यंदा कर्तव्य आहे भाग ३
यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत यंदा कर्तव्य आहे भाग १ यंदा कर्तव्य आहे भाग २
मनोगत यंदा कर्तव्य आहे भाग १ यंदा कर्तव्य आहे भाग २
एकनाड
आमच्या एका मित्राच्या लग्न जुळविण्याचे वेळी प्रथेप्रमाणे काही कुंडल्या व फोटो बायोडाटासह येउन पडल्या होत्या. मित्राचे वडील त्याचे सॉर्टिंग करीत होते. त्यातील काही पत्रिका त्यांनी प्राथमिक फेरीतच बाद केल्या. ते म्हणाले, '' स्थळ चांगली आहेत पण एकनाड आहे. त्यामुळे बाद कराव्या लागल्या.`` त्यांना पंचांगाची परिभाषा थोडीफार समजत होती. एवढया भांडवलावर असलेले ज्योतिषज्ञान एकनाड समजण्यास पुरेसे होते. पाच अधिक पाच बरोबर दहा हे सांगायला रॅन्गलर व्हावे लागते काय? एकनाड असल्यास संतती होत नाही अथवा अडचणी येतात हा ठाम समज! पूर्वी रक्तगट समजण्याची सोय नसल्याने आपले पूर्वाचार्य एकनाड पहात असत असा वैज्ञानिक मुलामाही काही लोक देतात.
खरं तर या समजुतीत काहीही तथ्य नाही. फलज्योतिषात नाडी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही. एकनाड-दोषामुळे होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. नाडीग्रंथात नाडी म्हणजे एक पळाचा अवधी. शरीरशास्त्रात नाडी म्हणजे रक्तवाहिनी. फलज्योतिषात अमुक नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाची नाडी अमुक एवढेच सांगितले आहे. अंत्य, आद्य, मध्य अशा तीन प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. जगातला प्रत्येक माणूस या तीनपैकी कोणत्या तरी एका नाडीचा असतोच. पंचांगात अवकहडा चक्र नावाचे एक कोष्टक असते. त्यावरून जन्मनक्षत्राच्या आधारे तुमची नाडी कोणती ते कळते. उपवर मुलगा व मुलगी या दोघांची नाडी एकच आहे असे दिसले तर तिथे एकनाडीचा दोष आहे म्हणून त्या दोघांचे लग्न करू नये कारण अशा जोडप्याला संतती होत नाही अशी वेडगळ श्रद्धा प्रचलित आहे. वधूवरांची नक्षत्रे आद्यनाडीत असता वियोग, मध्यनाडीत असता दोहोचा नाश व अंत्य नाडीत असता वैधव्य व अतिदु:ख अशी फळे काही ग्रंथात दिली आहेत. पत्रिका-गुणमेलनात नाडीला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिले आहेत. एकनाड असता नाडीचे शून्य गुण अन्यथा थेट आठ गुण असा मामला आहे नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडण्याचा प्रयत्न काही ज्योतिषीलोक करतात पण तो त्यांचा कावेबाजपणा आहे. का? ते पहा. रक्तगट हे ए, बी, एबी, ओ, आरएच पॉझिटीव्ह व निगेटीव्ह असे एकूण आठ प्रकारचे आहेत. तीन नाडया व आठ प्रकारचे रक्तगट यांचा कुठेही गणिती ताळमेळ बसत नाही.एकनाड-दोषामुळे जोडपे निपुत्रिक रहाते ही समजूत जर खरी असती तर संभवनीयतेच्या नियमानुसार जगातली एक-तृतीयांश जोडपी निपुत्रिकच राहिली असती! पण तसे काहीच आढळत नाही. यावरून उघड दिसते की ही समजूत म्हणजे एक खुळचटपणा आहे. एकनाड-दोषाला काही अपवाद गर्गसंहितेमध्ये दिले असले तरी पूर्वीच्या व आजच्याही ज्योतिष्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा अंधानुकरणाने म्हणा किंवा स्वार्थामुळे म्हणा एकनाडीचे फालतू स्तोम माजले आहे.
एकनाड-दोषावर आजवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झालेला दिसतो की आता दाते पंचांगात नाडी-दोषाचे वेगळेच परिणाम सांगण्यात येवू लागले आहेत. तिचा संबंध आता संततीशी नसून माणसाच्या स्वभावाशी जोडण्यात आला आहे, संतती बाबत मौन पाळण्यात आले आहे, पण एकनाडीमुळे मृत्यूदायक दोष निर्माण होतो अशी दहशत आता नव्याने घातली आहे ! दुसरा महत्वाचा बदल म्हणजे एकनाड दोष ठरवण्यासाठी आख्ख्या नक्षत्राऐवजी त्याचा फक्त एक चरणच विचारात घ्यावा असे नरपतिजयचर्या स्वरोदय या ग्रंथाचा आधार देउन सांगितले आहे. या बदलामुळे एकनाड दोषाच्या केसेसचे प्रमाण एकदम खाली येउन ते फक्त २५ टक्क्यावर येते असा दावा केला आहे. पण या प्रकाराचा खरा अर्थ काय होतो ते पहा. गेली शेकडो वर्षे चालत आलेल्या रूढीमुळे ७५ टक्के केसेस मध्ये निष्कारणच एकनाड-दोष मानून स्थळे नाकारली गेली असाच याचा अर्थ होत नाही का ? आम्ही तर म्हणतो की एकनाड-दोष ही कल्पनाच मुळी कालबाहय झाली असल्यामुळे तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करावे.
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८
वाचने
15076
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
हम्म
In reply to हम्म by अवलिया
असेच
छान माहिती..
In reply to छान माहिती.. by शितल
असेच म्हणतो ...
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
.
शंभर टक्के सहमत
In reply to शंभर टक्के सहमत by आनंद घारे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रकाश घाटपांडे
एकनाड =
In reply to एकनाड = by दशानन
नाडी म्हणजे काय नाही?
~~~
पति व पत्नीची एकनाड
In reply to पति व पत्नीची एकनाड by योगिता_ताई
संतती
In reply to पति व पत्नीची एकनाड by योगिता_ताई
ह्म्म