Skip to main content

विचार

लाभले दुर्भाग्य आम्हास...

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 30/03/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.'' ...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून! वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च!

भिकारी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 29/03/2010 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी फेरफटका मारताना गल्लीतील भुभ्यांबरोबर थोडस खेळल्यावर पुढे गेलो. भुभ्यांच्या गार गार नाकाचा सुखद स्पर्श मनात रेंगाळत होता. चालता चालता कोपर्‍यावर एक भिकारीसदृष माणुस स्वत:शीच बोलत होता. "हरामखोर साले ....... " अज्ञात व्यक्ति वा समुहाबद्दल मनात विखार होता. भाषा हिंदी वाटत होती. नजर शुन्यात होती. दाढी वाढलेली. अगदी ग्रीक तत्ववेत्यांसारखी. पॆंट शर्ट मेणचट्ट.मध्यम बांधा, उंची अंदाजे पावणे सहा फुट. तिरिमिरीत चालत होता. माझे लक्ष त्याच्याकडेच होते.लोक त्याला टाळत होते. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. त्याला न्हाउमाखु घातले असते व चांगले कपडे घातले असते तर रुबाबदार दिसला असता.

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

सुटका

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 29/03/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
(मरणानंतर माणसाचे काय होत असेल, ह्या पुढचे दुसरे जीवन ईथेच पृथ्वीवर असेल की दुसऱ्या एखाद्या ग्रहावर? असा विचार कधीना कधी सगळ्यांच्याच मनात येऊन गेला असेल. मी असेही भाष्य ऐकले होते, की मरणानंतरचा काही काळ मृतात्म्याला खूप कठीण जातो. पुढचा प्रवास सुरू झाला नसतो. एक लोंबकळणारी विचित्र अवस्था असते. शरीर सोडले, तरी ईच्छारूप शरीराचे बंध सुटलेले नसतात. आपल्या संस्कतीत मरणानंतर आप्तस्वकीयांनी करण्याचे अनेक विधी सांगीतले आहेत. तेराव्या दिवशीचे श्राद्ध तर मृतात्म्याच्या शांतीसाठी आणि पुढचा प्रवास ठीक होवो यासाठी फ़ार महत्वाचे मानले जाते. चिनी संस्कृतीत देखील बरेच साम्य असणारे अशा प्रकारचे विधी आहेत.

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः