Skip to main content

विचार

तासगांवचं घर..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 04/11/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तासगावचं घर : श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं. शाळेसमोर, मेन रोड, तासगांव. असा पत्रिय पत्ता. तासगावात विचारायचे झाल्यास गोखले वकिलांचा वाडा. अस जर कोणाला विचारलं तर डोळे झाकून आणून सोडतील. नरगुंदे बोळात मोठा दरवाजा त्यातल्याच एका दाराला छोटा दिंडी दरवाजा.. दरवाजातून आत गेलं की, उजव्या बाजूला रिकामा गोठा, डाव्याबाजूला एका ओळीत बिर्‍हाड करूंच्या खोल्या. मला आठवणारे बिर्‍हाड्करू म्हणजे माणगांवकर शिक्षक आणि एक कोणितरी नर्स . पुढे गेलं की, मोठ्ठ अंगण .. अंगणाच्या डाव्या बाजूला माडीवर जाण्यासाठी केलेला लाकडी जीना. बरोबर समोर.. सारवलेलं अंगण आणि जुन्या पद्धतीचं घराचं दार..

येथे..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 04/11/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे. करतात मग कशाला भलताच तर्क येथे. लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले. अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे. निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

व्यसनमुक्ती

लेखक निमीत्त मात्र यांनी मंगळवार, 04/11/2008 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील ऍक्रॉन शहरातील १९३५ मधील एक संध्याकाळ. त्या संध्याकाळी दोन अट्टल बेवडे एकमेकांना भेटले. गप्पा मारत बसले आणि चमत्कार म्हणजे गप्पा मारता मारता प्यायचं विसरले. त्यांच्या गप्पांतून दुनियेत एक नवीनच शोध लागला. दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा. पण त्या दोघांपैकी कोणीही मानसशास्त्रज्ञ नव्हता. एक होता शेअर दलाल बिल विल्सन तर दुसरा होता डॉक्‍टर बॉब स्मिथ. खरे तर यापूर्वी मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहिले जाई (आज ही बरेचजण मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहतात) त्यांना उपदेशाचे डोस पाजले जात. पण समानतेच्या पातळीवरून त्यांना कोणी समजून घेत नव्हते.

ज्याचं त्याचं स्वातंत्र्य

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 03/11/2008 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही!", "तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस?", "तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला!" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे! आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्‍यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्‍यात!

संयमी जगज्जेता!!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 31/10/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं. आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती.

कारी...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 30/10/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. एरवी एकटाच असतो. दिवाळीनिमित्त 'फ्यामिली' आली आहे इथे. ज्या दिवशी ते आले नेमकं त्या दिवसापासून रोज घरी जायला उशिर होत होता. दिवसभरात बायकोचा २-३ वेळा फोन येऊन गेला होता, आज लक्ष्मीपूजन आहे, आज तरी वेळेत ये घरी. त्या प्रमाणे थोडा लवकरच निघालो होतो. टॅक्सी पण मिळाली पटकन. म्हणलं आज खरंच चांगला दिवस दिसतोय. मस्त मूड होता. घरी जाऊन काय काय करायचं त्याचा विचार चालू होता. मस्त मुलींबरोबर मस्ती करायची, दाबून जेवायचं असले सुखासीन विचार चालले होते. एकीकडे टॅक्सी ड्रायव्हर साहेबांनी पण बोलायला सुरुवात केली. इथले बव्हंशी टॅक्सीचालक पाकिस्तानी आणि त्यातल्या त्यात पठाण आहेत.

संवाद-४ [ही मालिका नाही]

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/10/2008 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात येतात ते कागदावर उतरवतो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंतर्‍यापासुन सुरु व्हावं तसं.

पालखी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/10/2008 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

भाऊबीज

लेखक mina यांनी बुधवार, 29/10/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे. बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।। तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा. त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.