Skip to main content

विचार

'वीज बचत' आणि 'सुरक्षा'

लेखक लक्ष्मणसुत यांनी बुधवार, 25/02/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
'वीज बचत' आणि 'सुरक्षा'- आज अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. भारनियमनावरचे विडंबन वाचले आणि लिहावेसे वाटले. आपल्या घरात, कार्यालयात आणि इतर ठिकाणी विजेचा वापर करताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपणांस वीज कंपनीवर ताशेरे ओढायची वेळ येणार नाही. साधारणपणे शंभर चौरस फुटांच्या खोलीत १४ ते १८ वॅट क्षमतेचा दिवा (सी.एफ.एल.) पुरतो. तर संडास/ बाथरूम मध्ये ५ वॅटचा सी.एफ.एल भरपूर प्रकाश देतो. 'शीतकपाटांची' (फ्रीज) तापमानकळ नेहमी लघुत्तमवर ठेवली तरी चालते. तसेच सर्वजण हॉलमध्ये आणि बेडरूम वकिचनचे दिवे पंखे चालू अशी परिस्थिती असते. या सर्व बाबींचा विचार करायलाच पाहिजे.

वळण !!

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 25/02/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?

भारनियमन..

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 25/02/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून) एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले. जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले. मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला. आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले. एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा, तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले. वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा. पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले. लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे. मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले. भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली. राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले. -- अभिजीत दाते (एक लोडशेडींगने त्रस्त मिपाकर) मूळ गीत - मेघ नसता वीज नसता कवी - संदिप खरे

इंदुरात 'लिटिल चॅम्प्स'

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/02/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते. सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते.

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट

लेखक केदार यांनी मंगळवार, 24/02/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय.

मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/02/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा आठवा लेख
आयुष्यावर बोलु काही
लेख वाचण्यापुर्वी - हा लेख स्कॅन स्वरुपात आहे खरेतर हा लेख मी पुर्वीच लिहिलेला आहे तेव्हा तो परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून स्कॅन कॉपी देत आहे.

तालिबानीस्तान !

लेखक भोचक यांनी बुधवार, 18/02/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.