लेखनप्रकार
मला बोरिंग वाटणारी अनेक कामेआहेत. त्या सगळ्यांची नावे सांगत बसायला मला बोअर होतंय. पण काही नमुन्यादाखल सांगते. गूळ चिरणे, भाजी निवडणे, उरलेले अन्न काढणे, दरमहा लागणार्या वाणसामानाची यादी करणे.
लिस्ट करायची म्हणजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्याला कायकाय लागते ते आठवणे. अगदी पेस्ट, साबण लायझॉल, गार्बेज बॅगपासून ते रात्रीच्या गुडनाइट रीफीलपर्यंतची यादी करायची.
माझ्या सासूबाईंनी फार पूर्वी मला सारख्या सूचना करताना ज्या काही आचरणात आणण्यायोग्य सूचना दिल्या, त्यापैकी ही एक खरोखरीची उपयुक्त सूचना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय समान लागते ते क्रमवार आठवून, त्याची क्रमवार यादी करायची म्हणजे कोणताही पदार्थ, वस्तू विसरत नाही. वगळली जात नाही.
तर अशी ही यादी दरमहा करायचा मला कंटाळा येतो. आधी स्वयंपाकघरात काय आणायला हवंय, काय संपलंय ते बघायचं आणि मग यादी करायची. एकूण ४०-४५ वस्तू होतात. त्या सगळ्या लिहायच्या. नेहमीच्या दुकानदाराला, म्हणजे अमुकतमुक "सुपरमार्ट" किंवा "शॉपी"ला फोनवरून डिक्टेट करायच्या.. त्यात पंधरा मिनिटे जातात. मग तो सामान कधी घेऊन येतोय, याची वाट बघायची. त्याची येण्याची वेळ म्हणजे आपण स्नानासाठी गेल्याची किंवा आपली दुपारची हलकीशी डुलकी काढण्याची वेळ असते. बरे हे लोक एकदा बेल वाजवून दार उघडायची वाट पाहत नाहीत तर दार उघडेपर्यंत सतत बेल वाजवतात. तर त्यांची वाट बघायची. तो आला की लिस्ट प्रमाणे सामान आहे की नाही ते चेक करायचे. तेव्हा मात्र तो अति घाईत असल्याप्रमाणे अस्वस्थ होऊन चुळबुळत उभा राहणार. त्याला पैसे द्यायचे. त्याच्याकडे सुटे पैसे नसतात. मग आपल्याजवळचे सुटे पैसे शोधायचे, त्याला द्यायचे. किंवा त्यावर पाणी सोडायचे.
कॅशलेस व्यवहार करावा म्हणून कार्ड पुढे करावे तर तो मशीन विसरलेला असतो किंवा ते नादुरूस्त असतं. यादीतल्या काही वस्तू तो विसरलेला असतो. काही त्याच्या दुकानात नसतातच. काही वस्तु तो जास्तीच्या, चुकीच्या आणतो. आणि फ्री मिळणार्या वस्तू आणायच्या विसरतो. मग त्याला परत दुकानात पाठवायचे. आलेल्या वस्तूंची क्वालिटी पारखायची. तो एक्सपायरी डेट जवळ आलेल्या वस्तू पाठवतो. कांदे बटाटे अती मोठे किंवा अगदी लहान आकाराचे पाठवतो.
शी, किती बोअरडम! मग मी ठरवलं, आपण आणि सूनबाईने 'बझार 'मध्ये जायचे. स्वतःच्या हातांनी वस्तू उचलायची, पारखायची, एक्सपायरी डेट चेक करायची आणि मगच ती घ्यायची.
ज्या दिवशी किमतीमध्ये घसघशीत सूट होती त्याच दिवशी आम्ही 'बझार 'मध्ये गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला एवढी गर्दी दिसली की आपण चुकून एखाद्या ट्रेड फेयरला आलोय की काय असं आम्हाला वाटलं. आम्ही धीर एकवटून प्रयत्नपूर्वक आत शिरलो. सामान भरण्यासाठी एक ट्रॉली घेतली. ट्रॉली ढकलत ढकलत आम्ही आत शिरलो आणि त्या मोहमायाजालात, भान हरपून एक एक वस्तु ट्रॉलीमध्ये टाकत राहिलो.
