स्फुट : अनुभव
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!!
हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले.
मिसळपाव
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो
बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या
मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती
मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला
घरी आल्यावर तो पण चापला