Skip to main content

विचार

विचार — वैचारिक मराठी लेखनाचा विभाग. तत्त्वचिंतन, समाजचिंतन आणि जीवनमूल्यांवरील मराठी विचार येथे वाचा व चर्चेत सहभागी व्हा.

आता काँग्रेसवरच बंदी घाला !

लेखक सनातन यांनी शुक्रवार, 24/10/2008 09:06 या दिवशी प्रकाशित केले.

सत्य परिस्थिती दाखवणार्‍या वृत्तवाहिन्यांची मुस्कटदाबी करणारी लोकशाहीद्रोही काँग्रेस !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र पेटला. त्यांच्या अटकेचे पडसाद राज्यसभेतही उमटले. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्रातील अराजकाला मनसेलाच कारणीभूत धरले. असे करून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्वत:ची कातडी बचावण्याचा निष्फळ प्रयत्‍न केला. कोणतेही प्रकरण अंगाशी आले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे त्या घटनेतून अर्थ काढतात.

भाषा - फ्रेन्चचा ढासळता बुरुज

लेखक सुनील यांनी गुरुवार, 23/10/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगाच्या दृष्टीने म्हटले तर अगदीच क्षुल्लक वाटणारी. भारतातील वृत्तपत्रात तर शेवटच्या पानावरदेखिल तिला स्थान मिळाले नसावे. पण फ्रान्समध्ये मात्र त्या घटनेने मोठा गदारोळ उठला.

अशी काय होती ती घटना?

रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. अधिकृत भाषा फ्रेन्च. पण गेल्याच महिन्यात रवांडा सरकारने इंग्लीश ही अधिकृत भाषा करण्याचे संकेत दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांत फ्रेन्चऐवजी इंग्लीश शिकविण्याचे ठरविले. आणि फ्रान्समध्ये हलकल्लोळ माजला!

ससा आणि कासव

लेखक अरुण वडुलेकर यांनी बुधवार, 22/10/2008 15:34 या दिवशी प्रकाशित केले.

ससा आळसाने आणि आपल्या वेगाच्या घमेंडीने झाडाखाली झोपला आणि मागाहून आलेल्या कासवाने शर्यत जिंकली. ससा जागा झाला तसा कासवाने शर्यत जिंकलेली पाहून वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी संतापला. कासव जलचर आहे आणि आम्हा वनचरांच्या वनात येऊन आमच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांना कांही एक अधिकार नाही असा घोष करू लागला. या वनावर आम्हां वनचरांचाच केवळ हक्क आहे. जलचरांनी येथून हद्दपार झाले पाहिजे असा डंका पिटू लागला. त्याच्या गर्जनांनी सगळे जंगल दणाणून गेले. वाघ,सिंह, लांडगे, कोल्हे सशाच्या गर्जनांचा आपापल्या परीने विचार करू लागले. पण नुसतेच विचार करीत राहिले.

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा.

विक्रमादित्य

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 20/10/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.

११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल.

अमृतरूपी झरा

लेखक शर्मीला यांनी रविवार, 19/10/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.

अमृतरूपी झरा

डोंगराच्या कुशीत मातीच्या पोटी
उगवला एक झरा
सहजच पाहिले मी त्याला

खळखळ हासत होता
पटपट बोलत होता
झरझर पुढे चालत होता

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.

त्रिवेणीचा प्रयत्न :

आज कधी नव्हे ते मला खरंच
यशाची किल्ली मिळाली आहे..

अरे! कुलुपच बदललं कोणीतरी !

******************************

यशाकडे जाणारा मार्ग
दिसत असतो...पण नेहमीच

अंडर कन्स्ट्रकशन असतो..

- प्राजु

(कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

देहबोली...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 18/10/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.

मंडळी, मी जेव्हापासून मराठी आंतरजालावर फिरू लागलो तेव्हापासून बरीचशी संकेतस्थळं आणि ब्लॉग्ज नजरेस पडले. या सगळ्याठिकाणी निरनिराळ्या व्यक्तिंनी हाताळलेले विषय खरोखर खूपच वैविध्यपूर्ण आहेत. काही म्हणता काही बाकी ठेवलं नाहिये पब्लिकने. पण एक विषय मात्र असा आहे की जो खुपदा हाताळला जातो. आणि त्या विषयावरच्या चर्चा खरोखर प्राणपणाने लढवल्या जातात (एक मुंबई-पुणे वादच या वादाला मागे टाकू शकेल :) ) तो विषय म्हणजे.... बरोबर ओळखलंत, भाषा आणि भाषेशी संबंधित शुद्धलेखन वगैरे उपविषय. या सगळ्या चर्चा अतिशय रंगतातच.

बातमी

लेखक mina यांनी शनिवार, 18/10/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.

जालना तालुक्‍यात २३० कुपोषित बालके

-१७ Oct९ber २००८

जालना- जिल्ह्यात श्रेणी तीन व चारमधील कुपोषित बालकांची संख्या सर्वांत जास्त २३० एवढी आहे. त्यातही जालना तालुक्‍यात कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव भेले यांनी दिली.

जेट नावाचा हिमनग

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/10/2008 23:42 या दिवशी प्रकाशित केले.

जेटची कर्मचारी कपात हा सध्या ज्वलंत विषय झाला आहे. अगदी सनसनाटी. जेट - किंगफिशर एकीकरण प्रस्तावापेक्षाही गाजलेला विषय.

जेटने माणसे काढली. गाजावाजा झाला. माणसे परत घेतली. संपले.