Skip to main content

विचार

मोजमापं आणि त्रुटी - २

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 18/03/2013 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा दुसरा भाग मला चौदा मार्चला, म्हणजे पाय दिनाला प्रसिद्ध करायचा होता. इतर कामांत गुंतलेलो असल्यामुळे थोडा उशीर झाला. आता तुम्ही म्हणाल की या मोजमापांचा आणि 'पाय' चा काय संबंध? उत्तर सोपं आहे. गेल्या लेखात मी तीन आकृती दिल्या होत्या. त्यांच्यातल्या सरळ रेषेची लांबी आणि वक्राकाराची लांबी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं होतं. या गुणोत्तरातून पाय ची किंमतच अप्रत्यक्षपणे मोजली जात होती. कशी ते सांगतो. पाय म्हणजे वर्तुळाचा परीघ भागिले व्यास. व्यास मोजणं सोपं आहे - कारण ती एक सरळ रेषा असते. वर्तुळाचा परीघ मोजणं मात्र सोपं नाही.

साक्षात्कार

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 16/03/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : साक्षात्कार या शब्दातून कोणताही दैवी अगर परमेश्वरी साक्षात्कार या लेखात अभिप्रेत नाही. a समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... मी जात आहे..की येत आहे ?

मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 12/03/2013 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते.

इमोशनल फुलांच्या देशा…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं. आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे. आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य. 40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय...

बलात्कार ... स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता

लेखक सप्पुभाई यांनी रविवार, 10/03/2013 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस विचार करत होतो, या विषयावर लिहावे की..नको... पण आजच्या वर्तमान पत्रात पुन्हा एकदा बातम्या वाचल्या... "जुहू मध्ये एका ३वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बस मध्ये बलात्कार" "नागपुर मध्ये दरडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार"... आणि स्वताला रोखूच नाही शकलो.. रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच.... या वासनान्ध राक्षसांपासुन आपला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देखील वाचू शकला नाही.... नुकताच दिल्लीतिल त्या काळ्या घटनेला एक महिना पूर्ण झाला... मेणबत्ती मोर्चा काढून किती आणि काय परिणाम होतो माला नाही माहीत...

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/03/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

प्रेम - भक्ती

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 10/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत. संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं.

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

लेखक लिलि काळे यांनी शनिवार, 09/03/2013 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का? आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे. अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात.

महानंदा चित्रपटातील अस्वस्थ करणारा प्रसंग

लेखक शुचि यांनी शनिवार, 09/03/2013 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.
हे वाक्य म्हणून वाचायला बरे आहे. पण खरच अशी कला जेव्हा सामोरी येते, तेव्हा भयंकर वाटते. खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता.

लेफ्ट राइट की डावे उजवे

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 06/03/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी 'डावे, उजवे' असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते.