Skip to main content

विचार

एक विमान हरवलेलं...

लेखक चावटमेला यांनी रविवार, 10/02/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठीवर दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मधली सुट्टी नावाचा एक छान कार्यक्रम असतो. सलील कुलकर्णी अँकरींग करतो. वेगवेगळ्या गावांतील शाळांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांशी एक सुंदर संवाद साधायचा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एरवी तो सलील त्याच्या रिअ‍ॅलिटी शोज मधल्या भाषणांनी कधी कधी डोक्यात जातो, पण हा शो मात्र मला मनापासून आवडतो.तर,ह्या आठवड्याच्या भागात, सांगली जवळच्या एका खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शो होता. सलील चा नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद सुरू होता.

"संवाद"

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 09/02/2013 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चक्र तेथुन उडुन 'उध्दवा'च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले ! . . . अगदी काल परावाची गोष्ट . ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ... " हे बघा वत्सांनो , मला तुमची आगतिकता समजते ...पण तुम्हाला अजुन तुमचे नशीब शोधायला बाहेर पडला नाहीत .ते स्वतः येवुन तुम्हाला कसे भेटेल ? असो .

जात - कदाचित एका वेगळा विचार

लेखक श्रीमत यांनी शुक्रवार, 08/02/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
"मी जात मानतो ,मानत नाही" हे माझे मत मी इथे मांडत नाही आहे. एक विचार सहज मनात आला म्हणून............. जर 'जात' ह्या शब्दाला आपण "एक प्रकारची विशिष्ट जीवनशैली" असे समबोधले तर प्रत्येकजण आज ज्या जीवनशैली जगतो आहे,त्यात तो जितका जास्ती रुळला आहे किवा Comfortable आहे त्याला तितके इतर जीवनशैलीत रूळने कठीण जाते किवा जाऊ शकते. कोणत्याही जातीचा उल्लेख न करता एक ( काल्पनिक ) उदाहरण.

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 06/02/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

शत्रुघ्न

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/02/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत. नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले.

जात जातच नाही ... काय करू??

लेखक दीपकशेठ यांनी सोमवार, 04/02/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना...

स्वामिनी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 01/02/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं. तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा.

मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी

लेखक राजघराणं यांनी गुरुवार, 31/01/2013 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) १. गांधीहत्या आणि मी विद्यार्थिदशेत मी मुंबई ला राहायचा . बांद्रे . मातोश्री पासुन पाच मिनिटावर . हिंदुत्वान भारलेलं वातावरण होत . रुद्राक्षाच्या माळा . गंध . शाल . खणखणाट. शिवसेनेच्या शाखेवर कोलनितलि पोरं पडिक असत. कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजिंचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई . आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला होता.

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता.

मोस्ट ईलिजिबल बॅचलर.....

लेखक जयू कर्णिक यांनी बुधवार, 30/01/2013 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार. ‘हॅलो…’ आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही.