Skip to main content

विचार

सावधान........

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 21/06/2013 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली ..... एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही.. सावधान....... सावधान....... सावधान.......

पवारसाहेब, कलमाडी, गाडगीळ.

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 20/06/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणूकीचे वेध आता सगळ्यांनाच लागले आहेत. तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी निरनिराळया आघाड्यांवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. पूर्वीच्या काळी देशात घडणार्‍या अनेक गोष्टींचे पुणे हे केंद्र असे. मागील काही काळात कलमाडी, प्रदीप रावत, विट्ठल तुपे, अण्णा जोशी असे खासदार पुण्याला मिळाले पण देशपातळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याला मिळालेला नाही. भाईंचे नाव झाले तेही चांगल्या गोष्टींसाठी नाही. पण पुण्याची निवडणूक अनेक गोष्टींसाठी गाजते. अण्णा जोशी विरुद्ध विट्ठलराव गाडगीळ अशी पहिली निवडणूक झाली.

कृष्ण - एक विवेचन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 19/06/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कृष्ण या रचनेवर कधीतरी लिहावे असे मनात होते. बहुदा, ह्या रचनेचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मी रचनेतून योग्य रित्या पोहचवू शकलो नाही. अर्थात हा माझाच एक कवी म्हणून पराभव म्हणायला लागेल. कुठलीही रचना करतांना ती सुबोध आणि सहज व्हावी हाच उद्देश असतो, पण कां कोण जाणे हि रचना तशी झाली नाही. मग विचार केला, थोड लिहाव यावर आणि सांगाव कि मला नक्की काय अभिप्रेत आहे ते. म्हणून हा लेखनप्रपंच.कृष्ण ह्या व्यक्तिरेखेला अगणित पदर आहेत. प्रत्येकाला तो वेगळा दिसतो आणि यातच व्यासांच्या अतुलनीय प्रतिभेचे यश आहे.

(जंगलातला) आजोबा !!

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 16/06/2013 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

लेखक सुज्ञ माणुस यांनी शुक्रवार, 14/06/2013 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने. त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 14/06/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२९ मे २०१३ आज ऑफिसमधून घरी आलो, बॅग फेकली, कपडे भिरकावले, बाथरूममध्ये जाऊन झटपट शॉवर घेतला, तोपर्यंत माझा चहा रेडी होता. बस तो हातात घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर म्हणजे हॉलमधील भल्यामोठ्या खिडकीसमोर आरामखुर्ची टाकून बसलो, पाय पुढे पसरवून त्या खिडकीच्या कठड्यावर टेकवले अन लांबवर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेल्या मुंबईकडे पहात, जिच्यासमोर एअर कंडीशन सुद्धा झक मारेल अश्या दहाव्या मजल्यावरील आमच्या खिडकीतून आत शिरणार्‍या वार्‍याच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत हातातल्या कॉफी मगातील गरमागरम चहाचे घोट मारत.... बस्स ती पंधरा-वीस मिनिटे..

एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 02/06/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे मी सापांचे कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन) करायला सुरवात केली. पण कुठून यायचे हे कॉल ? कोण करायचे ? नंतर त्या सापांचे काय व्हायचे ?

जी-२

लेखक दशानन यांनी सोमवार, 27/05/2013 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.

अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज

लेखक साळसकर यांनी रविवार, 26/05/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 24/05/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.