तर्हेतर्हेची चॉकलेट्स, केक्स, रेडी टू ईट पदार्थ. फक्त उकळते पाणी टाकायचे की नाश्ता तयार, मॅगीचे १० प्रकार, इतर नूडल्सचे १५ प्रकार, मफीन्स, किंवा गोठवलेले पदार्थ थेट गरम तेलात सोडून नुसते तळले की ब्रेकफास्ट तयार! पती ,मुले,आणि त्यांची नेहमी फ्रेश दिसणारी, सडपातळ,सपाट पोटाची, मोकळे केस, थोडे पाठीवर,थोडे दोन्ही खांद्यावरून पुढे घेतलेली सुंदर आई. सगळेच खुश, सुखी,आनंदी !
पिझ्झा बेसचे कित्येक प्रकार, तयार बर्गर,पॅटीस, ब्रेड पॅटीस, कॉफी, डिप डिप चहा, आयुर्वेदिक चहा, लोणची २० प्रकारची,चटण्यांचे २१ प्रकार, चीज स्प्रेडचे २५ प्रकार, ब्रेडला लावायच्या बटरचे २६ प्रकार.
चायनीज रेडी टू ईट नाश्ता, इटालियन नाश्ता, तयार पराठे, घरी जाऊन फक्त भाजायचे. त्या पराठ्यांचे त्रिविध प्रकार, कितीतरी प्रकारचे मसाले! शिवाय कितीतरी प्रकारची सौन्दर्यप्रसाधने, कोल्ड्रिंक्स, माऊथ फ्रेशनर्स, पावडरी, लिपस्टिक्स, नेलपेण्ट्स, भांडी, कुकर्स, कपडे, शोभेच्या वस्तू..
बाप रे ! इतक्या सगळ्या वस्तू घेता घेता आमची त्रेधातिरपीट उडाली. फार चॉईस असला की मन थकून जातं. शिवाय भूक लागलेली असताना शॉपिंग करु नये म्हणतात. तर असो. आम्हाला आणखी एक ट्रॉली घ्यावी लागली. सगळीकडे हिंडून,हिंडून पायाचे तुकडे पडले.
बझारचा चकचकीत, चमकदारपणा पाहून डोळे थकले. बझार एसी होता पण घामटे निघाले. सगळे ओझे ढकलत ढकलत आम्ही बिलिंगच्या रांगेत उभ्या राहिलो. रांग एवढी लांबलचक होती की, बिलिंग मशीन आणि काउंटर आम्हाला दिसतच नव्हते. अगदी विमुद्रिकरणांनंतर बँकच्या पुढे धरलेली रांग आठवली.
एकेकजण मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होता. सगळ्यांनीच तडस लागेपर्यंत सामान घेतले होते.
अर्ध्या तासाने आम्ही काउंटरपाशी आलो. मला तहान लागली होती.
सोबत नेलेले पाणी संपले होते. आम्हा दोघींचेही डोळे आत खेचले जात होते. चक्कर येणार असे वाटत होते. एकेक वस्तू काढून काउंटर वर ठेवत गेलो. बिल तयार होत होते. बिल झाले. आठ हजार रुपये. माझे पांढरे झालेले डोळे मिटत मी मुकाट्याने माझे कार्ड स्वाईप करायला दिले. कारण वाण्याकडून सामान न मागवता शॉपिंगला जायची आयडिया माझी होती.
कारमध्ये समान कोंबून घरी आलो. आल्याआल्या आधाशासारखे पाणी प्यायलो. भानावर आलो आणि लक्षात आलं, मी अगदी सुरवातीलाच, बेभान होण्यापूर्वी, होशोहवासमध्ये असताना, ५ किलो तांदूळ आणि २ किलो तूरडाळ आणि ५ किलो आटा ट्रॉली मध्ये टाकला होता. तेवढे सोडल्यास मी केलेल्या यादीतील एकही वस्तू मी आणली नव्हती.
