विचार
पुस्तक
आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते.
नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात. संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल.
चाळ नावाची वाचाळ संस्कृती
कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल म्हणूनच ही मत बनली असतील. तसचं काहीस बाकी लोकांच असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील .
मस्कत कट्टा - दोघांचाच पण दिलखुलास..
नमस्कार मंडळी,
कामानिमित्ताने कुठे कुठे फिरणं होत असतं हे तुम्हाला माहिती आहेच, असाच उडतउडत इकडे मस्कतमधे आठवडाभर येउन पडलो, एक दिवस इकडे जरा स्थिरस्थावर होण्यात गेला, मग नेहेमीप्रमाणे इथे पहायला काय आहे, फिरायला काही आहे का वगैरे शोध चालू झाला, फेसबूकावर ज्योतीतैशी गप्पा मारता मारता, तिने सांगीतले आपले मिपाकर प्रभाकर पेठकरकाका तिकडेच असतात, जमलं तर भेट.
देव - सनातन प्रश्न!
देव आहे अथवा नाही? सनातन प्रश्न. चावून चोथा झालेला विषय. त्यात ही आणखी एक भर. असो.
प्रत्येकाची धारणा वेगळी. प्रत्येकाचे मत वेगळे. कोणाची बरोबर अन् कोणाची चूक हे आपण कोण ठरवणार? हा अधिकार कोणाचा? त्यातही मी कोणावर विश्वास ठेवायचा?
देवाचं अस्तित्व नाकारयचं म्हटलं तर मला आपसुक एक प्रश्न पडतो- संतांचं म्हणणं, वागणं, त्यांचे अनुभव, त्यांनी सांगीतलेलं मर्म; हे सर्व थोतांड होतं असं मी मान्य करू शकतो का? माझ्या ते पचनी पडतं का? कारण तसं नाही झालं तर आपल्याच मताशी अप्रामाणिक असल्यासारखं होईल. मी स्वत: तरी ते करू शकत नाही. कारण संतांवर मी अविश्वास दाखवायचं एकही संयुक्तिक कारण मला सापडत नाही.
एपिक फॉल
कालच ७ वेळा टुर द फ्रांसचा विजेता लॅन्स आर्मस्ट्राँग याने सुरुवातीपासुनच परफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्र्ग्ज घेतले याची कबुली दिली.
याआधी त्याने अगदी शपथेवर खोटं बोलुन झालेलं आहे.
मुलाखतीत त्याने तो जे प्रकार करत होता त्याविषयी तेंव्हा आपलं काही चुकतंय वगैरे वाटत नसल्याचं सांगितलं.
एक लिंक :
http://www.youtube.com/watch?v=QTHSFRndS1s
आता आमच्या डोक्यात एक किडा वळवळला की बहुतेक खेळाडु टिकुन रहायच्या आशेने असले कैतरी उद्योग करत असतात. क्रिकेट मधे मॅच फिक्सिंक होत होतं / आहे. पण क्रिकेटर्स डोपींग करत असतील का?
८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.
सौदी संस्कृती
आजकाल माणूस एकमेकापासून दुरावत चालला आहे.
आपल्या शेजार्यासाठी आपण कितीसे करतो.
पण शेकडो मैलवर राहणारी सौदी अरेबियातील काही महान माणसे आपल्या प्रेमाची छाया
केवळ आपल्या देशापुरतीच मर्यदित न ठेवता आपल्या प्रेमाची पाखर भारतीयांवरही घालत आहेत.
हे कार्य अव्याहतपणे गेली काही वर्षे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इथे सुरू आहे.
सौदी अरेबियन लोकांच्या विशाल हृदयामुळे येथल्या अनेक जणांना केवळ प्रेमच नव्हे तर
पैसासुद्धा मिळाला आहे.
मात्र एवढे सारे करूनही या कामाची जाहीरात होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाते.
"ते" - ६
"ते" -१
"ते" -२
"ते" -३
"ते" -४
"ते" -५
एक तरुण जीव घेऊन पळत होता आणि त्याच्या मागे एक विचित्रच जनावर सुटलेलं होतं. आम्ही दोघेही पुढे धावत आल्यावर ते थोड बिचकलं, अंधारात ते नक्की काय आहे ते कळत नव्हतं. उंच, काटकुळं. फुसफुसण्याचाही आवाज येत होता. ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो तरुण आमच्या पायाशी येऊन पडलाच.
मिसळपाव
***