Skip to main content

बातमी २०२० मधील : देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे.

लेखक आम्हाघरीधन यांनी मंगळवार, 02/12/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे. दि.१जाने.२०२० -(बी. बी .शी.) आजवर दररोज घडणार्या विविध बोम्ब स्पोटान्ची आता भारतिय नागरिकान्ना सवय झाली होती परन्तु आज अचानक सर्व दहशत वादी सन्घटनान्नी शान्ततेचा नारा दिला असुन ते या पुढे एक दिवसा आड आपल्या कारवाया करणार आहेत असे अल्-कायदा आणी तत्सम सड्घटनाच्या प्रतिनिधीन्नि स्प्ष्ट केले. या घोषनेने भारतिय जनतेच्या मनात आजवर असलेले मळभ दुर होण्यास हातभार लागेल असे राजकिय विष्लेषेकान्चे मत आहे. याचा पुरावा म्हणुन काल दहशत वादी सन्घटन्नान्नी आपल्या हल्ल्यान्ची तिव्रता कमी केल्याचे राज्याचे मुर्खमन्त्री अमुक तमुक राव यानी जाहीर केले. नेहमीप्रमाणे आता मन्त्री राजिनामा देण्याच्या भानगडीत पडणार नाहित आणी निवडणुकिचा खर्चही वाचेल म्हणुन जनतेने आनन्द व्यक्त केला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1191
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया