मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती.
एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते. मलाही बुद्धिबळ खेळायला आवडायचे. त्याला म्हटले की खेळू एकदा. आता त्या संपूर्ण बालगोपाल मेळाव्यात बुद्धिबळाचा संच केवळ बंड्याकडेच होता. त्यामुळे त्याच्या घरी खेळणे अपरिहार्य होते. मग ठरले, एका दिवशी दुपारी आम्ही सगळे त्याच्याकडे जमलो. पट मांडला, डाव सुरु झाला. बंड्या ठीकठाक खेळत होता. पण अगदी अपराजित राहण्या इतका नाही. काही चालीतच त्याने वजीर मैदानात आणला. माझी घोड्यावरची पकड मजबूत असल्याने मी दोन घोडे उतरवले. पुढच्या काही चालीतच मला संधी मिळाली आणि एका घोड्याने एकाच वेळी राजा आणि वजीर दोघांवर हल्ला केला. झाले, राजा हलवावा लागणार आणि वजीर पडणार, आणि एकदा का वजीर पडला की डाव माझा. बंड्याचे अपराजित पणाचे रेकॉर्ड मोडणार. या आनंदात मी असताना अचानक बंड्याने घड्याळ पाहिले. "अरेच्या, तीन वाजत आले"!! असे उद्गारला आणि धडाधड डाव मोडून त्याने सोंगट्या डब्ब्यात टाकायला सुरुवात केली.
मी अवाक. अरे काय झाले? मी विचारले.
आमच्या घरी तीन नंतर बुद्धिबळ खेळायला मनाई आहे, बाबांना आवडत नाही, तो म्हणाला.
अरे, मागेच तर आपण दुपारभर खेळत बसलो होतो ना, शेजारचा पिंट्या बोलला.
तेव्हा हरकत नव्हती, आता आहे, इति बंड्या.
ओके, पण मी जिंकलो ना डाव, मी विचारले.
असे कसे, डाव तर रद्द झाला. उद्या परत नव्याने खेळू, बंड्या म्हणाला.
तेव्हा माझ्या लक्षात आले, बंड्याच्या अजिंक्यपणाचे गुपित. गेले काही दिवस का कोण जाणे पण बंड्याची खूप आठवण येतेय !!!
वाचने
11427
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!
हा बंड्या कॉंग्रेसचा प्रतिनिधी असेल का?
हा बंड्या कॉंग्रेसचा
बंड्याच्या नियमाने खेळा !
साध्य काय आहे त्यावर अवलंबून आहे
In reply to बंड्याच्या नियमाने खेळा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>"A government is the most
In reply to साध्य काय आहे त्यावर अवलंबून आहे by अन्या दातार
रोचक मुद्दे आहेत !!!
In reply to बंड्याच्या नियमाने खेळा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंड्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे
In reply to रोचक मुद्दे आहेत !!! by विश्वनाथ मेहेंदळे
खेळ काय असायचाय ?? मी ऐसी
In reply to बंड्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे by संजय क्षीरसागर
>>> मी ऐसी विकत घेणार आहे
In reply to खेळ काय असायचाय ?? मी ऐसी by विश्वनाथ मेहेंदळे
एंजल इन्व्हेस्टर्स कसे काम
In reply to >>> मी ऐसी विकत घेणार आहे by प्यारे१
बस्स का?
In reply to एंजल इन्व्हेस्टर्स कसे काम by विश्वनाथ मेहेंदळे
मी एकटा वाचक असतो तर प्रश्ण
In reply to बस्स का? by प्यारे१
>>तू 'माझ्या' प्रतिसादांना
In reply to बस्स का? by प्यारे१
हो. कारण मुळात विमेनं
In reply to >>तू 'माझ्या' प्रतिसादांना by सूड
खेळ काय असायचाय ??
In reply to खेळ काय असायचाय ?? मी ऐसी by विश्वनाथ मेहेंदळे
हे कै तरी इंटुक दिसतंय
अर्रर्र.
In reply to हे कै तरी इंटुक दिसतंय by पैसा
नको नको!
In reply to अर्रर्र. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंड्याच्या नियमाने बुद्धीबळ
बंड्याचा दृष्टीकोन..
In reply to बंड्याच्या नियमाने बुद्धीबळ by अनुप ढेरे
छान
:)
त्या बंड्याला कार्लसन बरोबर
विमेकाकांचा लेख
लेख लिहिल्याबद्दल विमेकाकांचे
In reply to विमेकाकांचा लेख by प्रास
'बंड्या' नेहमी अजिंक्यच
...
मुक्तक आवडलं.
जबरा.....
आता सगळे (आपापल्या )
बंड्याचं माहीत नाही, पण
__/!\__
In reply to बंड्याचं माहीत नाही, पण by राजेश घासकडवी
__/\__
In reply to बंड्याचं माहीत नाही, पण by राजेश घासकडवी
पटाबाहेरचं बुद्धिबळ..
एकतर बिरुटे म्हणतात तसं सगळं तुमचं हवं
अहो काका, मी काय म्हणते,
Exactly !!! You said it..
In reply to अहो काका, मी काय म्हणते, by कवितानागेश
बंड्याचे अपराजित पणाचे
In reply to Exactly !!! You said it.. by विश्वनाथ मेहेंदळे
कुठलाही खेळ, अगदी पत्ते किंवा
In reply to बंड्याचे अपराजित पणाचे by कवितानागेश
दूसरा पट आधीच मांडून ठेवलेला आहे की
मी गेलो होतो
In reply to दूसरा पट आधीच मांडून ठेवलेला आहे की by भीडस्त
हे असेच १/२ बंड्या इथे पण आहेत....
विमेंना काय अपेक्षित होतं
खेळ, खेळाडू, खिलाडूवृत्ती आणि
' असे हरण्या-जिंकण्याचे खेळ
नातेवाईकांकडे जाऊन तुमच्या
स्वभावाला औषध नसतं म्हणतात !!
आयला सूड तुला पण समजले ?
In reply to स्वभावाला औषध नसतं म्हणतात !! by सूड
आधीचे लेख जरा...
In reply to आयला सूड तुला पण समजले ? by स्पा
लेख बाउंसर गेला की प्रतिसाद
In reply to आयला सूड तुला पण समजले ? by स्पा
काहीच झेपलं नाहीये
In reply to लेख बाउंसर गेला की प्रतिसाद by विश्वनाथ मेहेंदळे
मलाही काहीच झेपलं नैये. कधी
In reply to काहीच झेपलं नाहीये by स्पा
धडा आवडला.
१ सद्भावना मनात आहे,
In reply to धडा आवडला. by सस्नेह
लहानपणी क्रिकेट खेळायचो
शक्यता आहे कि बंड्याशीहि
सिनेमा किंवा मालिका
In reply to शक्यता आहे कि बंड्याशीहि by अधिराज
चालेल! काढू सिनेमा, विमे
In reply to सिनेमा किंवा मालिका by वेल्लाभट