Skip to main content

विचार

दिंड्या, पताका..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं... अगदी लहानपणापासून हो.

नि:शब्द (कथा)

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 10/07/2013 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय...... रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती.

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 10/07/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स, हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे.

सुख

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 09/07/2013 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यभर सुखाकरिता धडपडणे किंवा त्याचा शोध घेणे हा माणसाचा आवडता छंद असतो. त्याचे अवघे आयुष्य या धडपडीत निघून जाते. पण नेमके सुख कशात असते हे त्याला समजत नसते. नेमके काय केल्याने सुख मिळेल हे त्याला समजत नसते. बालपण खेळण्या बागडण्यात, तारुण्य विषयोपभोगात तर वृद्धत्व माणसाला रोग व चिंता यांनी ग्रस्त अवस्थेत नेउन सोडते. त्यामुळे मिळालेले सुखाचे क्षण उपभोगणे हेच योग्य. कारण मनुष्य स्वभाव असा आहे कि सुखाचा सहवास घडला तर त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याऐवजी ते ओसरून तर जाणार नाहीना या काळजीने मन काळवंडून जाते म्हणून सुखात डुंबता आला पाहिजे. शेवटी सुख हे मानण्यावरच असते नाही का?

तेरी मेरी कहानी........ दो नैनो की

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/07/2013 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु. नक्की काय झाले ते...... नजरेची जादू अशी असू शकते....... अनुभवायचं आहे? डोळे झाक....... ए यडबम्बु तुला म्हणतेय मी. डोळे झाक ना... अं........ हे रे काय ....... एक सांगु... हंम्म.... हम्म काय साम्गु...... हं. कानात सांगते..... कानात कशाला.... मोठ्यने सांग. भिंतीला कान असतात मग भिंतींच्या कानात सांग. शी कसला अरसीक आहेस रे. अगं अरसीक नव्हे. मागच्या वेळेस असेच कानात सांगायला म्हणून तु जवळ आलीस अन कान चावलास. ते लक्षात आहे तुख्या अन तु काय केलस ते विसरलास. काय काय केलं मी इश्श्य... ए बाई ते जाउ देत काय सांगणार होतीस ते सांग. थोडा इकडे ये ना..... हं....... अस्साच थांब.....

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

फुकटची समाजसेवा -पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुम्बैच्या अश्विनी रुग्णालयात इंटर्नशिप करीत असतानाची (१९८८) गोष्ट आहे. एके दिवशी रात्री साधारण साडे आठ वाजता एका नौदलाच्या अधिकारी(लेफ्टनंट कमांडर यादव) एका पोस्टाच्या कर्मचार्याला घेऊन आला. त्या अधिकार्याने स्कूटर चालवत असताना या कर्मचार्याला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या वादात तो त्याला नौदलाच्या रुग्णालयात घेउन आला होता. मी त्या कर्मचार्याची तपासणी करू लागलो तेवढ्या वेळात तो नौदल अधिकारी तेथून पसार झाला. मी त्याची तपासणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले कि त्याच्या घोट्याला वाईट फ़्रैक्चर आहे आणि त्याची शल्यक्रिया करणे आवश्यक आहे.

फुकटची समाजसेवा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझा मूळ पिंड समाजसेवेचा नाहीच. इतर लोकांच्या सारखी सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी पण करतो . पण वैद्यकीय व्यवसायात फारसे कष्ट न करता समाजसेवा करता येते त्याचा हा एक वृत्तांत. पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये काम करीत असताना ची गोष्ट आहे. तेथे दहा रुपयाचे कार्ड काढले कि कोणतीही सेवा ( औषधासकट) फुकट मिळवता येत असे यात फक्त कर्करोगाची औषधे अंतर्भूत नव्हती ( कारण कर्करोगाचे उपचार तेथे सिव्हिलियन साठी नव्हते ) मी तेथे क्ष किरण विभागात कामाला होतो आणि आर्मीच्या हिरवट खाकी(OLIVE GREEN) गणवेशात मी एकटा नौदलाच्या पांढऱ्या वेशातील बगळा होतो. त्यामुळे रुग्णांना मला ओळखणे फार सोपे होते.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 22/06/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.

२१ जून, मॉस्को..(२)

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 22/06/2013 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यावर जेवून ८.४५ च्या सुमारास घराजवळील 'व्हिक्टरी पार्क' कडे निघालो. व्हिक्टरी पार्क सोव्हियत युनियनच्या अंतीम काळात तयार झाले. हे रशिया आणि नाझी जर्मनीच्या 'ग्रेट पेट्रीयोटिक वॉर'(१९४१ ते १९४५ दुसरे महायुध्द)च्या विजयाचे स्मारक आहे. १९९५ मध्ये या विजयाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी या स्मरकाचे उद्घाटन झाले. या जागेला आणखी ऐतिहासिक महत्व देखील आहे.