Skip to main content

विचार

बाबूकाका

लेखक यकु यांनी सोमवार, 03/01/2011 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते.

तात्या अभ्यंकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना !

लेखक नीलकांत यांनी रविवार, 02/01/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ,
Tatya
आज आपल्या मिसळपावचे संस्थापक श्री तात्या अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे. मिसळपाव उभारणीत आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिसळपावच्या तात्या अभ्यंकरांना मिसळपावच्या सर्व सदस्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.

उस्ताद अमीरखाँसाहेब !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 01/01/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख माझ्या आजोबांना म्हणजे कै. केशव चिंतामण कुलकर्णी यांना अर्पण. यांनी मला शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली तो दिवस मला आजूनही आठवतो. सवाई गंधर्वला मी त्यांच्या मांडीवर मस्त झोपलो होतो. तेव्हा पं भिमसेन जोशी गात होते. पण मी त्या दिवशी बरेच ऐकले हेही तितकेच खरे. मी मला वाटते चवथीत असेन. माझे आजोबा स्वत: उत्तम पखवाज वाजवायचे. दुर्दैवाने मला न ऐकवताच ते गेले. उस्ताद अमीरखाँसाहेब ! १७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील.

प्रत्येक दिवस नूतन आहे...

लेखक ज्ञानराम यांनी शुक्रवार, 31/12/2010 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव.. सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ? किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर, किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल, नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं क