Skip to main content

विचार

क्षण

लेखक झेल्या यांनी मंगळवार, 17/02/2009 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही रेंगाळंत किरणांतुनी, सावल्यांसवे खेळे गहन सावळे उजळे, उसळे घे हिंदोळे अचपळ उधळत दरवळ, झुळझुळ नितळ प्रवाही क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही नवखा नवल निनादी, नवथर झरझर जुनवे ढाळी आसवे केंव्हा, रुसवे हसवे फसवे विमुक्त हा स्वच्छंदी, बांधून दिशाही दाही क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही पुरता पुरे न केंव्हा, सरता सरे न केंव्हा झुरतो हरतो विरतो अन उरतो मनात तेंव्हा मुक्या बोलक्या स्वप्नी, रंगत रंगत (रंग तरंगत) राही क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही क्षण उदासी धुमारे, आल्हाद अन् शहारे डोलडोलवे चकवे, क्षण वादळे किनारे हाच पालवी झडही, हिरवाई
Taxonomy upgrade extras

दवबिंदू

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 16/02/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य ना..... एखाद्या दवबिंदू सारखं असल पाहीजे, छोटसंच पण अस की .... Living Life to its Fullest! तस पाहीलं तर दवबिंदू आहे काय ? एक थेंब पाण्याचा ? का एक क्शण .... गोठून गेलेला ? जगणं आणि मरणं सुद्धा दैवाच्या स्वाधीन केलेला ? खरंच.. जगता आलं पाहीजे एका दवबिंदू सारखंच ! एकदातरी ! पाणी असून वाहता न आल्यचं दु:ख नाही की , मोत्यासरखं दिसलो त्याच सु:ख नाही. कधी Observe केलंय का एखद्या दविबंदूला ? त्यात ना... "सुर्याला" स्वत:त पहाण्यची.... सामावण्यची... जिद्द म्हणा किंवा ताकद म्हणा... ती असते !! हां..

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

शिक्षणात हवे आहेत बदल

लेखक त्रास यांनी रविवार, 15/02/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत. त्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत जे घडते ते म्हणजे त्यांना त्याच्या आवडीच्या अनेक गोष्टी आयुष्यात लवकर करता येतात. असे अनेक चांगले शिकलेले लोक की ज्यांना शिकविण्याची आवड असेल त्यांना शाळांतुन Guest Teacher करुन तास घ्यावेत. ह्यासाठी शाळांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावे. वरील बदलाचा परिणाम मुलांवर तसेच शिक्षकांवर वरही पडेल व त्यांना प्रोफ़ेशन, व इतर हजारो बाबींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. २. असेच Guest Teacher तुम्हाला निवृत्त शिक्षकांतही दिसतील.

साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन

लेखक मैत्र यांनी शुक्रवार, 13/02/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम वेगळं मुखपृष्ठ आणि नाव वाचून कुतूहलाने एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि संपल्यावरच खाली ठेवलं. मूळ लेखिका: कारमेन बिन लादेन. अनुवाद - अविनाश दर्प, न्यूझीलंड. मेहता पब्लिशिंग हाऊस. परीक्षण लिहावं असं लिखाणात विशेष नाही. पण परिचय लिहावाच असं पुस्तक फार महत्त्वाचं आहे असं वाटलं. ते वाचायला मिळालं तर उत्तमच पण नाही जमलं तर गोषवारा इथे द्यावा आणि पुस्तकापेक्षा त्या संदर्भात काही चर्चा व्हावी असं वाटलं... क्रमशः चा लागण न करता एक मोठं लिखाण मांडतो आहे.

"कुठे काय" विषयी थोडेसे...

लेखक वाचक यांनी बुधवार, 11/02/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार (ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.) मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले.

सुख पुढे वाटे....

लेखक संध्यानंदन यांनी मंगळवार, 10/02/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
फुले चिखलात कमळ नाजुक सुंदर, काटेरी फणसात गरे रसाळ मधुर, दगडधोंडयातून वाहे ठंडगार झरा, ऊस असे कठीन पण रस वाटे बरा, झाड उभे उन्हात पण सावली का गार ? प्रकाशमय सूर्यास जन्म देई अंधार, घाव घातल्यावर
Taxonomy upgrade extras

अटी शर्थी लागु

लेखक सुचेता यांनी सोमवार, 09/02/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
अटी शर्थी लागु!! सुबक सुंदर मनोवेधक वाचताना जाहिरात खालील तळटीप लक्ष वेधुन घेत असते अटी शर्थी लागु!! एखाद्या आकर्षक योजनेच्या सादरीकरणात गुंतुन जत असताना आपण स्वप्ण रंजनात सांगितले जाते.. नियम शर्थी लागु!! सवलतींच्या दिलखेचक जाहिरातीत भुरळतो आपण, अन शेवटी कळते आपल्याला अगदी अटी शर्थी चार्जेस लागु!! जन्माच्या जोडीदाराशी संसाराची स्वप्ण रंगवताना हळूच कोणी अनुभवी जाणवून देते नकळत..
Taxonomy upgrade extras