वाऱ्याबरोबर हलके करेल वा एखाद्या ओल्या कापसाच्या ओझ्याप्रमाणे भारी करेल हे सहसा सामान्य बुद्धीच्या पालिकडे! कदाचित काळाला खुणगाठ बांधता आली असती वा एखादा क्षण मोरपिसाप्रमाणे वा त्या पिंपळाच्या पानाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकात राखता आला असता तर नक्कीच सुखकर झाले असते.

सुरक्षा विमा आहे, साहेब?

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/10/2018 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.