Skip to main content

विचार

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

बाबा कदम कालवश झाले.

लेखक नरेन यांनी बुधवार, 21/10/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सकाळ वाचताना बातमि कळाली मराठि साहित्यातील थोर कादम्बरीकार बाबा कदम कालवश झाले आमचि विनम्र आदरान्जली.

व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 20/10/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो. उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल.

डार्विनच्या अनुयायींनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 19/10/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच सांगते की, डार्विनचा सिद्धांत मला पटलेला नाही व दिशाभूल करणारा आहे. माणूस जर माकडापासून उत्क्रांत झाला आहे तर हे असे कसे?- १. माकडात आणि मानवाच्या गुणसुत्रांमधे फक्त २ टक्क्यांचाच फरक आहे असे तुम्ही म्हणता. म्हणजे मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल तर प्राणी उत्क्रांत होतांना तो निसर्गाच्या जवळ न राहता दूर कसा जाईल? - माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते - माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो?

दिवाळी...

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 16/10/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
काल असेच नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऒफिस बंद करुन मी घरी चाललो होतो, दिवाळीला आता दोन दिवसच राहिले, सगळीकडे दिवाळीची घाई चालू असलेली दिसत होती, आमच्या मार्केटमध्ये तर गर्दी खुप दिसत होती, तशी पाहता मला गर्दी आवडत नाही.. पण अनेक वर्षानंतर दिवाळीच्या गर्दीचा अनुभव घ्यावा असे वाटले व त्या गर्दीत मी पण मिसळून गेलो, कधी ह्या दुकानात जा कधी त्या दुकानात जा असे चालूच होते व अचानक एका दुकानात एक मुलगा पाहीला असेल वय १३-१४ चे आपल्या वडीलांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दुकानातील गर्दीला संभाळत होता..कपडे दाखवत होता... घड्या घालत होता.. व डोळे एकदम पाणावले...

पाऊस कधीचा पडतो

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 16/10/2009 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता.

हक्क

लेखक सूर्य यांनी मंगळवार, 13/10/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या सकाळी सकाळी उठुन सात वाजता मी मतदान करुन येणार". मी बायकोपाशी जाहीर करुन टाकले. आज इ-मेल आली होती. कंपनी इज कमिटेड टु एनेबलिंग इट्स एम्प्लॉइज टु कास्ट देअर वोट. थँक यु फॉर एक्सरसाईजींग युवर राईट टु वोट. कंपनीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली होती. 'राईट टु वोट', हक्क ..हम्म.. मी मनाशी म्हटले. आपला हक्क आपण बजावलाच पाहीजे. 'परिस्थीती वाईट आहे' असे म्हणुन आपण नेहेमी शिव्या घालत असतो. आपले काम आपण कधी करणार. लेट मी कंप्लीट माय टास्क. त्या विचारातच घरी आलो होतो. बरेच वर्षात सुट्टी असताना घड्याळात सकाळचे सात वाजलेले बघितले नव्हते. आज बघितले. मतदानाला जायचे आहे, मनात घोळत होते.

गूढ कथा: अगम्य आघात!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 12/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क सुजय सूर्वे गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून पाहिल्यावर कधी नव्हे तो सूर्य आज अगदी तेजस्वी दिसत होता. सुजय अगदी अभ्यासू आणि आज्ञाधारक मुलगा. तितकाच अंगापिंडाने मजबूत. रोजच्या दिनक्रमात व्यायामाला तो महत्त्व द्यायचा. यंदाचे बारावीचे वर्ष. पीसीएम ग्रुप निवडला होता त्याने. मॅथ्स त्याचा आवडता विषय. रोज सकाळी पाच वाजता उठून तो सहा वाजता सुरू होणार्‍या मॅथ्स च्या ट्युशन साठी तयार व्हायचा. ट्यूशनला जायला पप्पांनी घेवून दिलेली स्कूटी त्याला उपयोगी पडायची. बोचरी थंडी. बरेचदा धुके रस्ता व्यापून टाकायचे.

तहान

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा