Skip to main content

विचार

पहिल्या-वहिल्या रिसर्चचा अनुभव

लेखक आगाऊ म्हादया यांनी रविवार, 16/03/2014 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
ARM…(advanced research methods)…MPH(Masters in public health) studentsच्या आयुष्यातली एक महत्वपूर्ण पायरी...आरोग्यप्राप्ती साठी अनेकविध पद्धती चा वापर हा विषय घेऊन मार्गक्रमणा सुरु झाली...भरपूर डोकेफोड करून आम्ही data collection साठी सज्ज झालो...ward no.22(ताडीवाला रोड,लुम्बिनीनगर) आणि ward no.54(वडगाव धायरी) यांची जबाबदारी येऊन पडली....इतकी नाना प्रकारची माणसं भेटली की सगळे किस्से सांगत बसलो तर स्वतंत्र कार्यक्रम करावा लागेल...पण काही गोष्टी मात्र खरच मनावर कोरल्या गेल्या...लुम्बिनीनगर मध्ये ४ दिवस जात होतो वरील कामासाठी...तिथे रोज एका जागी बसून जेवण करायचो....एका दिवशी तिथे पाणीच नव

सुधीर मोघे

लेखक विकास यांनी शनिवार, 15/03/2014 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच बातमी वाचली: ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन त्यांचे कविता समजण्याच्या वयात काही लाईव्ह कार्यक्रम. दूरदर्शनवर शांता शेळके तसेच इतर तत्कालीन ज्येष्ठ साहीत्यिकांबरोबरील कार्यक्रमात पाहील्याने आणि नंतर त्यांच्या गाण्यांबरोबरच मुख्यत्वे "पक्षांचे ठसे" या काव्यसंग्राहातल्या कविता वाचल्याने डोक्यात राहीले...

मुक्काम व पोष्ट वाडे

लेखक kurlekaar यांनी शनिवार, 15/03/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मु. पो. वाडे गेल्या शतकाच्या सुरुवातीसच आमच्या तीर्थरुपांचे आई-वडिल कोंकणातून मुंबईत आले व माझ्या जन्मापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. तेंव्हा कोंकणातून मुंबई कडे पसरणाऱ्या अनुबंधाची एक तार आधीच तुटलेली; आता उरलं ते फक्त आजोळ—वाडे. (जिल्हा सिंधुदुर्ग). मला वाटतं माझी आजी (आईची आई) जिवंत असेपर्यंत आमच्या आईची माहेरची ओढ तसूभर कमी झाली नाहीं; पर्यायाने बऱ्याच उन्हाळाच्या सुट्ट्या आम्ही भावंडानी वाड्याला घालविल्या होत्या, त्यात कांहीशा माझ्या वाट्याला आल्या पण ज्या आल्या त्या मात्र नंतरच्या अनेक वर्षांसाठी आठवणींच मोहोळ निर्माण करून गेल्या. माझी आजी म्हणजे एक विलक्षणीय व्यक्तिमत्व होतं.

पुनर्जन्म

लेखक kurlekaar यांनी गुरुवार, 13/03/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कोकणातल्या आजीच्या आयुष्यात दोन वैयक्तिक भूकंप आले, पहिला जेंव्हा आमच्या आईचे वडील गेले व दुसरा जेन्व्हा माझा मामा तरुण वयांत गेला तेंव्हा. तुमच्यापैकी कांहीना 'सारांश' या हिंदी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी ची भूमिका आठवत असेल; तिचाहि एकुलता एक मुलगा विदेशी असतांना एका अपघातात गेलेला असतो व तिला सारखं वाटत असतं कि तो पुनर्जन्माने परत येईल. आमच्या आजीचं थोडंफार तसंच होतं. मामाच्या मृत्त्यू नंतर ज्यांचा जन्म त्या घरांत (घराण्यात या अर्थाने) झाला त्यांना, किंव्हा त्या घराच्या माहेरवाशिणिच्या घरी ती त्याला शोधत असे.

Sense of Humour

लेखक kurlekaar यांनी गुरुवार, 13/03/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते.

ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 12/03/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५ भाग ३.१ भाग ३.२ भाग ३.३ प्रस्तावना हा भाग सर्वांत नाट्यपूर्ण, थरारक अन तितकाच करुण आहे.

कॅलीडोस्कोप

लेखक kurlekaar यांनी बुधवार, 12/03/2014 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलीडोस्कोप --१-- श्रावणातला सत्यनारायण. तिची नवी कोरी साडी व माझे बऱ्याच दिवसांत न घातलेले सदरा व सुरवार. चौरंग, केळीचे खुंट; श्रीगणेश व लंगडा बाळकृष्ण मूर्तिमय, पण सुपाऱ्यात मांडलेले नवग्रह आणि कलश व श्रीफल मिळून केलेला प्रतिकात्मक सत्यनारायण. ओळखीचे साधू वाणी व त्याचा जावई, लीलावती व कलावती. पंचामृत, व आमच्या हिचा केवळ शिरा म्हणून करतांना कधीकधी चुकणारा पण प्रसादाच्या रूपांत नेहमीच अचूक व हवाहवासा वाटणारा.

त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 12/03/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान . हमीद दलवाई आणि माझा स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा एकच आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां चष्मा माझ्या नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह मात्र हमिदचाच .

आई म्हणोनी..

लेखक rakhee यांनी मंगळवार, 11/03/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई म्हणोनी.. पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ? किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले .

MH370 - फ्लाईट डीलेड..

लेखक गवि यांनी मंगळवार, 11/03/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं.