Skip to main content

विचार

जगभर संकल्पज्वराच्या साथीचे थैमान, "कोण" चा इशारा

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 02/01/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक स्वास्थ्य संघटना (कोण) यांनी सूचित केल्याप्रमाणे सध्या जगभर संकल्पज्वराची साथ आलेली आहे. संघटनेने पत्रक काढून असे जाहीर केले आहे की ही साथ अतिशय वेगाने पसरणारी आणि संसर्गजन्य आहे. विशेषतः आरंभशूर मंडळींना ह्या साथीच्या ज्वराची लागण लगेच होते असे निरीक्षण नोंदवले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कित्येकदा ही लागण सामूहिक असते असे मत व्यक्त केले आहे. या आजारासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसून फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि साथीची तीव्रता कमी होत जाईल. सामूहिक लागण असेल तर एक एक सदस्य ह्या आजारातून आपोआप बरे होत अंतिमतः केवळ एक किंवा दोन सदस्यांना उपचाराची गरज असेल.

भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 30/12/2019 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
'सध्ध्याचा काळ मोठा कठीण आहे' हे वाक्य तुमचा सततच पाठलाग करायला लागले कि समजावे तुमची तारुण्याची गाडी उताराला लागली आहे. सहसा जगण्याची उस्तवार करताना जो संघर्ष करावा लागतो त्याचा आणि या वाक्याचा फारसा संबंध नसतो. पण जेंव्हा तुमच्या डीएनएचाच भाग बनून राहिलेल्या तुमच्या समजुतींना आता काही किंमत नाही हे कळायला लागते तेंव्हा एक वेळ अशी येते कि अगदी क्षुल्लक करणानेदेखील तुमच्या निग्रहाचा बांध फुटतो आणि ते सुरवातीचे वाक्य आपोआप तुमच्या ओठावर येते. सुरवातीपासून सुरुवात करायची म्हटले कि प्राथमिक शाळेत विरुध्ध अर्थाचे शब्दांच्या जोड्या जेंव्हा शिकलो ते दिवस आठवतात.

लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 30/12/2019 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात.

सूर जाणिले कोणी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 28/12/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेल्या लिंकवर जे गाणे आहे त्यावर काहीतरी खरडलंय. https://youtu.be/kWOXZmIIrSo २ दिवसांपूर्वी ९ वीच्या अभ्यासक्रमातील 'मेंदू'शी झटापट सुरू होती. उजवा बाजूला कुठली केंद्र व डाव्या बाजूला कसले हिशोब असं काय काय चर्वीचरण चालू होतं. "संगीत, नृत्य अशा कलांची जबाबदारी उजवा भाग घेतो." वाक्य वाचून झालं. आता हे शिकवायचं कसं ? का घेतो? कशी घेतो? कोण व कधी ठरवतं? जन्मतः घेऊन येतो हे सेटिंग का समाज व परिस्थितीनुसार बदलतं? हा माणूस अरसिक / रसिक असणार हे उजवा किंवा डावा भाग छापून आणत असतील तर बरंच आहे.

जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

लेखक प्रास यांनी बुधवार, 18/12/2019 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात. कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं. वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं. पं.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

हिपोक्रसी 1 - हुंडा

लेखक पुनप्पा यांनी मंगळवार, 10/12/2019 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - कॅफेटेरिया ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का? तो - नाही ना. अजून काही नाही. ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना? तो - नाही. का विचारले असे? ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली. तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास? ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते.

त्रिपात्री आणि एक अंकी नाटक....?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 06/12/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
खालील नाटक हे तद्दन काल्पनिक आहे. केवळ टाइमपास म्हणून लिहिले आहे. ह्या नाटकात कुठल्याही प्रकारचे विचारमंथन नाही. त्यामुळे, खूप विचार करणार्यांनी पुढील नाटक वाचले नाही तर फारच उत्तम. ज्यांनी वाचले आहे, त्यांच्यासाठी....ह्या नाटकाला योग्य ते शीर्षक द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. ... ........... रोहिणी : तुम्ही पेपरात बातमी वाचली असेलच ना? की एक मुलगी लग्न झाल्यावर तिसऱ्याच दिवशी प्रियकराला घेऊन पळून गेली. खूप चर्चा ही केली असेल ना. मला शिव्या पण देऊन झाल्या असतील. कदाचित ...कदाचित कशाला? नक्कीच... माझ्या घराण्याचा पण उद्धार केला असणार. मुलीला संस्कार कसे नाहीत?

पर्स..

लेखक आजी यांनी सोमवार, 02/12/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पर्स म्हणजे एक वस्तुसंग्रहालय आहे. माझ्याकडे इतक्या पर्सेस आहेत, पण अजूनही मला माझ्या गरजा पूर्ण करणारी, योग्य आकाराची, आदर्श पर्स मिळालेली नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या पर्सेस आहेत. त्यांत मी बॅग बनवणाऱ्याकडून, लघुउद्योजक बायकांकडून, माझ्या अपेक्षा सांगून बनवून घेतलेल्या बॅग्जही आहेत. मला गरजेनुसार पर्सेस लागतात. सकाळी फिरायला जाताना लहानशी पाण्याची बाटली, मोबाईल, एक रुमाल आणि घराची किल्ली एवढंच सामावणारी लहान पर्स मला हवी असते. तर प्रवासाला जाताना मला मोठी पर्स हवी असते.

स्फुट : अनुभव

लेखक राघव यांनी शुक्रवार, 29/11/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!! हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले.