Skip to main content

विचार

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 27/11/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी चालु आहे. अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का? नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो. थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं.

तेथे कर माझे जुळती

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 25/11/2010 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
तेथे कर माझे जुळती आज २६/११/२०१०! मुंबईच्या ’शिरकाणा’ला दोन वर्षें झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनस, रंगमंदिर गल्ली, मरीन ड्राइव्ह, ट्रायडेंट व ताजमहाल हॉटेल अशा अनेक जागी 'प्रेमळ' शेजारी देशातून आलेल्या अतिरेक्यांनी थैमान घातले! रंगमंदिर गल्लीत करकरे, कामटे व सालसकर हे तीन मोहरे पडले.

२६/११ !

लेखक रन्गराव यांनी गुरुवार, 25/11/2010 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या २६/११! सगळी प्रसार माध्यम ह्या काळ्या दिवसाची आठवण न चुकता करून देतात. २६/११ म्हंटलं की मला गुलाल मधील "शहर हमारा सोयो थो" (http://www.youtube.com/watch?v=a4kSGe0wqbI) हे गाणं आठवतं. (का ते तुम्ही गाणं एकलं तर कळेलच). मग डोकं भनभनलंकी लगेच त्यातलच "सरफरोशीकी तमन्ना" एकतो ( स्वत:वर हसण्याची हिंमत असेल तरच लिन्क क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=qWf1Fe_jPRE ). मग लगेच जैसे थे.

सांडून येतो..

लेखक गवि यांनी बुधवार, 24/11/2010 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” .. “मुकंदर ऑर सिकंदर ?”..

झिंग थिंग..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 24/11/2010 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे.. आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली .. पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!! संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली.. हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !! मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने.. गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!! कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला.. लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं.. त्याचा पुनर्जन्म झाला.. आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !! ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही.. लाईम अँड लेमोनी लिम्का..

इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/11/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो बाजारात रोज नवनवीन प्रॉडक्ट्स येत आहेत. आपणही येथे काही नवी उत्पादने तयार करायची आहेत. इथे त्यांची झैरात करायची आहे. एकच अट आहे ही प्रॉडक्ट्स इनोव्हेटिव्ह असायला हवीत. एखादे जुनेच प्रोडक्ट नव्या प्रकारे उपयोगात येऊ शकेल , एखादे प्रोडक्ट जुन्याच प्रॉडक्ट्चे नवे व्हर्शन असेल. तर एखादे अगदीच नवे असेल. त्या प्रॉडक्टचे फायदे इथे लिहायचे आहेत. प्रॉडक्टची झैरात करायची आहे. उदा: "पटापट" रीयूजेबल बबलगम. जगात प्रथमच रीयूजेबल बबलगम एकदाच खा महिनाभर वापरा. याचे फायदे महा बचत बबल गमचा खर्च किमान तीस पटीने कमी. दात पाडायच्या खर्चात १०० % बचत टूथपेस्ट च्या खर्चात बचत.

दडपलेल्या पोह्यांची कहाणी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 23/11/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आय वॉन्ट येल्लो पोहाज फॉर लंच इन माय टिफिन, दॅट्स ईट!" पिल्लू इरेला पेटलं होतं. का? तर त्याला डब्यात पोहे हवे होते. इतके दिवस, सकाळी ७.४५ ला केलेले कांदेपोहे/बटाटे पोहे दुपारी १२.२० ला हा खाईपर्यत ते नको इतके गार होणार आणि ते ही सध्याच्या थंडीच्या दिवसांत ते हडकून जातील , नो डाऊट! या विचाराने मी त्याला डब्यात पोहे देणे टाळत होते. पण गेल्या आठवड्यात शाळेतून घरी आल्या आल्या रणशिंग फुंकलं गेलं आणि पोह्यावरून आकाश पाताळ एक झालं! "आय वॉन्ट यल्लो पोहाज.. दॅट्स इट!" पिलू हेका सोडत नव्हत आणि मी उगाचच त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत होते..

पुरस्काराचा भुलभुलैया

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 23/11/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुरस्काराचा भुलभुलैया “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा. (संदर्भ :- http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही.

आजकाल..खरंतर..आणि आठ पैलू..

लेखक गवि यांनी मंगळवार, 23/11/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
ओल्या मोज्यांचा येतो तसा शब्दांचा वास येतो. लोक लिहितात. बोलतात. आपण वास घेतो. "आजकाल" या शब्दानं सुरुवात झाली की टीकेचा, निराशेचा, अपचनाचा, वार्धक्याचा, त्रिफळा चूर्णाचा वास सुरु. "आजकाल" हा एवढा शब्द ऐकून मनाची निराशा सुरु करून टाकावी.