Skip to main content

विचार

आणखी एक पुणेरी पाटी...

लेखक ओंकार देशमुख यांनी मंगळवार, 21/07/2009 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेकरांच्या सूपिक डोक्यातून नेहमीच नवीन काहीतरी उगवत असतं... पुणेरी पाट्या म्हणजे तर बारमाही पीक... आता खालची पाटी बघून कोणी या मेस मधे जेवायला जाइल का असा प्रश्ण नक्कीच पडेल... पण ह्या पाटीवरून पुणेकर मंडळी नियमांची किती पक्की असतात हे लक्षात येतं !! गिहाईक गेलं तरी चालेल ,पण नियम हे पाळलेच गेले पाहीजेत....

इतिहासाचे एक पान...

लेखक दशानन यांनी सोमवार, 20/07/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुलै १९६९ ! आज पासून चाळीस वर्षामागे मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवली, अपोलो -११ दरमजल करुन २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रांग, एडविन एल्ड्रिन व मिशेल कॉलिंस ह्यांना घेऊन पोहचले तो मानवी जिवनाच्या वाटचालीतील एक उतुंग क्षण ! आपली धरती सोडून आपण आकाशाच्या पण पलिकडे चंद्रावर पोहचलो. नील आर्मस्ट्रांगने सर्व प्रथम चंद्रावर पाय ठेवले.. ह्या गोष्टिला आता ४० वर्ष झाली...

पारध झालेला तो पारधी - २

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 16/07/2009 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहजकाकांनी व्य. नि. मलाही केला होता. तो धागा खूप पुढं गेल्यानं हा नवा धागा काढतोय. मूळ धागा
---
सहजरावांचे म्हणणे - सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न.

पारध झालेला तो पारधी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 15/07/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
* हे सर्व अनुभव मी स्वतः सोळा वर्षांपुर्वी घेतलेले आहेत. परंतु ते कुठेच शब्दबद्ध केलेले नव्हते. केवळ आठवणीच्या आधारे लिहिताना काही गोष्टींचा थोडाफार विपर्यास होऊ शकतो यासाठी हे लिखाण कथा या सदराखाली केले आहे. १९९३ च्या जुनचा तो बहुधा दुसरा आठवडा असेल. एके दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेसनोट मधे एका बारामतीला दोन दिवसाआधी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची माहीती होती. चोरी हा तसा पुण्यासारख्या शहरात नेहमी घडणारा गुन्हा.

गुगल नावाची पुस्तकाची खाण

लेखक विकास यांनी शनिवार, 11/07/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्‍या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते. अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे.

म्हातारपण!!! नको गं बाई..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 10/07/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
अजून बस आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना घेण्यासाठी त्या स्कूलबसच्या पिक-अप- ड्रॉप ऑफ स्टॉप वर उभ्या होतो. इतक्यात बस आलीच. लेकाच्या वर्गात आमच्या कॉम्प्लेक्स मधली ४ जणं आहेत. आणि शिवाय के जी च्या दुसर्‍या वर्गात असणारी आणखी ५-६ जण आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या हे सगळे केजी'कर इतका चिवचिवाट करत असतात.. आपल्या बॅगा आयांच्या ताब्यात देऊन हे सगळे मस्त बागडत कुठे झाड्याच्या वाळलेल्या काठ्या गोळा कर, कुठे फुले तोड.. कुठे पेबल्स गोळा कर.. असं करत करत , शाळेत काय झालं हे सांगण्याची अहमहमिका लावत हे सगळे उड्या मारत घरी जातात. पण आज.. सगळंच शांत होतं. थोडं आश्चर्य वाटलं.