Skip to main content

विचार

विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे

लेखक कवटी यांनी बुधवार, 26/11/2008 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच अस झाल की परवा मी माझ्या पुतण्याला प्ले स्कूल मधे सोडायला गेलो होतो. खरे म्हण्जे त्याला एक छानसे पत्र लिहावे अशीच माझी इछ्छा होती. पण तो घरात राहुनच रोज २ तास शाळेत जाणार होता. त्यामुळे उगाच पोष्टाचा खर्च कशाला वाढवा असा सुज्ञ विचार मी केला. शिवाय 'शाळेत जाणार नाही ' असे त्याने जोर्दार भोकाड पसरले होते. त्यात त्याला पत्र वाचायला देणे मला तरी योग्य वाटले नाही. एक तर माझे अक्षर कुणाला लागत नाही. (माझे पेपर तपासणार्‍यांना ते कसे लागले आणि त्यानी मला कसे पास केले हा एक संशोधनाचा विषय आहे.

आकार

लेखक द्विज यांनी बुधवार, 26/11/2008 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी ब॑धू॑ना सादर समर्पित
आकार
परिस्थितीच्या कोन्डीतून जीवनाकडे पळणारा जिवन्तपणीच म्रुत्यूलाही ओशाळवणारा सावकाराच्या पिपाणीवरी डोलणारा अन्नदात्याच्या आयुष्याचा आकार हा सारा तापलेल्या उन्हामध्ये घाम वाळवितो कोरड्या भाकरीत जीव त्याचा पुरता सामावितो एका हातात लेकरु दुज्या हातात हा भारा अन्नदात्याच्या आयुष्याचा आकार हा सारा जीव केविला केविला त्याचा झिज झिज झिजे अठरा विश्वाची गरीबी त्याच्या खोपट्यात निजे कर्त्रुत्वात कर्तव्य आणि स॑सारपसारा अन्नदात्याच्
Taxonomy upgrade extras

बळी राजा....

लेखक ग्रीष्म यांनी मंगळवार, 25/11/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
गाळुनि घाम करी रात्रनदीन काम कधी कुलव पाभर कधी सोबत नांगर खेळ जीवनाचा त्यानं असा मातीत मांडला. मागतो दान दैव त्याच्याशी भांडला. धरनी आईच्या कुशीत परितो सा-या स्रुष्टिच धन भल्या आभळा एवढ गड्याच मोकळ मन बरसती नभ पडतात धारा धरनी आईच्या कुशीला मग फूटे पाण्याचा पाझर पेरितो रान सार मग पुन्हा मुखी पांडूरंगाचा गजर फुलून येत रान त्याच जसा मोराचा पिसारा आता खुलुन आल सपान त्याच त्याच्या दुखाला थोडा इसरा फूले त्याच रान दारी सावकार उभा ७/१२ च्या उता-यावर वाढलेला पिढयान पिढयानचा तो बोजा . लड़की लेक त्याची मैना हाती घेउन गोफन उभी ती पिकात ओठी गाण्यांची लकेर पाखरांचा थवा उड
Taxonomy upgrade extras

अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती

लेखक mina यांनी सोमवार, 24/11/2008 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला विचार आवडले म्हणुन मिपावर देत आहे.आपल्या काय वाटते लेखिका जे.के.रोलिंगच्या विचारांबाबत?माझ्या ब्लागवर हे विचार वाचकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत.
'हॅरी पॅटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे.के.रोलिंग यांनी जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 'अपयशाच्या'फायद्यावर प्रकाशझोत टाकुन विद्यार्थ्यांना एक नवा कानमंत्र दिला..हा कानमंत्र प्रत्येकासाठी बहुमोल ठरणारा आहे.म्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहे.पदवी घेतल्यानंतर लेखिकेचे सात वर्षे ही महाप्रचंड अपयशाची होती..त्याबाबत सांगतांना त्या

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 24/11/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता.

सांगा कसं शिकायचं ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 23/11/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,मी माझ्या नातीला निरोपाचे एक छोटेसे पत्र लिहीत होतो.ती आज युसी(अर्वाइन)एलेला पुढील शिक्षणासाठी रवाना झाली.तिला निरोप द्यायला मी विमानतळावर पण गेलो नाही. माझा नातू सुद्धा गेल्या आठवड्यात असाच तिच्या सारखाच युसी(एस सी) स्यॅनाकृझला पुढील शिक्षणासाठी रवाना झाला. त्यालाही मी निरोपाचं असंच एक छोटसं पत्रं लिहीलं.

""कालचक्र""

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 22/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य एक संध्या कोमल गंधार, कुसुंबी किनार क्षितिजाला... तेजस्वी रवीची किरणे सोनेरी, लाली गालावरी संध्येच्या का !?! मुग्ध प्रियतमा संध्या ती आरक्त, का 'रवी' आसक्त 'निशे'वरी ! दुखावली 'संध्या' हळवा गंधार, का क्षितिजापार गेला सखा..... हवेत गारवा नभी चंद्र तारे, मादक इशारे निशेचेही... आसुसला 'रवी' निशेच्या छायेला, कौमुदी कायेला चंद्र साक्ष... मिठीत 'रवी'च्या 'निशा'ही उन्मुक्त, प्रकाश अव्यक्त अंधारला... मेघाचा मल्हार, कित्येक प्रहर, प्रणय कहर, आसमंत..... पहाट भैरवी तिमिर छेदून, गगन भेदून, झंकारली.

हिशोब

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 20/11/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. दान दिले पण परताव्याचे योग ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले. दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..! – अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

निर्गुण निराकार.......

लेखक अनंत छंदी यांनी बुधवार, 19/11/2008 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
छ्या! आता डोकं ऊठणार! या कमलेश आणि शिरीषचं भांडण कसं मिटवावं बुवा? अरेरे... पलिकडच्या गायन क्लासातही आज पोरं नुसती विव्हळतायत.. एकाचा सूर धड लागेल तर शपथ.. आजचा दिवसच बेकार दिसतो... ए, थांबारे जरा.... कमलेश आणि शिरीष.. जरा धिरानं घ्या की... तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे काय बडबडताय? ए गप...गप्प बस जरा... हे काय? गायनक्लासवाल्या मॆडमनी हा कुठला सूर लावला? हिरना....हिरना... अरे ही तर कबिराची रचना दिसते....बरेच दिवसांपूर्वी कधीतरी कुमारजींच्या आवाजात ऐकलं होतं हे निर्गुणी भजन...

पाठीराखा (ही नवीन कविता आहे)

लेखक द्विज यांनी बुधवार, 19/11/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीराखा हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले भौतिकतेचे तामस मनातूनी सरले आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
Taxonomy upgrade extras