हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते ....
काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ...
आता हेच बघा ना, परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ??
आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ?? मी प्ले ग्रुप ला जाते .... च्यामारी, मराठी मध्ये शाळा म्हणालो तर मी गावंढळ का ??
खरं सांगू का ?? मला नाही आवडत रिमिक्स गाणी ऐकायला किंवा चेतन भगत ची पुस्तक वाचायला,,म्हणजे मला ते बिल्कूलच जमत नाही असा काही नाही .... कधी मूड लागला तर वाचतो पण ....
मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)... मग होते पंचाईत ...
खरं सांगाव तर आपण बावळट ठरतो आणि खोटं बोलायची सोयच नाही ....
असाच मुंबई वरून एकदा येत होतो, समोर च्या सीट वर एक आजोबा बसले होते, बराच वेळ त्यांची चुळबुळ चालली होती ... बर आपण काही बोलाव तर त्यांची नात त्यांच्या बरोबर होती .... असेल १५-१६ वर्षांची ( दिसायला पण बरी होती)... कानात इयरफोन लाऊन गाणी ऐकत होती ... आजोबा तसेच, अस्वस्थ .... शेवटी राहवेना म्हणून आजोबांना विचारलं "काही होतंय का तुम्हाला ?? काही हव आहे का ?"
इतक बोलायचा अवकाश ते घडाघडा बोलायला लागले ... किती साधं होतं ते बोलणं , पण ऐकणारं कोणीतरी असावं इतकंच हवं होत त्यांना .... नात शेजारी असताना हि वेळ का येते ?? मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्या मुलीने खूप विचित्र नजरेनी बघितलं .... थोडा वेळ गप्पा मारून मी पण मग शांत बसलो ....
पण आत कुठे तरी काहीतरी हललं होतं हे मात्र खरं ....
इथे पण माझंच काहीतरी चुकलं का??
मला तर नाही वाटत तसं .... मग माझीच अशी पंचाईत का होते ?? का तुमचं पण असंच होतं ??
तुम्ही द्याल का या प्रश्नाच उत्तर ?? टाळू शकता का तुम्ही अशी पंचाईत??
वाचने
7490
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
अश्या वेळेस आपण पण तिप्पट
निर्लज्ज व्हावे :)
"मेरे मन को भाया मैने कुत्ता
In reply to निर्लज्ज व्हावे :) by लॉरी टांगटूंगकर
ऐला
In reply to "मेरे मन को भाया मैने कुत्ता by आदूबाळ
च्यायला, तुला चायना गेट नाय
In reply to ऐला by लॉरी टांगटूंगकर
माझी कसली डोंबल्याची
In reply to ऐला by लॉरी टांगटूंगकर
लहान असताना पाहीलेला रे.
In reply to माझी कसली डोंबल्याची by आदूबाळ
लहान असतानाना...म्हणुनच
In reply to लहान असताना पाहीलेला रे. by लॉरी टांगटूंगकर
फाट्यावर मारायला शिका…
फाट्यावर मारणेच उत्तम.
+१
In reply to फाट्यावर मारणेच उत्तम. by बॅटमॅन
+१ ...फाटा नंबर १
In reply to फाट्यावर मारणेच उत्तम. by बॅटमॅन
एक लंबर!!
In reply to +१ ...फाटा नंबर १ by मालोजीराव
आणखी १० वर्षांनी पु.ल. कोण
****
त्यात काय झाले मग? मी
वर म्हटल्याप्रमाणे असल्या
गॅजेटस
In reply to वर म्हटल्याप्रमाणे असल्या by चावटमेला
खरं आहे...
In reply to गॅजेटस by राजेंद्र मेहेंदळे
मुळात बर्याचश्या गाजेटप्रेमी
नुसते फाट्यावर मारून उपयोग
एका आयटी कंपनीत मी रोज 'सकाळ'
आवड एकेकाची.
आवड एकेकाची हे ठीक आहे , पण
In reply to आवड एकेकाची. by प्रभाकर पेठकर
अशावेळी आपणही त्यांना त्यांची
In reply to आवड एकेकाची हे ठीक आहे , पण by लोटीया_पठाण
>>>इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा
In reply to अशावेळी आपणही त्यांना त्यांची by बॅटमॅन
'रद्दड'
In reply to >>>इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा by प्यारे१
बर्या सुरुवातीनंतर
In reply to >>>इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा by प्यारे१
शिवा ट्रायोलोजी मधला काहीही
In reply to >>>इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा by प्यारे१
वाचूनच बोललोय.
In reply to शिवा ट्रायोलोजी मधला काहीही by लोटीया_पठाण
अश्मयुगीन ठरवून मोकळे होतात.
In reply to आवड एकेकाची हे ठीक आहे , पण by लोटीया_पठाण
+१११
In reply to अश्मयुगीन ठरवून मोकळे होतात. by प्रभाकर पेठकर
'थोतरीत ठेवून द्यावी' ह्या
In reply to अश्मयुगीन ठरवून मोकळे होतात. by प्रभाकर पेठकर
चेत्या (मूळ नाव बदलले आहे)
अगदि अगदि. असल्या फालतू
In reply to चेत्या (मूळ नाव बदलले आहे) by चावटमेला
वॉन्नबी तुळशीबाग
In reply to चेत्या (मूळ नाव बदलले आहे) by चावटमेला
तर अस आहे बघा
हाहाहाहा
In reply to तर अस आहे बघा by नुमविय
माझ्या कडे पण मराठी लोक मराठी
जल्लां!
तुला आवडत नसेल तर गेलास तेल
In reply to जल्लां! by पैसा
प्राणीविशेष
In reply to तुला आवडत नसेल तर गेलास तेल by बॅटमॅन
हा हा हा हा =))
In reply to प्राणीविशेष by साती
मी अश्यावेळी