मी सुनेला म्हटले 'वरण भाताचा कुकर लाव'. मुलगाही जस्ट घरी परत आला होता, तो आणि ती म्हणाले ,'कुकर कशाला आता, उकळते पाणी नूडल्स मध्ये टाकून खाऊ, दोन मिनिटात तयार होतात, रेडी टू ईट.
मी म्हटलं,'ओके..!!'
मिसळपाव
मस्तं लिहिलंय :)
In reply to मस्तं लिहिलंय :) by पद्मावति
+111
=)) =)) =))
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
आमंत्रण बंद व्हावे म्हणून
In reply to आमंत्रण बंद व्हावे म्हणून by यशोधरा
आमंत्रण बंद व्हावे म्हणून
In reply to आमंत्रण बंद व्हावे म्हणून by गवि
तुम्ही म्हणता म्हणून टेलतोच
In reply to तुम्ही म्हणता म्हणून टेलतोच by डॉ सुहास म्हात्रे
+१ टू एक्का काका
मैद्याच्या नूडल्स आणल्यास की
छान लिहलयं !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiquiअसं होतं खरं!!
आटा?? हे काय असतं?
In reply to आटा?? हे काय असतं? by अमरेंद्र बाहुबली
गहू दळल्यावर लगेच मिळतो तो
In reply to गहू दळल्यावर लगेच मिळतो तो by डॉ सुहास म्हात्रे
सुहास सर मग पीठ काय असतं?
In reply to सुहास सर मग पीठ काय असतं? by अमरेंद्र बाहुबली
माझ्या मते साधारणपणे
In reply to माझ्या मते साधारणपणे by गवि
उचित निरीक्षण =)) =))
In reply to सुहास सर मग पीठ काय असतं? by अमरेंद्र बाहुबली
(मराठी भाषेत) गव्हाचे पीठ =
In reply to आटा?? हे काय असतं? by अमरेंद्र बाहुबली
मराठीवर होणारे हिंदीचे आक्रमण चिंताजनक आहे ।
In reply to मराठीवर होणारे हिंदीचे आक्रमण चिंताजनक आहे । by चामुंडराय
या शब्दांत (पक्षी : काडीत),
मराठीवर होणारे हिंदीचे आक्रमण चिंताजनक आहे ।या वाक्यात (पक्षी : काडीत), हा धागा अनेक शतकी बनविण्याची ताकद आहे ! ;) =)) याशिवाय, या वाक्याच्या शेवटी पूर्णविरामासाठी "." ऐवजी "।" चा उपयोग केला आहे... खरेच, हिंदीचे आक्रमण चिंताजनक आहे ! ;) =)) =)) =))In reply to या शब्दांत (पक्षी : काडीत), by डॉ सुहास म्हात्रे
अर्रर्र, चुकून गलती झाली वाटतं.
In reply to अर्रर्र, चुकून गलती झाली वाटतं. by चामुंडराय
जराशी चंमतग केली. बाकी काही
मस्त लिहिलं आहे. या अवास्तव
+1
हम्म एखादे स्मार्ट ऍप हवेच यासाठी
अगदी खरं गं आज्जे !
मॉल की वाण्याचं दुकान
केव्हढ दमायला झालं बाई!!!!!! बाई!! !बाई!!!!!
मस्त लेख
पद्मावति- धन्यवाद.पद्मावति की
In reply to पद्मावति- धन्यवाद.पद्मावति की by आजी
अगं आज्जे, फ्लोअर नाही काई... फ्लॉवर, फ्लॉवर
माझे असे खादाड़ी बाबत हमखास घडते.
छान लिहिलंय, मजा आली लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचून :)
एक वेगळा विचार --
In reply to एक वेगळा विचार -- by सुबोध खरे
हिशोब मजेशीर आहे.