Skip to main content

विचार

धिंगाणा बंद

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 18/02/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर ७ वर्षांनंतर धिंगाणा डॉट कॉम बंद झाले. प्रेम दिनाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा राम राम केला. अनेक मराठी रसिकांचे हक्काचे गाणे ऐकण्याचे ठिकाण बंद झाले. पडद्यामागच्या हालचाली आपल्याला काय माहिती पण स्वप्नील आणि स्नेहल या शिंदे बंधूनी सुरु केलेले आणि भारतात कायदेशीरपणे संगीत ऐकण्याचे हे प्रथम स्थळ होते. मला आठवतंय २००७ मध्ये पुण्यात आय टी मध्ये नवीनच भारती झालेले आम्ही मिट कॉन च्या इमारतीत प्रशिक्षण घेत होतो. सगळेच नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेले, वेगवेगळ्या गावातून आणि राज्यांतून आलेले सगळेच जन तसे संगीताचे चाहते होते.

जीम-जीम-जिमात!!

लेखक वडापाव यांनी सोमवार, 17/02/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मला बारीक असण्याचा, सडपातळ असण्याचा न्यूनगंड वगैरे नाहीये बरं का... असलाच तर अभिमानच आहे. बहुतांशी लोक स्वतःला 'मेंटेन' करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, मला मात्र तसं काही करावं लागत नाही. मी आपोआपच मेंटेन होतो. गेली चार-पाच वर्षं मी जसा होतो तस्साच आहे. या कालावधीत माझा खुराक वाढला, थोडीफार उंचीही वाढली, पण रूंदी अजिबात वाढली नाही. आई वडील सुद्धा (कोणे एके काळी) बारीक होते, त्यामुळे मी सुद्धा आहे, माझी ठेवणच तशी आहे, अशा सबबी मी 'तू जाडा केव्हा होणार' असं विचारणा-या मंडळींना देत असतो.

ढोल पुण्याचा वाजतो...

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 15/02/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी ढोल म्हटलं की कान न टवकारणारी माणसं क्वचितच भेटतील. त्यातून पुण्यात, ठाण्यात, डोंबिवलीत वगैरे तर नाहीच. त्याची मजा काय आहे, बाज काय आहे, तो रोमांच काय आहे हे अनेकांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पणे अनुभवलं असेल. विशेषतः गणपतीच्या दिवसात तर अ़ख्खं पुणं ढोल ताशांनी निनादत असतं. तीन वर्षांपूर्वी मी एक दिवस पुण्यावरून ठाण्याकडे येत होतो. अनंत चतुर्दशी चा दिवस होता. स्वारगेटवरून शिवनेरी पकडली होती आणि खिडकीतून ढगाळलेलं संध्याकाळचं आकाश बघता बघता माझा डोळा लागला होता. आणि मग जाग आली ती जाणवणा-या कंपनांमुळे. बसच्या काचेला, सीटला, आणि माझ्या छातीत एक तालबद्ध कंपनं जाणवायला लागली आणि मला जाग आली.

देव आनंद

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 15/02/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

उध्वस्त इराक

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 12/02/2014 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली.

मराठी लोकांचे हिंदी बोलणे

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 12/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते.

अस्तु

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 12/02/2014 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकठनकर हे अवलिया दिग्दर्शक आहे हे तसं 'वास्तुपुरुष' पाहिल्यावरच लक्षात आलं होतं.... मग संहिता पाहिला आणि मत अगदी ठाम झालं .... आणि नुकताच "अस्तु"चा हा ट्रेलर पाहण्यात आला http://www.youtube.com/watch?v=NY3cNmtFmaA (इथे व्हिडीयो दिसेल अशा प्रकारे लिन्क कधी देतात ?) काय मस्त ट्रेलर आहे ....

'वचने,प्रतिज्ञा, डार्विन आणि आपण '

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 12/02/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
'वचने, शपथा, डार्विन आणि आपण' संपुर्ण मानवजमातीत वचन या प्रकाराला प्रचंड महत्व आहे. आपण स्वत: आजवर एकाही वाईल्ड किंवा डोमेस्टिक अॅनीमलला दुसर्या तत्सम प्राण्यास वचन देताना पाहिले नाही.यावरुन हेच सिद्ध होते की प्राणिजातीत वचन देणे घेणे ही प्रथा अजुन सुरु झालेली नाही. कदाचित त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पुरेशा असतात. मनुष्य हा मुळातच स्खलनशील असतो, त्यामुळे त्याने स्वत:च्या स्खलनशील प्रव्रुत्तीस आळा घालण्यासाठी वचन हा प्रकार शोधून काढला! कालांतराने वचन देण्याचे तोटे लक्षात आल्यावर ते बळजबरीने घेण्याकडे कल निर्माण झाला.

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 11/02/2014 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ.

गॉन विथ द विंड - एक अद्भुत अनुभव

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 11/02/2014 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
'गॉन विथ द विंड' या नावाने नेहमीच एक रहस्यमय मोहिनी घातली होती. ठिकठिकाणी हे नाव वाचले, ऐकले होते. कधी खोलात जाऊन या नावाभोवतीचं वलय काय आहे हे बघावं असं मनापासून वाटलं नाही. उत्सुकता होती पण आळस म्हणा किंवा बाकीचं नीरस जगणं जास्त आवडलं होतं म्हणा, बरीच वर्षे टंगळमंगळ करण्यात गेली. दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक परममित्र किरण गायकवाड याने विश्वास पाटलांचं ' नॉट गॉन विथ द विंड' हे पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या मात्र मी अक्षरशः प्रेमात पडलो. सलग दोन वेळा वाचून काढलं.