Skip to main content

विचार

तुझं माझं जमेना...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/09/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे. पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी...

आटा, तांदूळ, तूरडाळ आणि 'इत्यादि'..

लेखक आजी यांनी रविवार, 15/09/2019 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला बोरिंग वाटणारी अनेक कामेआहेत. त्या सगळ्यांची नावे सांगत बसायला मला बोअर होतंय. पण काही नमुन्यादाखल सांगते. गूळ चिरणे, भाजी निवडणे, उरलेले अन्न काढणे, दरमहा लागणार्‍या वाणसामानाची यादी करणे. लिस्ट करायची म्हणजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्याला कायकाय लागते ते आठवणे. अगदी पेस्ट, साबण लायझॉल, गार्बेज बॅगपासून ते रात्रीच्या गुडनाइट रीफीलपर्यंतची यादी करायची.

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 13/09/2019 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी! माझ्या लेखाचं शीर्षक वाचून आणि मी जे काही लिहिणार आहे ते वाचून कदाचित काही जणांना वाटू शकतं की पंतप्रधानांना भेटता आलं.... अगदी जवळून बघता आलं..... बोलायला मिळालं..... याबद्दल ही उगाच शेखी मिरवते आहे. पण खरं सांगू? सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! तर....

मुझे नींद न आएssss

लेखक आजी यांनी गुरुवार, 05/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
निद्रादेवी साधारणपणे मला प्रसन्न असली तरी क्वचित तिची अशीही एक वेगळीच तऱ्हा दिसते.. त्या दिवशी सगळं नेहमीप्रमाणे घडलं होतंं. रात्री माझं जेवण वेळेवर झालं होतं. मुलाशी,सुनेशी,नातवाशी गप्पा झाल्या होत्या. टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या मालिका बघून झाल्या होत्या. मी नेहमीप्रमाणे माझ्या गादीवर आडवी झाले होते. एफ एम गोल्ड वरची लता,रफीची जुनी गाणी ऐकून झाली होती. आता झोपावं असा विचार करुन मी रेडिओ बंद केला. अंगावर पांघरुण घेत एसी सुरु केला. आता झोप येणं स्वाभाविकपणे अपेक्षितच होतं. अर्धा तास झाला, झोप नाही. मग एक तास झाला, पण झोप काही येईना. का बरं झोप येत नाहीये?

दर्शनमात्रे मनकामना पूर्ती

लेखक nishapari यांनी मंगळवार, 03/09/2019 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी .....

श्रावणातल्या कहाण्या

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 30/08/2019 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणातल्या कहाण्या आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार! या शुक्रवारची आणि श्रावणातल्या रविवारची आठवण कायम मानत घर करून आहे; श्रावणामध्ये घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची कहाणी वाचायची; आणि रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. या कहाण्या ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलंच पाहिजे असा तिचा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढंच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायव्हर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसायला बोलावलं जाई.

दुपारची झोप..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/08/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात. फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

वर्तुळ......

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 24/08/2019 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्‍या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्‍या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला. एक काल असा होता की मुलगी जन्माला येणे हेच मुळी अपषकुनी मानले जायचे.

द सियालकोट सागा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/08/2019 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.