निमित्त ८ मार्च ...
( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे . ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३र्या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे . पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे .
भारताचाच नाही तर जगातील प्रगत अशा युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेचा इतिहास पाहिला तर सगळीकडे महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप मोठा लढा द्यायला लागलेला दिसतो ... अर्थात त्याला काही अपवाद आहेत . पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापुरतेच..
मिसळपाव
